(गच्चीवरील गमती जमती)
गेल्या काही वर्षांपासून हे टेरेस गार्डन वगैरे ऐकू येतय आणि माहितीचं झालय सगळीकडे . हे सगळे नीट रचना करून , आराखडा करून आणि त्याप्रमाणे बांधकामाचे तपशील ठरवून केलेले असते . पण त्याकाळात कुणाचे टेरेस गार्डन आहे हे बघण्यात किंवा ऐकिवात असल्याचे काही मला आठवत नाही . पण आमच्याकडे अगदी मला कळायला लागायच्या आधीपासून गच्चीवरील बाग (टेरेस गार्डन) होती . पण त्यादृष्टीने काही खास रचना किंवा तपशिलात जाऊन काहीही काम केलेले नव्हते . इतकेच काय गच्चीला साधे वॉटर प्रूफिंग सुद्धा केलेलं नाहीय आजतागायत . पण खालच्या मजल्यावर कधी पाणी गळाल्याचे आठवत नाही !
इतकी वर्षं फार माहिती नव्हती आमच्या गच्चीवरील बागेबद्दल . फक्त मम्मीला फुलझाडांची फार आवड आहे हे माहित होतं . त्यामुळे हे सगळे तिनेच चालू केलेलं होते हे नक्की . पण केंव्हा आणि कशी सुरुवात झाली हे माहित नव्हतं . चौधरी सदनच्या या उपक्रमाच्या निमित्ताने यावर सुद्धा चर्चा झाली , माझी तिच्या सोबत आणि मग मला बऱ्याच गोष्टी तपशिलात कळल्या . अगदी मला आठवते तेंव्हापासून आमच्या ह्या गच्चीवर फक्त दोनच सिमेंट कॉंक्रिटच्या कुंड्या होत्या , कमळाच्या आकाराच्या , खाली त्यांना छोटासा पेडेस्टल असलेल्या . बाकी सगळी झाडं लाकडी फळ्यांच्या खोक्यामध्ये लावलेली होती . आत्तापर्यंत फक्त दोनच कॉंक्रिटच्या कुंड्या का ? असा प्रश्न मनात पडलाच नव्हता . पण आता या लिखाणाच्या निमित्ताने बरेच प्रश्न मनात येत आहेत त्या पैकी हा सुद्धा एक .
तर पहिला मजला आता जसा आहे तसाच मी बघत आलेय . पण त्याआधी थोडा काहीतरी वेगळा होता . तेंव्हा त्याला एक मोठा व्हरांडा होता आणि या व्हरंड्याच्या भिंतीवर सहा कमळाच्या आकाराच्या कुंड्या घट्ट बसवून ठेवलेल्या होत्या . नंतर ही रचना बदलल्या मुळे या सगळ्या कुंड्या तिथून काढून टाकल्या गेल्या . पण काढून टाकतांना चार कुंड्या फुटून गेल्या आणि फक्त दोनच कुंड्या शाबूत राहिल्या . या नीटपणे शाबूत राहिलेल्या दोन कुंडया गच्चीवर आल्या . मग सुरवातीला मम्मी त्यात कोथिंबीर किंवा त्यासारखे उपयोगाला येणारे काय-काय लावत असे . मग तिला बाकी फुलझाडं सुद्धा लावायची इच्छा झाली आणि तिने तसे दादांना बोलून दाखवले . मग त्यांच्याच डोक्यातून निघाले . ते म्हणाले आपल्याकडे बरीच रिकामी लाकडी खोकी पडली आहेत , त्यातच लाव झाडं . तेंव्हा पप्पा आणि नानांचे मेडिकल स्टोअर होते . त्यासाठी येणारी औषधं या लाकडी खोक्यात पॅक करून येत असत . झालं , मग मम्मी ने कुठूनकुठून जमेल , मिळेल तशी माती आणायला सुरवात केली आणि एक एक करून फुलझाडं सुद्धा !
