उपवासाचे पापड आणि वाळवणं
(गच्चीवरील गमती जमती)
पापड आणि वाळवणं यामध्ये एक मोठ्ठा आणि महत्वाचा भाग असे उपवासाच्या पदार्थांचा . यात सगळेच प्रकार असतं . पापड , चकल्या , वेफर्स , किस असे सगळे काय काय . मुख्यतः साबुदाणा आणि बटाटा या पासून बनवलेले शिवाय थोड्या प्रमाणात भगर सुद्धा असे .
साबुदाण्याच्या चकल्या करायच्या म्हणजे साबुदाणा भिजवणे, भगर भिजवणे असे सगळे . पण हे जे काय सगळे ते खाली घरातच केले जात असे . अगदी चकल्या करण्यासाठी पूर्णपणे मिश्रण तयार झाले की मग हे भांड्यात घालून गच्चीवर आणले जात असे . सोबत साचे आणि एका भांड्यात थोडे पाणी . ह्या पाण्याचा उपयोग हाताला आणि साच्याला आतल्याबाजूने लावण्यासाठी केला जात असे . त्यामुळे ते मिश्रण हाताला आणि साच्याला चिकटत नसे . मग गच्चीवर धोतर किंवा प्लास्टिकचा कागद वगैरे अंथरून चकल्या त्यावरच केल्या जात . यात आम्हाला करण्यासारखे फारसे काही नसे . फार तर रिकामा झालेला साचा नेवून देणे आणि भरलेला साचा आणून देणे . म्हणजे मम्मी लोकांना तेव्हढीच उठ बस कमी करावी लागे आणि नेहमीचे आणि महत्वाचे काम म्हणजे खाणे ! हे मिश्रण सुद्धा चवीला एकदम भारी लागते छान एक तिखट चव आणि मग मधेच एखाद जिरं दाताखाली आले की तर भारीच ! मग वाटीत घेऊन थोडे थोडे खाणेही एका बाजूला चालूच असे . पण हे थोडेच खाल्ले जाते . घाटा आणि चीक पोटभरून खातो तसे ह्याचे नसते . मग संध्याकाळी वाळल्या , की काढून खाली आणायच्या आणि डब्यात भरून बंद होते . संध्याकाळी सुद्धा काही ओल्या किंवा अर्धवट ओल्या वगैरे खाण्याच्या मजा नसे . बाकी कशा आणि कधी खाल्ल्या जात वर्षभर याची मजा खालच्या मजल्यावर गेल्याशिवाय नाही कळणार .
मग नंबर येतो बटाट्याच्या वेफर्स आणि किसाचा . यासाठी पण फार मेहनत आणि बरेच उपदव्याप . बाजारातून बटाटे आणण्यापासून सगळे नीट पूर्व नियोजन . काहीही असो थोडे थोडके नाहीच . त्यामुळे नीट नियोजन केल्याशिवाय पर्यायच नसे . याचे सगळे काम सुद्धा आदल्या दिवशीच चालू होते असे . पण हे सगळे खालच्या मजल्यावर घरात . मग दुसऱ्या दिवशी शिजवून गच्चीवर आणले जात असे . मग हे एक-एक मोकळे करून खाली अंथरलेल्या धोतर किंवा प्लास्टिकच्या कागदावर घालावे लागत . हे काम म्हणजे अत्यंत वेळखाऊ आणि चिकाटीने करावे लागणारे काम . दिसायला मात्र एकदम सोप्पे वाटते . पण स्वतः करायला घेतेले की कळते ! आणि हे सगळे काम करायला सकाळी लवकरच करायला सुरवात झाली तर ठीक . नाहीतर आमच्या इकडे उन्हाळ्यात सकाळी आठ वाजता सुद्धा उन्हाचा जोरात चटका लागतो .
संध्याकाळी वाळले की परत हलक्या हाताने एक-एक करत काढून डब्यात भरायचे . मग हे भरलेले डबे माळ्यावर जाऊन बसत आणि कसल्या-कसल्या उपवासाच्या निमित्तानेच फक्त खाली उतरत असतं .
बटाट्याचा किस सुद्धा तसाच , सगळी काम आदल्या दिवशीच खाली घरात सुरु होत आणि दुसऱ्या दिवशी शिजवून झाले की गच्चीवर आणले जात . ह्याचे काम आणि किचकट . तो ही छान मोकळा मोकळा करून टाकावा लागे . मोकळा करून टाकला म्हणजे तो वळणार पण छान आणि तळताना सुद्धा सगळं सारखा आणि छान तळाला जाणार शिवाय सगळ्या किसाचा रंगही सगळीकडे छान एकसारखा ! चिकटलेला असला की वाळत तर नीट नाहीच . पण तळताना कुठे कच्चा , तर कुठे जळका होणार . त्यामुळे त्याप्रमाणे पिवळ्या रंगापासून अगदी काळपट रंगापर्यंत , सगळ्या छटा त्यात दिसंणार आणि खातांना तर कसा लागेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी .
