Skip to main content

खेळ गच्चीवरील-१ ( गच्चीवरील गमती जमती )

                                                                                                              खेळ गच्चीवरील-१
                                                                                                        ( गच्चीवरील गमती जमती )
                                                             

                                                          आत्ताच्या मुलांना प्रश्न पडतो की आमची पिढी जेव्हा लहान होती, तेव्हा काय करत असे ? , वेळ कसा घालवत असे? , मनोरंजन कसे काय होत असे ? वगैरे वगैरे ,कारण आमच्याकडे भ्रमणध्वनी काय , पण दूरध्वनी सुद्धा नव्हता फार कुणाच्या घरात . संगणक नाही , इंटरनेट नाही . दूरदर्शन संच आमच्या घरात मी बारावीत असतांना आला . कारण मी दहावीत असे पर्यंत आमच्या गावातच दूरदर्शन दिसायची सोयच नव्हती . पुण्या-मुंबई हुन कुणी बदली होऊन आले तर त्यांना त्यांचा दूरदर्शन संच खोक्यात नीट बांधून सरळ माळ्यावर ठेवून द्यावा लागत असे .  एकच एक रेडिओ तेव्हढा होता . तो काय असतो ते आजच्या पिढीला माहिती पण नाही . रेडिओ वर पण ठरावीक वेळी ठरावीक कार्यक्रम असत , तेव्हढाच त्याचा वापर करता येई . तोही मुलं जवळ जवळ वापरतच नसत . मोठी माणसंच बातम्या ऐकण्याकरीता वापरत आणि काही ठराविक वेळ गाणी लागत , ती ऐकण्याकरीता . बाकी वेळ तो एका कोपऱ्यात शांतपणे बसलेला असे . 
                                                            मग आम्ही काय करत असू ? आम्हाला खेळायला इतके वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते की कायमच वेळ कमी पडत असे खेळायला ! चौधरी सदन मध्ये राहत असे पर्यंत संध्यकाळ झाली , उन्ह जरा कमी झाली , की आमचा मोर्चा दररोज न चुकता गच्चीवर वळत असे आणि आमच्या बरोबर आजूबाजूच्या मैत्रिणी . सगळ्या जमल्या की खूप वेगवेगळे खेळ खेळत असू . बरं या खेळांना साहीत्य असे काहीच लागत नसे . जर काही साहित्य लागत असेल , तर सगळ्यात मिळून एकच असे . तेच सगळ्या आळीपाळीने खेळत असू , त्याचा कधी वैतागही आला नाही . आपला नंबर येईपर्यंत जो खेळत असे त्याचा खेळ बघणे आणि आपसात गप्पा-टप्पा , टिंगल-टवाळी चालत असे . 
                                                          पकडा-पकडी , लंगडी-पळकी , सोनसाखळी , रंगात-रंग , विष-अमृत , नदी की पहाड , धावण्याच्या शर्यती , लंगडीच्या शर्यती ,असे काय काय खेळ खेळत असू . हे असे खेळ की ज्यांना एकही साहित्य लागत नसे . फक्त सगळ्या एकत्र जमल्या की बास धम्माल मस्ती सुरु . त्यातही आमचे एकत्र कुटुंब , त्यामुळे कायम चिल्ली-पिल्ली असतंच आमच्या बरोबर खेळतांना . मग ते कच्चा लिंबू . कितीही वेळा बाद झाले तरी त्यांना खेळत राहण्याची मुभा असे . पण त्यांना ते अजिबात आवडत नसे . मग कधी कधी त्यांना सुद्धा राज्य द्यायचा संधी द्यावी लागत असे . उगाचच जोरात धावायचे नाटक वगैरे वगैरे . त्यातल्या त्यात धावा-धावी असेल तर ठीक , पण लंगडी घालायची वेळ आली की अजून धमाल . काहींना छान जमत असे लंगडी घालून धावणे तर काहींना नाही . मला तर काही फारशी जमेन नसे   आणि लंगडी सुद्धा कधी या पायाने तर कधी त्या पायाने घालत असे . अजून आज सुद्धा माझा गोंधळ उडतो नक्की कुठल्या पायाने लंगडी घालायची ते . 