मग या कमळाच्या कुंड्यांमध्ये पांढरी आणि गुलाबी लिलीचे कंद आणून लावले . अगदी वर्षानुवर्षे ती होती , छान कुंडी भरून फुलं येत तिला . फारच भारी दिसे ती संपूर्ण बहरलेली कुंडी ! आम्ही ही लिलीची फुलं सुद्धा डोक्याला लावत असू . शिवाय वेगवेगळ्या रंगाचे गुलाब सुद्धा होते . पांढरा , पिवळा , मोतिया , गुलाबी , लाल , हे रंग अगदी ठळकपणे आठवत आहेत मला . एका खोक्यात पिवळी-नारिंगी रंगाचे कर्दळीचे झाड होते . याचा रंग छान झळाळत होता , पण त्या फुलाचा आकार मला फारसा आवडत नसे आणि अजूनही नाही आवडत . पांढरी शेवंती सुद्धा होती . एका खोक्यात गवती चहा कायमचा लावलेला असे . मला हा बघायला खूप आवडे , अन कात्रीने याची पानं कापायला पण आवडत . हाताने तोडायला गेलं की हातच कापला जायची शक्यता . पण तेंव्हा मला हा चहा उकळताना येणारा वास मात्र अजिबात आवडत नसे आणि प्यायला सुद्धा आवडत नसे . आता मात्र तसे नाही , आता वासही खूप आवडतो आणि प्यायलाही खूप आवडतो . कुठून कुठून शोधून विकत आणत असते मी आता . मोगरा सुद्धा होता . या फुलांचा मौसम म्हणजे उन्हाळा . प्यायच्या पाण्याच्या माठात मम्मी आठवणीने रोज तीन-चार फुलं टाकत असे . मस्त वास यायचा पाण्याला आणि चवही छान लागायची . आणि निशिगंध सुद्धा होता . तेव्हा वाटायचे काय हे झाड , केव्हातरीच फुलं येतात , ती सुद्धा अगदी मोजकीच . पण आता निव्वळ त्याच्या वासाकरता जमेल आणि मिळतील तशा चार-पाच काड्या विकत घेऊन येते आणि पाण्यात घालून फुलदाणीत ठेवते . दिवसभर छान त्यांचा मंद मंद वास येत असतो आणि छान प्रसन्न वाटत राहते . शिवाय एक लोखंडी ड्रम होता , कसला होता काय माहित . त्यात जाईचा वेल लावलेला होता आणि हा एकटाच जिन्याजवळ ठेवलेला होता , बाकी सगळी झाडं टाकीच्या एका बाजूने होती . दुसऱ्या मजल्यावर मोठी गच्ची आहे . त्या मजल्यावर तेव्हाही भाडेकरु होते . या गच्चीवर या जाईच्या फुलांचा छान सडा पडे . फार भारी वाटे मला तेव्हा ते . या एका कारणासाठी मला वाटे , आपण दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर करावे आणि तिथेच राहावे . अर्थातच ते शक्य नव्हते आणि या आधी असे मी उघडपणे कुणाजवळ बोलले ही नव्हते .
इथे पाण्याच्या टाक्या बाजूलाच असल्याने पाणी घालणे सोयीचे जात असे . ते ही काम मम्मी भल्या पहाटे पाच-साडेपाचलाच करत असे . हल्ली बरीच खतं , जीवनामृत , कांद्याचे पाणी , ताक आणि काय काय घालतात झाडांना भरपूर फुलं यावी , नीट वाढ व्हावी म्हणून . तेव्हा ह्यापैकी काहीही केले जात नसे . पण आधीच आमचे एकत्र मोठ्ठे कुटुंब , त्यात येणाऱ्या जाणाऱ्यांचा प्रचंड राबता . त्यामुळे एक एक दिवसाचा चहा सुद्धा खूप होत असे . मग चहा गाळल्यावर ही सगळी चहा पावडर या झाडांना जात असे , शिवाय रोजचे एकदा पाणी . पण सगळी झाडं कायम छान बहरलेली असत . कधी चुकून गच्चीवर जाण्याचे दार उघडे राहिले तर चोरी सुद्धा होत असे या फुलांची !