अजून एक प्रकार म्हणजे फक्त साबुदाण्याचे वाफवून केलेले पापड . ह्याचाही बराच खटाटोप चाले . पण हे सगळे खाली घरात , अगदी पापड तयार होऊन प्लास्टिक च्या कागदावर घाले पर्यंत आणि मग हे सगळे पापड झाले की हे प्लास्टिक चे कागद गच्चीवर नेले जात . मग दिवसभर कडकडीत उन्हात छान वाळून जात संध्याकाळ पर्यंत . हे करतांना खाण्यासारखे मात्र काहीच नसे . पण खरी मज्जा ते करत असतांना बघण्यात होती . पण ती सगळी मज्जा अनुभवायला खालच्या मजल्यावर जावे लागेल , तेव्हाच कळेल ती मज्जा . खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर मला अगदी आजपर्यंत अगदी तळल्यावर सुद्धा कधीच खायला आवडले नाहीत . फारच तेलकट वाटतात मला ते . हल्ली इकडे कर्नाटकात तर छान रंगीबेरंगी मिळतात हे पापड . बघायला मात्र फार छान वाटतात मला ! मग हातात उचलून घेते , बघते , तो रंगीत आनंद लुटते आणि परत ठेवून देते !
ll इति उपवासाम् पदार्थम् ll
(टीप - सगळ्या वाळवणांसाठी गच्चीवरील गमती जमती आणि घरातील गमती जमती या दोन्ही सदरात बघावे म्हणजे सगळी माहीती नीट आणि सविस्तर मिळेल )
आनंदी पाऊस
गच्चीवरील गमती जमती
५ ऑगस्ट २०१९
साबुदाणा चकल्या कच्च्या
साबुदाणा चकल्या तळलेल्या
बटाटा वेफर्स कच्चे
बटाटा वेफर्स तळलेले
बटाटा किस कच्चा
बटाटा किस तळलेला
साबुदाणा पापड कच्चे
साबुदाणा पापड तळलेले
Mast chan lihala aahes. Hi maja mi hi anubhavleli aahe. Mala aani khas karun ritu taila chaklyancha kachha saran khup aavdaycha rather aavdta aani mala batatyachya papad, latla papad ki role karun khaycha😉.
ReplyDeleteमस्तच अभिप्राय ! चकल्यांचे सारण मी काही फारसे खाल्लेलं नाही पण त्या चकल्या मात्र अजुनी आवडतात . 😀तो एक बटाट्याचा पापड मात्र आजवर क्षण भरही कुठल्याच प्रकारात आवडला नाही 😏😣आणि अजुनी आवडत नाही . लाटलेला पापड रोल करून खायची कल्पना पाहिल्यानेच माहित होतेय मला !!!🤩🙄
Deleteछानच आहे वर्णन.. वाचून असे वाटते की आपण सुद्धा करून पहावे..
ReplyDeleteबघ की मग करून , झेपेल आणि जमेल तितके , तुलाच मज्जा येईल आणि आनंद तर खूप मिळेल . मी फारच लांब आहे , नाही तर मीच आले असते तुला सोबत करायला आणि तुझा आनंद वाटून घ्यायला ! 🤩🥰😍😎
Deletekhup sunder lihile aahes samorch valavan suru aahe ase janavte ��
ReplyDeletechan �� ��
मनःपूर्वक धन्यवाद 🙏! लेख प्रकाशित झाला की काही मिनिटातच अभिप्राय देणार्यापैकी तू एक आहेस मामी😍 ! खूपच उत्साह आणि प्रोत्साहन मिळते त्यामुळे मला पुढच्या लिखाणासाठी !!!🤩😇🥰💃
DeleteKhupach chan varnan kele ahe kurdai ,papad n chips😋😋😋
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏मोठी भावंडं लहान भावंडांचं कायमच कौतुक करत असतात . पण माझ्या बाबतीत मात्र हे उलटे सुद्धा खरे आहे . माझी सगळी लहान भावंडं सुद्धा माझ्यावर किती किती कौतुकाचा वर्षाव करत असतात ! देवा मनःपूर्वक आभार यासाठी खास !!! so blessed soul i m!!🤩😇
Delete����मस्त आमच्या कडे कीस इतर वेळी पण खायचे हे आठवले लग्नात रंगीबेरंगी पापड्या ला खूप महत्व होत चकल्या नीट झाल्या तर ठीक नाहीतर फुलत नाहीत खरेच खूप कष्ट लागतात ते पूर्वीची पिढी करू जाणे आजकाल सणवारा ला सर्व एकत्र येत .आजकाल ते पण खूप कमी झाले आहे.व फीट नेस म्हणून तळण पण कमी झाले आहे नाही का?
