इतर गमती जमती-१
(गच्चीवरील गमती जमती)
खरंतर गच्चीने आयुष्याचा आणि मनाचा खूप मोठ्ठा भाग व्यापलेला आहे . प्रत्येक दिवसाचा, अगदी दररोजचा काही तासांचा वेळ गच्चीवरच जात असे . उन्हाळ्यात तर रात्रींचाही ! कारण उन्हाळ्यात गर्मी फार , त्यामुळे आमचे बाबा (आजोबा) आणि आम्ही तिघी बहीणी आमच्या परीक्षा संपल्या की गच्चीवरच झोपत असू रात्रीच्या . मग तो रोजचा एक मोठ्ठा कार्यक्रमच असे . गच्चीवर झोपायचे म्हणजे पाणी सुद्धा न्यावे लागे . मग आम्ही छान नवीकोरी पाण्याची घागर किंवा छोटं मडकं आणि त्यावरचा छोटा लोटा सुद्धा भरून नेत असू . अक्षय्य तृतीया उन्हाळ्यातच . आमच्याकडे अक्षय्य तृतीयेला नवीन घागरी आणून त्याची पूजा करून त्या भरल्या जातात . त्यामुळे या नव्या घागरी आणि लोटा असेच घरात . तसेही उन्हाळा खूप असल्याने नवीन मडके किंवा खोजा विकत घेतलाच जात असे उन्हाळ्यात . मडके म्हणजे छोटा माठच . पण खोजा म्हणजे एक पूर्ण गोलाकार आणि त्याला वरच्या बाजूला मध्यभागी मातीचीच एक मुठ असे , जेणे करून तो उचलायला सोपा जाईल आणि मग या मुठीच्या दोन्ही बाजूला दोन ओपनिंगज् असत . एक त्यात पाणी भरता यावे म्हणून वरच्या बाजूने उघडे असे आणि दुसऱ्या बाजूला साधारणपणे सिंहाचे थोडे उघडलेले तोंड लावलेले असे . मग ती मूठ धरून थोडा तिरका केला तो खोजा , की त्या सिहाच्या तोंडातून , पाणी खाली धरलेल्या पेल्यात पडत असे . मग आम्ही गमतीने म्हणत असू शी-शी ..... सिंहाने उलटी केली आणि तीच पितेय ... ?!?!? पण तरी मला जाम आवडायचा हा खोजा . आमच्या दुकानासमोरच्या रस्त्याच्या पलीकडे फूटपाथ वर हे खोजे विकायला ठेवलेले असत आणि खूप असत . ते ओळीने रचून ठेवलेले खोजे बघायला मला खूपच आवडत असे ! पण फार कमी वेळा येत असे हा खोजा आमच्या घरी . कारण अक्षय तृतीयेच्या दोन घागरी आणि दोन लोटे असतंच . आणि बहुतेक खोजा जरा महाग सुद्धा असेल , असे वाटते , नक्की माहित नाही . परत घरात कायम चिल्लीपिल्ली असतंच त्यामुळे फुटण्याची कायम भीती असेच .
मग आमचे बाबाही कौतुकाने म्हणत कोण मला मस्त गारेगार आणि गोड -गोड पाणी देणार प्यायला ? मला फार तहान लागलीय . मग त्यावरून आमच्यात स्पर्धा चाले . कारण पाणी प्यायल्या नंतरचे कौतुकाचे शब्द आपल्याच वाट्याला यावे असे प्रत्येकीलाच वाटे . मग पाणी पिऊन झाल्यावर ते म्हणत वा वा काय मस्त गार-गार आणि गोड-गोड पाणी होते तुझ्या हातचे ! साखर टाकून आणली होती की काय ??!! काय भारी वाटे हे त्यांच्या तोंडून ऐकायला ? आणि क्षणभर वाटून जाई आपण साखर तर टाकली नाहीच मग त्यांना पाणी गोड कसे लागले ? आपल्या हातातच जादू आहे की काय? पण ही त्यांची आणि घरातील इतर मोठ्या लोकांची युक्ती होती . सरळ सरळ पाणी मागितले तर कुणीही मुलं उत्साहाने पाणी देणार नाही . पण नंतर अशी कौतुक वजा पावती दिली तर मात्र लगेच पाणी मिळेल , ते ही उत्साहाने . त्यांचे काम पण होई , आम्हाला ते काम पण उत्साहाने करावे वाटणार आणि परत काम केल्यावर ही छान गोड-गोड पावती मिळणार त्यामुळे उलट ते काम करण्यासाठी चढाओढ चालत असे !