पण एक महत्वाचे काम असे या सगळ्यामध्ये . साधारणपणे कुंड्यांमधून झाडं लावली , की वर्षानुवर्षे त्या कुंड्या तशाच राहतात , क्वचित फुटतात . पण आमच्या कडे तर ही सगळी झाडं लाकडी खोक्यातून लावलेली होती . मग कालांतराने ही खोकी सडून जात , कारण ते लाकूड फारशा चांगल्या प्रतीचे नसे . फक्त औषध पॅक करून पाठविणे एव्हढेच काम असे त्या खोक्यांचे . मग सडले की ही खोकी बदलावी लागत . पण सडला खोका की बदल असेही करता येत नसे . त्या त्या झाडाच्या आकाराच्या मानाने तेव्हढेच मोठ्ठे खोके आलेलेही हवे , तेंव्हाच ते बदलता येत असे . तेंव्हा फारशी हत्यारं सुद्धा नव्हती बागकाम करायला . खाली घरात एक विळा होता , काही ठराविक फळं किंवा भाज्या कापण्यासाठी लागत असे म्हणून . बाबांना सुपारीची सवय होती म्हणून एक अडकित्ता होता सुपारी कापण्यासाठी आणि आमचे सगळे कपडे मम्मी घरीच शिवत असे , त्यासाठी एक कापड कापण्याची मोठी कात्री होती . ह्या तीनच गोष्टी वापरून बागकाम चालत असे . झाड छोटे असले तर जरा सोपे जाई खोका बदलायला . पण मोठे असले , की बराच त्रास पडे . त्यात जास्तीत जास्त झाडं गुलाबाची , म्हणजे भरपूर काटे .
आधी तो सडलेला खोका विळ्याने तोडून तोडून एक एक फळी बाजूला काढावी लागत असे आणि शक्य तितकी माती सुद्धा काढून , नवीन खोक्यात टाकली जात असे . मग ते अख्खे झाड मुळापासून उचलून दुसऱ्या जागी ठेवले जात असे . मग उरलेला खोक्याचा भाग आणि माती त्या जागेवरून काढून घ्यावी लागे . मग सगळे नीट स्वच्छ करून त्या जागी नवीन खोका ठेवायचा , त्या थोड्या मातीवर हे अख्खे मुळासकट झाड ठेवायचे , वरून उरलेली माती घालायची आणि वरून थोडे पाणी घालायचे की एक खोका बदलण्याचे काम संपत असे . हे सगळं जवळ जवळ दोन-अडीच तास चालत असे किंवा अजून जास्त वेळ सुद्धा आणि त्यानंतर हातांवर बऱ्याच ठिकाणी काट्यांचे ओरखडे पडून रक्त सुद्धा येत असे . पण खोके बदलताना आयतीच खालची माती वर आणि वरची माती खाली होत असे , रोज पाणी घालताना थोडी माती नक्कीच वाहून जात असे , मग थोडी नवीन माती सुद्धा घालावी लागे . हे सुद्धा एक महत्वाचे कारण असावे माझ्या मते , झाडं कायमच फुलांनी बहरलेली असल्याचे !
ही आमची गच्चीवरील बाग सगळ्यांसाठीच आकर्षणाचे केंद्र स्थान होते . आमच्या मैत्रिणी , मम्म्यांच्या मैत्रिणी , शेजारी-पाजारी , नातेवाईक , अशा सगळ्यांचे .सगळे अधून मधून येत असत बघायला आणि एखादं फुल मिळेल या आशेने .आम्हाला पण भारी वाटायचे मग हे सगळं दाखवायला आणि त्यांच्या तोंडून स्तुती ऐकायला . काही वेळा आम्ही शाळेत फुलं घेऊन जात असू आणि आमच्या मॅडम ना देत असू . त्या पण खूष होऊन जात असत आणि मग फार भारी वाटायचे सगळ्या वर्गासमोर ! काही जणांना त्यांच्या घरी सुद्धा इच्छा होई ही झाडं , मुख्यकरून गुलाब लावायची . मग मम्मी त्यांना नीट अडकित्त्याने काड्या कापून देत असे आणि कशी लावायची , कशी काळजी घ्यायची ते नीट सांगत असे .
मम्मीने एक लोखंडी खिळे असलेले स्टॅन्ड आणले होते. त्याच्यावर छान वेगवेगळी फुलं फांदी सकट लावून ती पुष्परचना करीत असे . फारच सुंदर दिसत या फुलांच्या रचना आणि छान प्रसन्न वाटत असे घरात मग . झाडाला कळी आली की आम्हा बहिणींमध्ये त्याची वाटणी सुरु होत असे , की फुल माझे, हे फुल तिचे वगैरे . मग त्या कळीचे छान फुल फुलले की आधी ते देवाला वाहिले जात असे आणि मगच ते फुल आमच्या डोक्यांची , केसांची शोभा वाढवत असे . कधीही कुठेही बाहेर जायचे असो , कायम आमच्या सगळ्यांच्या केसात एक तरी फुल असेच . एव्हढेच काय पण आम्हा तीन बहिणींच्या पाठीवर आम्हाला भाऊ झाला , मग तो सगळं आमचं बघून शिकत असे आणि तसं-तसं करत असे शिवाय बोलत पण असे . आम्ही डोक्याला , केसात फुल लावतो ते पाहून , त्यालाही तसंच हवे असे !