                                                       बाकी खेळांपैकी एक म्हणजे दोरीच्या उड्या . आम्ही कितीही जणी जमलो खेळायला , तरी सगळ्यात मिळून एकच दोरी असे . ती पण विकत आणलेली नाही . घरीच काही कामाने(खाट विणण्यासाठी किंवा शेतात काही कामासाठी) सुताचा दोर आणलेला असे , त्यातला कापून दिला जाई . त्याची वीण सुटू नये म्हणून दोन्ही टोकांना जाड गाठ मारलेली असे . त्याच दोन्ही गाठी दोन हातात धरून आम्ही दोरीच्या उड्या मारत असू . एकेकीचा नंबर असे . पायात दोरी अडकली की बाद , मग दुसरीचा नंबर . एका दमात शेकड्याने उद्या मारत असू आम्ही , मग प्रत्येकीच्या हजार उड्या होईपर्यंत हा खेळ चालत असे . अशा जवळ जवळ दररोज आम्ही दोरीच्या उड्या मारत असू चौधरी सदन मध्ये असे पर्यंत . दोरीच्या उड्यांचा आणि एक प्रकार , दोरीचे दोन टोकं दोघी जणींना पकडायचे आणि दोरी सरळ करून दोन टोकांना उभे राहायचे . या दोघी मग ती दोरी गोल गोल फिरवणार आणि बाकीच्यांनी या दोरीवर उड्या मारायच्या , एकावेळी एक , दोन ,तीन अशा मुली एकदम उड्या मारत . धमाल यायची यात सुद्धा . कारण दोरी फिरवणाऱ्या मुली वेगळ्या आणि उद्या मारणाऱ्या वेगळ्या . उड्या मारणाऱ्या मुलींनी बरोब्बर दोरीच्या फिरण्याचा अंदाज घ्यायचा आणि उड्या मारायच्या , एक वेगळेच कौशल्य !   
                                                     लंगडीची घर . हा आमचा आणि एक आवडता खेळ. या खेळाला मात्र एक साहित्य लागत असे . ते म्हणजे ठीक्कर ! ही मात्र प्रत्येकीची वेगवेगळी असे आणि सहसा कुणी कुणाला आपली ठीक्कर देत नसे . कारण ज्याची त्याची ठीक्कर ज्याला त्याला लकी असे . तर ही ठीक्कर म्हणजे एक अगदी छोटासा फरशीचा तुकडा . पण किती जीव असे प्रत्येकीचा आपापल्या ठीक्कर मध्ये ! तर या लंगडी च्या घरांची तीन प्रकारची रचना असत . त्यापैकी एका प्रकारात सहा चौकोन असत , एका प्रकारात आठ आणि एका प्रकार म्हणजे इंग्रजी घर ! यात सात चौकोन असत आणि ह्या प्रकारची घरं खेळायला खूप सोप्पी ही असत . पण या प्रकाराला आम्ही इंग्लिश घर का म्हणत असू हे आजतागायत मला माहीत नाही. या पैकी आम्ही आठ चौकोनांची रचनाच जास्त वेळा खेळत असू . जवळ जवळ रोजच खेळल्याने आम्ही अगदी पटाईत झालेलो .  मग आम्हीच हळू हळू करत खेळाचे नियम कडक करत गेलेलो . शेवटचा कडक नियम म्हणजे एका घरात फक्त एकदाच ठीक्करला स्पर्श करून ढकलायचे आणि ती पुढच्या घरात गेली पाहिजे . तसे नाही झाले आणि ठीक्कर त्याच घरात राहिली की बाद  . एक जण खेळत असली की  सगळ्या तिच्या पायाकडे आणि ठीक्कर कडे बारीक लक्ष ठेवत असत !