हा झाला पाण्याचा भाग . दुसरा भाग म्हणजे गप्पा गोष्टी ! काही वेळा ते इकडच्या तिकडच्या गप्पा मारत , काय काय सांगत असत त्यांनी पाहिलेले किंवा अनुभवलेले . किंवा काही वेळा गोष्टी सांगत असत . त्यापैकी आता फारसे काही आठवत नाही . काही वेळा नाना आणि पप्पा ( दोन्ही काका ) सुद्धा येऊन बसत आमच्यात . मग ते सुध्दा काय काय गोष्टी सांगत . त्यातलेही काही आठवत नाही . फक्त एकच आठवते नाना एक उडत्या तबकड्यांची गोष्ट सांगत ती मला फार आवडे . पण ती गोष्ट नाही आठवत मला आता . त्यांनाही विचारून झाले पण त्यांनाही काही आठवत नाही त्यातले !
---------------------------------------------------
उन्हाळा संपला की पावसाळा . मग पावसाळ्याची वेगळीच धमाल ! पहिल्या पावसात भिजायला तर मम्मीची अधिकृतपणे परवानगी असायची . ती म्हणते पहिल्या पावसात भिजलेच पाहिजे आणि तीही भिजत असे , पहिल्या पावसात न चुकता आणि अजूनही भिजते अगदी न चुकता ! आम्ही नुसते भिजत नसू . या कार्यक्रमात आमचा लाडका धाकटा काका सुद्धा सामील असे . तो तर काही वेळा चक्क साबण पण घेऊन येत असे गच्चीवर पावसात अंघोळ करायची म्हणून . सगळं इतक्यावर थांबत नसे . जाम बदमाशी करत असू आम्ही . तेव्हा गच्चीवरील पाणी वाहून जाण्यासाठीचे पाईप अगदी वर पासून खाली रस्त्यापर्यंत नसत . गच्चीच्या भिंती पासून साधारण सहा इंच ते अठरा इंच पर्यंत सोयीने लागतील तेव्हढे ठेवलेले असत . मग गच्चीवरून पाणी त्या पाईपातुन बाहेर निघून , वरून सरळ खाली रस्त्यावर पडे . मग आम्ही या पाइपांना गच्चीच्या आतून बोळे देऊन ठेवत असू . जेणे करून पाणी वाहून न जाता गच्चीवरच साठून राही , काही वेळ तरी . मग त्यातही उड्या मारायला तर मजा येईच . पण पाऊस चालू असल्याने खालून रस्त्यावरून लोक छत्री घेऊन चालत असत . मग असेच कुणी जात असेल छत्री घेऊन त्यावर लक्ष ठेवायचे आणि ती व्यक्ती बरोबर एखाद्या पाईप खाली आली की त्या पाईपाचा बोळा काढायचा आणि मग त्या व्यक्तीच्या छत्रीवर अचानकपणे धबाधबा पाणी पडू लागे आणि ती व्यक्ती दचके . मग त्याची उडालेली तारांबळ बघायला आम्हाला मजा वाटे . पण तितक्याच चपळाई लपावे सुद्धा लागे , त्या व्यक्तीने एकदम वर पहिले तर ! आणि पाऊस थांबल्यावर सुद्धा जर का हे तुंबलेले पाणी शिल्लक राहिले असेल तर हाच प्रयोग परत केला जाई . पण आता पाऊस थांबलेला असल्याने त्या व्यक्ती कडे छत्री नसे ! त्या व्यक्तीची या सगळ्यामुळे काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी ........