आनंदी पाऊस
गच्चीवरील गमती जमती
२० जून २०१९
केशरी गुलाब
पांढरा गुलाब
लाल गुलाब
पिवळ्या रंगाची एक वेगळीच छटा
झेंडूची छोटी फुल
तो पिवळा गुलाब
गुलाबी लीली
निशिगंध
गवती चहा
आई व बाग ती लाकडी खोकी मस्त लिहल आहेस आईचे किती कष्ट असतील ना त्यामागे! !
ReplyDeleteआपण निशिंगध विकत आणतो मोगरा पण कामाच्या खूप सबबी सांगतो असे वाटले सर्व असताना पण बागकाम करत नाही
खरंच स्वाती ताई खूपच कष्ट होते या सुंदर बागेमागे ! आणि खरंच आपण नेहमीच एखादे काम न कारण्याकरिताच खूप सबबी शोधून काढतो आणि ते करायचे टाळतो . खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे . खार तर प्रत्येक काम करण्यासाठी कारण शोधायला हवीत , आता मी तरी यावर नक्कीच प्रयत्न करीन ! मनापासून धन्यवाद !!🙏🙏😊😍
Deleteजसेच्या तसे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.. खूप मस्त
ReplyDeleteमनापासून धन्यवाद !!😊😃🌹🌷🌸☘🌿🌾
Deleteअप्रतिम ओघवत्या लेखन शैलीत वर्णन आल्यामुळे चित्र आपसुक डोळ्यामोर ऊभ रहात फारच कौतुकास्पद!!!
ReplyDeletetons of love !!!! ❤😍🥰💕💖💃
DeleteWa fuarani sunder kele varan yevdhe barik nirikashn tuze lahanpani pan great ����khup chan
ReplyDeleteतू फुलराणी म्हटलेच आहेस , तेव्हा फुलराणीकडून फुलांचे आणि बागेचं वर्णन छानच व्हायला हवे की नाही ! छान नाव दिलेस मला फुलराणी !! i just loved it . tons of love for this !!🌸🌷🌼🌻🥰😇
DeleteBagh aaj me tuza blog wachala.. very good �� mech tya gachi warachya baget jaun aale asa watala ������
ReplyDeleteअगदी मनःपूर्वक स्वागत तुझे या चौधरी सदनात !!🙏आणि मनःपूर्वक धन्यवाद !! 😍😇
Deleteवर्षा तु बागेचे खूप छान वर्णन केले आहे असे वाटते की त्या गच्चीवरील बागेत जाऊन आले असे वाटते.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद ! मनात आले की केव्हाही ये , या आमच्या बागेत फिरायला . तुझे कायमच स्वागत आहे !😊😃🌸🌷
Deleteव्वा, सुंदर. आम्ही बागेतच जावून आलो असं वाटले. लिखाणाची शैली मस्त आहे...
ReplyDeleteपुष , खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 😍🥰🌹🌷🌼!!!
DeleteBagetun Chan firwun anles mastch
ReplyDelete🚶♀️🏵🚶♀️🌻🚶♀️🌼🚶♀️🥀🚶♀️🍀🚶♀️🌷🚶♀️🌹
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteताई खूप छान बागेचे वर्णन केले आहे. वाचताना चित्र डोळ्यासमोर उभे राहते..