                                                   वरील दोन्ही खेळ खेळतांना जीचा डाव असे ती खेळे , बाकी सगळ्यांची भूमिका फक्त बघ्याची असे . ह्या रिकाम्या वेळचा आमची आई (आजी) चांगलाच फायदा घेत असे . खर तर यात तिचा काही फायदा नव्हता , आमचाच फायदा होता . पण हे आज समजतंय मला आणि ती आज आमच्यात नाहीये . तर या काळात आमच्या डोक्यात भरपूर उवा असत . तिला आमचे खेळ साधारणपणे माहिती असत . मग आम्ही गच्चीवर गेल्यावर थोडा वेळाने ती कंगवा , फणी घेऊन वर येत असे . तिला वर येतांना पहिले की आम्ही जाम वैतागत असू , कारण ती का आली हे माहित असे . त्यातल्या त्यात मी जास्त वैतागे कारण ती जास्त माझ्या पाठी लागे . त्याला कारणही तसेच होते . माझे केस अतिशय कुरळे आणि खूप दाट . त्यामुळे माझ्या डोक्यात जास्त उवा आणि त्या काढायला सुद्धा खूप जास्त त्रास पडे . मग मला या सगळ्या प्रकरणाचा फार राग आणि खूप खूप वैतागही येत असे . अजूनही मला उवांची भयंकर भीती वाटते . नशिबाने लेकीच्या डोक्यात कधी झाल्या नाहीत . पण गेले दोन वर्ष मी एका शाळेत एक खास शिक्षक म्हणून काम केले . त्या काळात माझ्या विद्यार्थिनीच्या अंगावर दोन वेळा उवा चालत असलेल्या मी पहिल्या . दोन्ही वेळा मी घाबरून जोरात ओरडलेच आणि तिच्या पालकांना लगेच कल्पना देऊन त्या उवांचा नायनाट करण्यास सांगितले . या वेळी माझे नशीब थोर म्हणून त्या माझ्या पर्यंत आल्या नाहीत . देवाचे मनःपूर्वक आभार यासाठी !
                                                   अजून एक आवडता खेळ म्हणजे विटी-दांडू ! विटी म्हणजे लाकडाचा लहानसा तुकडा आणि दांडू म्हणजे फुटा-दीड फुटा ची लाकडाची काठी . हे सुद्धा चौधरी सदनच्या गच्चीवर खेळायचो ! सचिन आणि धोनी यांचे षटकार मारून जीतके चेंडू मैदानाच्या बाहेर गेले असतील , त्याच्या कित्येक जास्त पटीने आमच्या विट्या गच्चीबाहेर गेल्या !
                                                  लपंडाव फारसा खेळत नसू . कारण लपायला फारशा जागा नव्हत्या . ज्या होत्या त्या इतक्या माहितीच्या होत्या की त्यामुळे खेळातील मजाच निघून जाई . आंधळी कोशिंबीर मात्र बऱ्याचदा खेळातअसू . यात मात्र जाम धमाल येत असे . ज्याच्यावर राज्य तो जाम हैराण होत असे .  बैठ्या खेळांपैकी माझ्या मामाचं पत्र हरवलं सुद्धा बऱ्याचदा खेळत असू . या दोन्ही खेळांना एक रुमाल लागे . मग तो ठरवून आणावा लागे त्यादिवशी किंवा अचानक ठरले तर खाली जाऊन आणावा लागे . 