ReplyDeleteमस्त ��पाणी सुटले
माझी आई व तिच्या मैत्रिणी आठवल्या
माझे आईला हाताला पोलिओ होता तरी ते हे सर्व उद्योग कोणाला तरी हाताशी घेऊन करायची
स्वाती ताई , अगदी खरंय सगळं एव्हढे सगळे करणे लांबच , खाणे सुद्धा जमत नाही आपल्याला . थोडं काही तळलेले खायची वेळ आली तरी भीती वाटते आपल्याला . आणि हो तुमच्या आईंना भेटली मी , सविता ताईंच्या डोहाळेजेवणाला आलेल्या तेव्हा ! मनःपूर्वक धन्यवाद असा छान सविस्तर अभिप्राय दिल्या बद्दल !🙏😇😇😍😍
Deleteवर्णन खूप छान केले आहे. साबुदाणा पापड व चकल्या आम्ही पण करतो.
ReplyDeleteवावा मस्तच ! येतेच मी लगेच खायला तुझ्याकडे आता ! 😀🏃♀️🏃♀️🏃♀️
Deleteछान.सतत तोंडाला पाणी सुटेल असे लिहितेस तू .
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏!पण आपण कोण ? आपलं नाव कळेल का?🤔🤔🤔
DeleteAplya upvasachya chaklya khup chhan banaychya, ani tyach saran tar khupach tasty lagaych
ReplyDelete😍🥰💖😋😋🤤🤤🤤
DeleteWa chaan aahe lekh.. ����
ReplyDeleteChakliche mishran ��
मनःपूर्वक धन्यवाद 🙏!🤤🤤😋😋🤤😋
Deleteवा वा खुपच छान आहे
ReplyDeleteरीत चकलीच्या मिश्रणाने तोंडाला पाणी सुटले का
😍💖🤩💃 खरंच रिता आणि भूमी च्या तोंडाला जोरात पाणी सुटलंय 🤤🤤🤤🤤🤤🤤
DeleteKhoop chan varnan👌
ReplyDeleteAaha datakhali yenare jeere😋
बरोब्बर मुद्धा शोधून काढतेस , प्रत्येक लेखातला !!!! मनःपूर्वक आभार !😎😎😎🙏
DeleteMastach
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏!पण आपण कोण ?
DeleteKupach chan lihite������
ReplyDeletetons n tons of love to u dear !!!😍🤩🥰💖😇
Deleteउपवासाच्या वाळवणावरील लेख वाचून अनेक विस्मृतीत गेलेली वाळवणं अाठवली. हल्ली उपासही कमी झाले अाणि वाळवणंही. उपासाचे पापड खूप छान लागतात. त्याचा कीस मात्र अाम्ही direct किसणीने पंचावर किंवा धोतरावर घालत असू. त्याचा तळून चिवडा फार छान लागतो. साबूदाण्याचे पापड तर पापड्या करत असू. घाटा शब्द अपरिचित वाटला.अाता सगळे रेडिमेड मिळते त्यामुळे ते करण्यातील गमतीला व अानंदाला अापण मुकलो अाहोत.
ReplyDeleteसगळे पदार्थ आयते मिळायला लागलेत याचा आनंद मानावा की दुःख मानावे तेच कळत नाही बऱ्याच वेळा ! कारण आयते मिळायला लागल्याने , करण्यातील आनंदच मिळत नाही , पण करता येत नाही तेव्हा खाण्याचा आनंद मात्र लुटता येतो !
Deleteछान जमला आहे लेख������������ मलाही तळलेला शाबु दाणा पापड आवडत नाही.��
ReplyDeletesame pinch 😆☺😛मनःपूर्वक धन्यवाद !🙏
Deleteउपवासाचे पापड,चकल्या,बनविण्याचा गच्चीवरील गृहउद्दाेग एक आनंददायी वाटत आहे.
ReplyDeleteआमच्या घरात सगळीच काम फार मेहनतीची आणि कष्टाची असत , खूप सार करावं लागत असल्याने .पण आमच्या मम्मी लोकांच्या उत्साहामुळे प्रत्येक काम म्हणजे एक आनंदी सोहळाच होऊन जात असे !!त्यांच्या कष्टाला आणि उत्साहाला माझा कायमच आणि वारंवार त्रिवार सलाम !!
Deleteधन्यवाद !🙏
Superb post��.
ReplyDeleteI am sharing in my family group.
Please keep sharing your posts.
Good Night!
Thnk you so much 😊
Delete