-------------------------------------------------------------------
त्या काळी चिमण्या , कावळे , साळुंक्या आणि कबुतरं फार प्रमाणात होते . सारखे आमच्या गच्चीवर आणि आजूबाजूच्या झाडांवर असत . पण तेव्हा कबुतरांचॆ फारच आकर्षण वाटे आणि आवडतही, का कोण जाणे ? आजकाल तर सगळीकडे त्यांचा इतका त्रास वाढला आहे की बरेच लोक विचारात असतात , कबुतरांचा बंदोबस्त कसा करावा . चिमण्या मात्र आता बिलकुल दिसत नाही . जर कुठे दिसल्या तर मात्र मी अगदी थांबून बघत असते त्यांच्याकडे , त्या अगदी उडून जाईपर्यंत . आणि फार वाईट वाटते त्यांचे प्रणाम एकदम इतके कमी होऊन गेले म्हणून . तर कबुतर इतकं आवडे तेव्हा की एखाद पकडून पाळावेसे वाटे . प्रयत्न ही केले आम्ही तेव्हा बरेच . पण ते काही जमले नाही . पकडल्यावर त्याला राहण्यासाठी म्हणून आम्ही गच्चीवर पडलेल्या विटा आणि विटांच्या तुकड्यापासून एक घर सुद्धा बनवले होते . एकदा लाकडाच्या फळ्या आणि तुकड्यापासून सुद्धा घर बनवले होते त्याच्या साठी . आता हसूच येते या सगळ्या प्रकारचे . ते अगदी पकडले जरी असते तरी ते या विटांच्या किंवा लाकडी फळ्यांच्या घरात कसे राहिले असते.......?!!?
--------------------------------------------------------------------------
संध्याकाळी आकाशातून अशा खूप खूप बगळ्यांच्या माळा सतत उडत जात असत . फारच छान वाटत असे हे सगळे बघायला . अजून सुद्धा तो व्हिडिओ मला जसाच्या तसा बघता येतो ! मग वरून आकाशातून या बगळ्यांच्या माळा उडत असल्या की आम्ही म्हणत असू "बगळ्या बगळ्या कवडी दे. " म्हणजे काय? का? कुणी शिकवले? हे आजतागायत माहित नाही . आणि तेव्हा हे सगळे प्रश्न पडले नाही . मधल्या काळात या सगळ्या गोष्टींवर पडदा पडलेला . पण आता पुन्हा चौधरी सदन च्या निम्मिताने या आणि अशा बऱ्याच गोष्टींचे कुतूहल आणि प्रश्नचिन्ह मनात उभे राहिले आहे . आणि त्याची उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे . असो . कधी हे तर कधी आम्ही चक्क ह्या आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची मोजणी सुद्धा करायचा प्रयत्न करत असू ! तेव्हा " बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात ...." माहिती नव्हते आणि माहित झाल्यापासून त्या प्रत्यक्ष बघायला नाही मिळत .......
------------------------------------------------------------------------------
तेव्हा जळगावच्या चिमुकले राम मंदिरात पाच मोर होते . ते मंदिराच्या आवारात काही वेळा पाहिल्याचे आठवते आहे . पण त्यापैकी एक मोर आमच्या गच्चीवर सुद्धा आला होता उडत उडत . आमच्या एका काकाने(रमेश) त्या मोराला पकडण्याचा पण प्रयत्न केला होता . अर्थातच तो मोर पकडता आलाच नव्हता . पण पकडता न आल्याने खूप वाईट वाटले होते , पकडता आला असता तर त्याला आम्हाला पाळता आला असता , असे वाटले . जे अर्थातच शक्य नव्हते . पण बालमन नेहमीच अशी छान छान स्वप्न बघत असते . तेव्हा मी नक्की पहिला होता की नाही ते मात्र नक्की आठवत नाही . कधी वाटते पहिला होता, तर कधी वाटते स्वप्न असेल कदाचित !