                                                  तेव्हा आमच्याकडे एक तीन चाकी सायकल होती . अर्थातच सगळ्यांची मिळून एक . पण ही लोखंडी होती . आजच्या सारखी प्लास्टिकची नाही .  छान ऐसपैस होती . पुढे चालकाच्या जागी एक जण आणि मागे एक जण असे दोन जण बसू शकतील अशी होती . मग आळीपाळीने एक एक जण बसत असे . सायकल जोरात पाळावी म्हणून मागून एक जण ढकलत सुद्धा असे . मग साहजिकच ढकलण्यासाठी सुद्धा आळीपाळीने एकेकाचा नंबर असे . या सगळ्या खेळण्याच्या गडबडीत ताई सायकल मागून ढकलत असतांना तिचा पाय एका लाकडी तुकड्यावर पडला , ज्याला एक खिळा होता आणि त्याचे टोकदार टोक वर होते . हे टोक तिच्या तळपायाला टोचले होते आणि अक्षरशः भळाभळा रक्त आले होते तिच्या पायातून आणि आम्ही जामच घाबरून गेलो होतो . बापरे आज लिहीतानांही पोटात पिळवटून आले .    
                                                   आम्हा बहिणींचा एक लाडका मित्र होता आणि अजून आहे अगदी जन्मापासून . तो म्हणजे आमचा धाकटा काका ! तो आमच्यापेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठा . त्यामुळे तो आमचा मित्र आणि त्याचे मित्र सुद्धा आमचे मित्र . मग हे सगळे चौधरी सदनच्या गच्चीवर त्यांचे खेळ खेळत . एक म्हणजे पतंग उडविणे . मग आमची पण त्यांच्यात लुडबुड चाले . त्या पतंगीचे पण किती नखरे ... लांब शेपटी पाहिजे , हा मांजा , ती चक्री असे एक ना अनेक . पुन्हा फाटला की त्याला चिकटवा . मग या सगळ्यात आमची थोडी मदत , थोडी लुडबुड , कधी क्वचित ओरडा सुद्धा असे. मग प्रत्यक्ष उडविताना कधी हातात पतंग घेऊन उंच उडी मारून उडवायची संधी मिळे तर कधी मागे उभे राहून चक्री पकडायची , तर कधी आकाशात उंच उडालेल्या पतंगीचा मांजा धरून खरोखरीच पतंग उडवत असल्याची संधी मिळे , हेच मला फार रोमांचक वाटे . पण तेव्हढ्यात का आजूबाजूच्या कुणी पतंगावर पेच टाकून पतंग कापण्याचा प्रयत्न केला , तर मात्र जोरात धावपळ , आरडाओरडा चाले . मग काका लगेच मांजा त्याच्या हातात घेऊन पतंगावर ताबा मिळवे आणि आपली पतंग वाचवत असे ! बापरे आता लिहिता लिहिता सुद्धा किती धडधडले मला हे सगळे आठवून ! 
                                                  हे सगळे क्रिकेट सुद्धा खेळत पण ते मैदानावर जाऊन . पण मग ते सगळं साहीत्य बॅट , बॉल , ग्लोव्हज , पॅड्स , स्टॅम्पस वगैरे वगैरे घरी आणत . मग आम्हालाही वाटे हे सगळे घालून आपणही खेळावे यांच्या सारखे . पण ते सगळेच आकाराने एकदम मोठे .  चेंडूला तर काका हातच लावू नका म्हणे . कारण फार जड , तो पायावर पडला की झालेच . पण कधीतरी फारच हट्ट केल्यावर त्या चेंडूने खेळायला तयार होई आमच्याबरोबर . पण अर्थातच चेंडू जमीनीवरून अगदी सरपटून टाकायचा जेणे करून तो आम्हाला लागण्याची शक्यता अगदी कमी असायची . मग आम्ही पण खूष त्या चेंडूने खेळायला मिळाले म्हणून ! 
                                                  असे काय काय खेळत असू आम्ही रोज अगदी अंधार पडे  पर्यंत . थोडा अंधार पडायला लागला की खालून मम्मीची सुद्धा हाक येतच असे . मग मात्र लगेच खाली जात असू . मम्मीने हाक मारली हे एक कारण असेच , पण अंधाराची सुद्धा भीती वाटत असे . मग एकमेकींच्या आधाराने आणि मदतीने खाली जात असू . मग एकदाचे खाली उतरलो , उजेडात आलो की अगदी हुश्श्श होत असे !