Deleteमनःपूर्वक धन्यवाद !!!आणि हो अगदी मनःपूर्वक स्वागत तुझे या चौधरी सदनात !!😍😍😇
DeletePrajakta chi fule tumhi kashi aavdi ne ghevun jaychi. I can relate it to your mother's love for flowers. Well written' a visual treat
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद अगदी मनापासून ! फारच छान निरीक्षण आहे माझ्या बद्दलचे ! पण मला फारच कुतूहल आहे ....कुणाचा आहे हा अभिप्राय ? प्लीज नाव सांगा मला 🙏😊😇
Deleteतुझा लेख नेहमी प्रमाणे टवटवीत आणि बहारदार आहे वर्षा... keep it up
ReplyDelete🥰😍😇🙏🙏❤❤तुझ्या टवटवीत आणि बहारदार शुभेच्छांमुळे !!!!❤❤
DeleteVarsha phoolrani tuzha lekh picture madhil 🌹🌼🌺🌻🥀phoolansarkha baharlele ani sughadit 😍👌
ReplyDelete👸🌺🌸🌹🌷🍀🥀🌼🌻🏵 मनःपूर्वक धन्यवाद !!!😍❤😍❤
DeleteKhup chaan vatate. Adhich marathi maki bilayla milat. Tyat likhan khup mast asate tumche. Gung hoil vachale jate. Te 10-15 mins mast vatate.
ReplyDeleteवॉव !छानच ! खूपच मनापासून आनंद झाला तुला इकडे बघून😍😍 !!! मनःपूर्वक धन्यवाद !!!🙏🙏🙏
Deleteआणि हो अगदी मनःपूर्वक स्वागत तुझे या चौधरी सदनात !!
Khup chan lihilay..Mi ale tevha suddha gacchivar Swati taichi ashi bag hoti.
ReplyDeleteहो , खरंय तेव्हा माऊलीची(स्वाती काकूची) बाग होती !🌺🍀🌹🌿🌷☘🌸🌿🌸🌾😍❤
Deleteखुप छान. रम्य त्या आठवणी. गच्चीवरील बागेत फिरून आले !!!
ReplyDelete🌸🏵🌹🌺🌻🌼🌷🥀☘🍂🍁🍀🌿🌾🌵🌴🌳🍃😊😍❤
DeleteKhup masta vetle vachun....
ReplyDeleteपियू 🌺🌹🌺🌹🌺🌹😍❤😍❤
Deleteखुप छान. सुंदर आठवणी.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद !🙏😊
DeleteTumachya gachchivaril bagicha mana manat phulala n tya sugandhacha darval romromat pasarla. ������
ReplyDeleteआणि तुमच्या अभिप्रायाचा आनंद माझ्या तन-मन-आत्म्यावर पसरला !😍🥰💃🌹🌼🌺
Deleteखुप छान लिखाण.फुललेली फुले बघुन मन मोहरले.
ReplyDeleteरत्ना भोरे
आणि तुमचा छान अभिप्राय बघून माझे मन मोहरले !!!🌼🌷🌹😍
DeleteWow..,...khupach chan lekh & beautiful pics....
ReplyDeleteगौरी , स्वागत आहे तुझे या चौधरी सदनात !😊😃
Deleteगच्चीतील बाग खूपच छान,टपाेरे फुलांसाठी फुलझाडांची निगा महत्वाची असते आणि ती तुझ्या मम्मीने याेग्य पद्धतीने घेतलेली दिसते,तुम्हा मुलींनी फक्त गच्चीतील फुलांचा मनमुराद आनंद लुटलेला दिसत आहे.छान लेखन����
ReplyDeleteyesssss , hats of to her hard work always!!! हो काही पर्यायच नव्हता ना , फक्त आनंद लुटण्याशिवाय ! आम्ही तेव्हा फारच लहान असल्याने , यातील कुठलीच काम करण्याची मुभा नव्हती आम्हाला तेव्हा . पण गांधी नगर च्या घरात मात्र आम्ही मुलींनी सुद्धा खूप मेहनत😓😓 घेतली होती ही बाग छान फुललेली 🌷🌸🌼🌺🍀🌵🍃राहावी म्हणून ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !😇🙏🙏🤩
Deleteखूप छान बागेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. मी सुद्धा अशीच तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवर बाग बनवली होती आईकडे असताना
ReplyDeleteमी सोनल चौधरी
Deleteमनःपूर्वक धन्यवाद ! मला नाही संधी मिळाली तुझी बाग बघण्याची . 😍
Deleteबागेच्या आठवणीची साठवण...
ReplyDeleteसतीश
हो, सुंदर कष्टाच्या, मनमोहक आठवणी!!!