--------------------------------------------------------------------------
अजून एक आठवते तेव्हा आकाशात घारी उडत असत पण फार म्हणजे फारच उंच, अगदी छोटेछोटे ठिपके उंच आकाशात उडताना दिसत . आणि आम्हाला कळले कुठून तरी की घारीची सावली जिथे पडली असेल तिथे जर लोखंड ठेवलं तर तिथे सोनं सापडत . पण आम्हाला अगदी पायाभूत समस्या . कारण या घारी उडणार अतिशय उंच आणि त्याची सावली कुठे पडणार आमच्या गच्चीवर ? पण त्यातून सुद्धा आमचे नशीब फळफळलें आणि एक घार अगदी खाली उडत आली आणि तिची सावली पडली आमच्या गच्चीवर . आम्ही तयारच होतो गच्चीवर ज्या ज्या लोखंडाच्या वस्तू पडलेल्या होत्या त्या सगळ्या शोधून एका जागी गोळा करून ठेवल्या होत्या . घारीची सावली पडल्याबरोबर आम्ही तिथे हे लोखंड ठेवले पटापट . आणि आजतागायत वाट बघतोय सोनं सापडण्याची .....
अश्या एक ना अनेक गमती जमती . शेवटी काय बालपणीचा काळ सुखाचा ! सगळं सुख आणि आनंद फक्त आणि फक्त आपल्या बाल मनाच्या निरागसतेमुळे !!!
आनंदी पाऊस
(गच्चीवरील गमती जमती)
खूपच मस्त जळगांव पासून खाली म्हणजे मराठवाडा ते पुढे विदर्भ सगळीकडे उन्हाळा म्हणजे अगदी अंगाची लाहीलाही होते व रात्री थोडा गारवा असतो व तू वर्णन केल्या प्रमाणे गच्चीवर ची मजा काही वेगळीच खुजे पूर्वी सारखे खुजे कुठे आजकाल दिसत नाईट सूरया पण असत मग त्यात मोगरा किंवा वाळा टाकला जायचा तू खूप मस्त लिहले आहेस लहानपण देगा देवा -------किंवा हंबी अगर बच्चे होते या जगण्यावर हया मरणावर शतदा प्रेम करावे अशी अनेक गाणी आठवली
ReplyDeleteखरंच आहे , खोजे फार सुंदर , माझे तर फारच आवडते . मी खूप प्रयत्न केले त्याचा निदान एक फोटो तरी मिळावा म्हणून . पण नाही मिळाला , पण अजुनी प्रयत्न चालू आहे . मिळाला की लगेच इथे टाकेन . मोगरा आणि वाळा घातलेले थंडगार पाणी म्हणजे तर त्यापुढे अमृत सुद्धा फिके पडेल !! यामुळे आठवलेली गाणी तर एकदम बढिया ......एक से बढकर एक !!!!😍🥰🤩❤❤💃💃💃
DeleteItke sagale athvate tula,khup mast
ReplyDeleteखूप वाट बघायला लावलीस , खूप खूप आनंद झाला तुला इथे भेटून , चौधरी सदनात तुझे अगदी मनःपूर्वक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद !!!!🤩😇😍
DeleteKhup ch Chan lihites tu..������������
ReplyDeleteअनिता , तुझे मनःपूर्वक स्वागत चौधरी सदनात ! आणि खूप खूप धन्यवाद , तू इथे आलीस , खूप मनापासून आनंद झाला !!! इथे भेटत जा अशीच !!!🙏😃🤩
DeleteExcellent superlative...
ReplyDeletesuper thank you !!! चौधरी सदनात तुझे अगदी मनःपूर्वक स्वागत😃🤩🙏
DeleteChan lihiles 👌👍
ReplyDeleteAsech lihit raha aahmi pan aamache lahanpan thodefhar tyat anubhaun aanand ghetoy
Chandal chaukadi titkich niragas😀😍👌👍
सगळा खटाटोप त्यासाठीच आहे , प्रत्येकाला आपले बालपण परत काही क्षण का होईना उपभोगता यावे आणि त्यातून खूप सारा आनंद मिळावा !😍🥰🤩
Deleteचांडाळ चौकडीच्या कौतुकाबद्दल खास धन्यवाद ! 🤗🤗🤗🤗
sunder aahe lihilele ����sarv aathavte pan tula ��lahanpanchya aathvani jagya zalyat mazyapan��
ReplyDeleteमामी , सप्रेम धन्यवाद🤩😍🙏 ! लेख प्रकाशित झाल्याबरोब्बर अगदी तत्परतेने वाचून तितक्याच तत्परतेने अभिप्राय देणाऱ्यांपैकी तू एक आहेस ! त्यामुळे तुझ्या अभिप्रायाची तर खूपच आतुरतेने वाट बघत असते मी !!!
Delete����फारच छान
ReplyDeleteमाऊली , मनःपूर्वक धन्यवाद !!!🙏😍😍
DeleteWa wa farach chhan
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!!🙏
Delete��मस्तच लिहिले आहे. बालपणी च काळ सुखाचा.
ReplyDeleteवाहिनी , या चौधरी सदनात तुझे खूप खूप स्वागत ! आणि मनःपूर्वक धन्यवाद !!!😍🤩🙏
Delete������
ReplyDeletePhoto madhe tu far cute disat ahe
Ani to mulaga Raju chaudhari ahet ka
प्रिया , मनपूर्वक स्वागत तुझे या चौधरी सदनात ! हो तो मुलगा म्हणजे आमचा लाडका काका राजू चौधरी ! मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteमस्त लिहिलय अक्का
ReplyDeleteहे वाचून आम्ही गांधी नगर la संध्याकाळी गच्चीवर सगळ्या खेळत असू ते आठवले
आणि खेळत असताना किती चिमण्या आणि bagle जातात ते मोजण्याचे हे आठवले
हा हा हा , मजल्यावर किती होत्या संख्या आठवतेय का ? ती पण सांग म्हणजे गांधी नगर लिहिताना त्यात हे ही सविस्तर लिहिता येईल !🤩🤩🤗🤗😎
Deleteअग दिवसभरात एक पुस्तक वाचून असते चल चाली चाल त्यामुळे तुझा लेख वाचला गेला नव्हता
ReplyDeleteगच्चीवरच्या गमती मजेशीर आहे खूप छान!!!
तू आणि तुझे वाचन यांना कितीही साष्टांग नमस्कार🙏🙏🧎♀️🧎♀️🧎♀️ घातले तरी कमीच आहेत बाई !!! वेळात वेळ काढून लेख वाचलास आणि अभिप्राय दिला त्याबद्दल सप्रेम धन्यवाद !!!
Deleteतुझ्या मूळे गचीवरील ओल्या ओल्या गादया आठवल्या�������� छान आठवणी
ReplyDeleteआपल्याकडे गच्चीवर झोपणे आणि ओल्या गाद्या हा प्रकार कुणीच कधीच विसरू शकणार नाहीच . पण ती गम्मत गांधीनगर च्या गच्चीवरची असल्याने अजून तरी इथे सविस्तर लिहिता येत नाही . वाचणाऱ्यांची मात्र त्याबद्दल उत्सुकता अगदी शिगेला पोहोचेल तोपर्यंत !😀😁😂🤣😅😆😉😎
Deleteमस्त......
ReplyDeleteआता गच्चीत कधी zopayala मिळेल......खरेच काय मज्जा होती ती....
एकदा गांधी नगरच्या गच्चीत zopalo असताना तेथील पाण्याची टाकी भरुन वाहिली होती.....सकाळी काय तारांबळ उडाली होती.....आठवतय का कुणाला.....
Aani ते लोखंड तेथेच असेल तर बघुया का जाऊन��������
ओल्या गाद्यांचा किस्सा सविस्तर नंतर , सोनं शोधायला मात्र चाल लगेच जाऊ , पण आपल्या आधीच कुणाला दिसले तर मात्र आपल्या हाती काहीच लागणार नाही ...एव्हढी मेहनत घेऊन , तीही इतक्या लहान वयात 😆😆😆😎😎
Deleteलेख खुपचं छान आहे
ReplyDeleteमोराचे खरं आहे. मलाही आठवतं . रमेश काका नी पकडण्याचा प्रयत्न केला होता.