Deleteगच्चीवर बाग ही संकल्पना आता लोकाना अंगवळणी पडलीआहे, पण त्या काळी ती असणं अणि त्यासाठी हर प्रयत्न करत ती पूर्णत्वाला नेणं, ह्याचं पूर्ण श्रेय तुझ्या आईला जातं. लाकडी बॉक्सेस मध्ये झाडे लावल्यामुळे आपोआपच तुमची बाग eco friendly झाली. गवती चहा लावणं हा मात्र घरोघरचा कॉमन factor आहे. आईला आवड होती त्यामुळे तुम्हा बहिणींना पण मस्त फुलं मिळायची आणी बाकी मैत्रिणींसमोर इम्प्रेशन मारायची संधी पण (🤓🤓🤓). तुमच्या बागे मुळे मला पण आमच्या घरातली बाग आणी मी वडिलांना वेळोवेळी केलेली मदत आठवली. आपल्या घरात फुलझाडं असली की चोर्या होतातच. आमच्या घरी कोण कोण फूलं चोरायला यायचे ते चेहेरे मला अजून पण आठवतात(😆😆😆) . लेखाबरोबर attach केलेल्या photoes मुळे बागेचा फील चांगला आला. लिखाण अगदी साधं, प्रांजळ आणि मनाला भिडणारं आहे. Keep it up .. 👍👍👍👍👍
ReplyDeleteYessss, my mom is a magic woman!!! ह्या बागेचेच नाही तर अशा खूप गोष्टींचे श्रेय तिचेच आहे शंभर टक्के! हो गवती चहा सगळ्यांकडे असेच साधारणपणे. जाम भाव खाता येत होता आम्हाला या फुलांच्या जोरावर 😜. फुलं अणि चोरी हे समीकरणच होते अणि अजूनही आहेच 😬
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇
आनंदी पाऊस चा सुगंध असाच दरवळत राहो. ..
ReplyDeleteकिती सुंदर शुभेच्छा!!!
DeleteJust loved ur words!!!
Feeling blessed 😇
My heart full thanks for such a lovely wishes 😍
खरंच खूप छान आहे तुमचे लिखाण खुपच छान आठवणी
ReplyDeleteतसेच मोतिया कलरचा गुलाब डोळ्यासमोर आला खूप सुंदर����������������������������������������
सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
DeleteWaw ... beautiful roses, sugandharaja n other flowers���� n young n beautiful Varshali��
ReplyDeleteMany many lovely thnks 😍
Deleteखूप छान 👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteखूप छान ����
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद 🙏
DeleteNicely written. All flowers are very good. Recently I am also doing balcony gardening.
ReplyDeleteफुले आवडत नाही असली व्यक्ती आढळून येईल असे वाटत नाही .
ReplyDeleteतरीही ज्या फुलांचा रंग रूप आणि सुगंध मोहक असतो अशी फुले सर्वसामान्य माणसाला आवडत असतात .
मस्त बहरली बाग तुझी ही मन झाले आनंदी!मोहक फुले बघुनी मनास आली धुंदी गुलाबाचे रंग वेगळे लिलीही आवडली चालू ठेव असेच पाऊस तुझा आनंदी🌹🌹💐💐🌺🌺
ReplyDeleteआनंदी पाऊस पूर्ण website लेखांनी भरली आहे. छान लिखाण करता. अस काहीतरी करत राहील पाहिजे माणसानं. 👍🏻👌🏻✌🏻
ReplyDeleteवर्षा खूप छान लिहिले आहे. तुझ्या घराचा बगीचा अगदी डोळ्या समोर उभा राहिला.गुलाबाची फुले आणि निशिगंध, लीली, गवती चहा, सगळे अप्रतिम.तु जुन्या फोटोत खूप गोड दिसतेस. काकींची मेहनत दिसून येते.असा बगीचा हा मला नक्की बघायला आवडेल.
ReplyDeleteकेशरी गुलाब, गुलाबी लीली, निशीगंध अशी फुल जेव्हा गच्चीवरील बागेत फुलता तेव्हा त्याचा सुंगध सर्वत्र दरवळतो वातावर प्रसन्न होते
ReplyDeleteछान लेख होता वाचुन बागेत जाऊन काही वेळ घालवला👌🏻👌🏻👌🏻
फुल तर सर्वच छानच
ReplyDeleteअसतात. निशिगंध मात्र
औरच असतो.