Khup chan ahe lekh. malahi amchya lahanpanchya gacchiwarchya athwani alya wachun
Delete@manisha kolhe खरंच तो क्षण म्हणजे मोरपिशी रंगाइतकाच सुंदर होता !!! मोर आपल्या गच्चीवर येण्याचा ..... 🦚🦚🦚
Delete@himali सगळा खटाटोप त्यासाठीच आहे , प्रत्येकाला आपले बालपण परत काही क्षण का होईना उपभोगता यावे आणि त्यातून खूप सारा आनंद मिळावा !😍🥰🤩
DeleteWa
ReplyDeleteChaan lihate����
या चौधरी सदनात आपले मनःपूर्वक स्वागत ! आणि खूप सारे धन्यवाद !!!🙏😍
DeleteMast
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद !!!🙏
DeleteKhup chhan lekh ahe. Agadi accurate varman kelele ahe. Chitra dolya samore ubhe rahate. ����
ReplyDeleteमाझे लेख अगदी नियमित वाचतोस आणि अभिप्रायही तितक्याच नियमित देतोस ......खरंच खूप मोठा आनंद मिळतो यातून मला !!! प्रत्यक्ष भेटू शकत नाही आपण आता , पण हा एक छान मार्ग मिळालाय भेटण्याचा !!! खूप सप्रेम धन्यवाद ! 🙏😇🤩😍
DeleteKhupach chan lekh ahe tai...tula kase athavte etke 👏👏
ReplyDelete🤩 कसे आठवते ते खरंच आता देवालाच विचारायाला हवे आहे 😃😃😇🙏
Deleteखूप छान मस्त
ReplyDeleteआठवणी ताज्या होता
पुढच्या लेखासाठी शुभेच्छा
नुसत्याच आठवणी ताज्या होत नाही , तर ते सगळे क्षण आपल्याला परत परत जगण्याची एक छान संधीच मिळालीय !!! 😍🤩❤💃💃💃
Deleteगच्चीवर झोपायला जायची मजाच काही और असते. आम्हाला गच्चीवर गादया आणि चादरी घेवून जाव्या लागत. अणि गच्चीवर चढायला एक लोखंडी शिडी होती. पण एकदा गादया वर टाकल्या की पाहिल्या पावसाची चिन्ह दिसे पर्यंत तिथेच असत. माठातील पाणी खरच अमृततुल्य लागते. आम्ही त्यात वाळा टाकत असू. खोजा हा प्रकार मलाही खूप आवडतो. पण तो घरात फारसा टिकत नसे. फ्रीज मुळे माठ, खोजा आता घरातून हद्दपार झाले आहे. पण त्या गोड गार पाण्याची चव अजून आठवते.
ReplyDeleteपावसाळ्यात गच्चीवर पाणी साठत असे ते खराट्याने काढावे लागे. पण पाईप मध्ये बोळे कोंबून लोकांची फजिती करण्याची मजा मात्र आम्हाला सुचली नाही, याचे वाईट वाटते.
घारी च्या सावलीत लोखंडाचे सोने होते ही दंतकथा माहीत नव्हती, नाहीतर आम्हीही तिच्या सावलीत लोखंड ठेवून त्याचे सोने व्हायची वाट बघत बसलो असतो. खरच गेल ते निरागस बालपण आणि राहिल्या त्या आठवणी
खरंय , गच्चीवर झोपण्याची मजा काही औरच असते . माठ , त्यात वाळा टाकलेला ....अहाहा .... अमृत सुध्दा फिके या समोर ....... मला पण वाळा म्हणजे अती प्रिय अगदी आज सुद्धा ! आणि खोजा ..... त्या बद्दल तर बोलायलाच नको , खूपच आवडीचा ...... खूप प्रयत्न केला ,खूप शोधला पण नाहीच मिळाला , अजून प्रयत्न सुरूच आहेत , एक फोटो मिळाला तरी फारच आनंद होईल . खराट्याने पाणी काढण्यात सुद्धा जाम मज्जा वाटायची मला तर ...... धन्यवाद या आठवणी या आठवणीबद्दल ! घारीच्या सावलीचा प्रयोग आता करून बघायला हरकत नाही असे वाटते मला !!!मनःपूर्वक धन्यवाद अशा छान सविस्तर अभिप्रायाबद्दल !!!
Deletetons n tons of love!!!
खुप छान वर्षांली बालपणात नेलस.आमच्या गच्चीवरील गमती आठवल्या.
ReplyDeleteरत्ना भोरे.
खूप सारे धन्यवाद !!!🙏😍
Deleteमला ही आमची गच्ची, उन्हाळ्यातील झोप सारे सारे आठवले. तपशील थोडा वेगळा आहे पण गच्ची बद्दल चे प्रेम सारखेच... आजची पिढी हे सगळे miss करतेय हे पुन्हा पुन्हा जाणवतेय आणि वाईट वाटते... तुझा लेख मात्र मस्त������������
ReplyDeleteखरंय आपली पिढी , गच्ची आणि उन्हाळ्यात गच्चीवरील झोप , हे समीकरणच होते जणू . थोड्या फार फरकाने सगळ्यांच्या आठवणी सारख्याच आहेत ! 😊😊
Deleteधमाल लिहिलास.. मलाही माझ्या दोन्ही आजोळच्या माळवदावरच्या गमती आठवल्या..काय दिवस होते ते..
ReplyDeleteमस्त ग..������
💃💃😍🤩😇
Deleteछान आठवणी. फक्त एक फरक, आम्ही गच्ची पेक्षा अंगणात जास्त रमायचो. सुंदर बाग होती आमच्याकडे. जुने कौलारू घर होते, त्यामुळे नवीन भागांत गच्ची नंतर आली..... अंगण मात्र देखणे अन् सडा टाकून, रांगोळी ने सजवून स्वच्छ असायचे. असो!
ReplyDeleteतुझे लिखाण दिवसेंदिवस बहरू लागले आहे. लिहिती रहा. ������������
वावा , छान चित्र उभे राहिले डोळ्यासमोर तुझ्या घराचे आणि अंगणाचे ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏
Deleteखाेजाच वर्णन छान,त्यातील पाणी म्हणजे "सिंहाची उलटी ,"काय साहित्य कल्पना आहे तुझी.
ReplyDeleteकाैतुकाच्या शब्दांसाठी आजाेबांना पिण्यासाठी पाणी देणे,आजाेबांचे शब्द-हातात जादू,साखरेची गाेडी वा!!यासाठी तुम्हा बालकांची पाणी आणण्याची स्पर्धा.छान
गच्चीतील पाणी अडवून व ते एकदम साेडून वाटसरूं ची फ जिती लपून बघण्याचा आनंद आपण घेतला.पक्षांविषयीच प्रेमही या लेखात दिसून येते.
आनंदी आनंद गच्चीतील आनंद !व्वा!����
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏😇 ! सगळ्याच गमती जमती भारीच होत्या , आम्ही कधी इतकी बदमाशी केली असेल , यावर तुमचा विश्वास बसला नसेल कदाचित😛 . आणि हो कौतुक तर प्रत्येकाला आवडतेच , अगदी कुठलाही वयात असले तरी , मला तर अजूनही खूप आवडते कुणी कौतुक केले तर😍 ! आणि तुम्ही सुद्धा या अभिप्रायातून इतके सारे कौतुक केलेय खूपच आनंद होतो , जेव्हा आपले गुरुजन आपले कौतुक करतात तेव्हा !!🤩💃💃💃🥰
DeleteGachhivar zopnyacha aanad tar khupch chan pan maheri gachhich navhati pan Varangon la matra unhalyat gelo ki jaycho mulina pan khup aawdayche
ReplyDeleteTyzya lekha mule tya sarv aathavni jagrut zalya thank you ��
हो मी पण झोपले आहे वरणगावला धाब्यावर , नीट आठवते आहे मला अगदी, अणि वाळायला ठेवलेल्या लोणच्या फडशा पडलेला सुद्धा आठवतो आहे 😊
Deleteसप्रेम धन्यवाद 😍
खरंच खूप छान लिहिता तुम्ही अगदी लहानपणचा तसं तसं पिक्चर क्या बात है��������������������������������������������
ReplyDelete