आनंदी पाऊस 
गच्चीवरील गमती जमती 
२७ मे २०१९



                                                                            दोरीच्या उड्या 



                                                                             दोरीच्या उड्या 



लंगडीची घरं (इंग्रजी घर )
सहा चौकोनांची आणि आठ चौकोनांची 
लंगडीची घरं 


विटी दांडू 


आंधळी कोशिंबीर 



मामाचं पत्र हरवलं 

तीन चाकी सायकल, अगदी अशीच होती , पण चाकही लोखंडी ,
चालकाची सीट पूर्वी मोठ्या सायकल ची असे तशीच होती 
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूपच दणकट ! 


पतंग 



क्रिकेट 

Comments

  1. लहानपणीच्या खेळांचं इतकं सूक्ष्म धावतं वर्णन वाचून, आम्हालाही 'लहानपण देगा देवा' असे झाले. आमच्या लहानपणीचे खेड्यातील खेळ अगदीच गावंढळ कशा प्रकारचे होते. चला, काही वेळ का होईना आम्हीदेखील चौधरी सदनाच्या गच्चीवर रमून गेलो होतो. जुन्या जमान्यातील जुवांचे(उर्फ उवांचे) वर्णन वाचून आता नामशेष झालेल्या ढेकणांची आठवण झाली.
    हो! ढेकणांनी भिंती रंगवायच्या हा एक आमचा खेळ होता.असो, लिखाण वाचून आनंद झाला.एक औपचारिकता म्हणून
    'धन्यवाद'.

    ReplyDelete
    Replies
    1. नाना , सगळ्यात आधी मनःपूर्वक धन्यवाद !🙏 असा छान आणि सविस्तर अभिप्राय दिल्या बद्दल😍 ! तुमची माझ्या आधीची पिढी , त्यामुळे तुमचे खेळ आणिच वेगळे असतील निश्चितच . सगळ्यांनाच आवडले ह्या खेळांबद्दल वाचायला सुद्धा😇 ! आणि हो तुम्हाला वाटतेय तसे ढेकूण आणि उवा (जुवा-खास खान्देशी शब्द 😆😆)दोन्हीही नामशेष झालेले नाहीत . अजूनही आहेत बऱ्याच ठिकाणी . कधीतरी surprise भेट😜😜 होईल तुमची त्यांच्याशी . कारण काही वर्षांपूर्वी मलाही असेच वाटत होते . पण माझी सुद्धा त्यांच्याशी अशीच आश्चर्यकारक रित्या भेट झाली आणि मी खूप दचकले आणि घाबरले सुद्धा😮😫😲 !

      Delete
  2. खूप छान वर्षा.. परत तेच खेळ खेळावेसे वाटत आहे.. आपले मुले तर हे खेळ क्रिकेट सोडून खेळलेच नाही gg..

    ReplyDelete
    Replies
    1. मनीषा तुझा अभिप्राय वाचून माझ्या मनात एक कल्पना आली😇 . हे सगळेच खेळ आताही खेळणे शक्य आहेच की😊 ! सगळ्या महिन्यातून एकदा भेटता तेव्हा दर महिन्याला एक खेळ थोडा वेळ तरी खेळणे शक्य होईल . करून बघायला हरकत नाही आताही तितकीच किंवा त्या पेक्षा जास्त मज्जा येईल💃💃😍😍 आणि बालपण परत अनुभवता येईल !😎😎😍

      Delete
    2. सागरगोट्या पाठवू का? चिंचोके, सीताफळाच्या बिया, आठवतात का?
      आम्ही मुले बहिणींनी सोललेल्या कलिंगड व खरबुजच्या बिया खाऊन टाकत असू

      Delete
    3. नक्की पाठव . मला हव्या आहेत कधीपासून . खूप सारे धन्यवाद !🤩😇

      Delete
  3. वर्षा असे वाटते की पुन्हा त्या दुनियेत जाता यावे

    ReplyDelete
    Replies
    1. कुणाचा अभिप्राय आहे कळत नाहीये 🤔. पण खरंच मन खूपच छान रमते या दुनियेत 😇! आपण मार्ग शोधत रहायचे , या ना त्या मार्गाने आपल्याला हव्या त्या दुनियेत काही काळ तरी जाताच येते !😍🤩💖 धन्यवाद !!!🙏

      Delete
  4. अगदि बालपणात पुन्हा नेउन ठेवल,मी पण विचार करायला लागली आम्हि कुठले कुठले खेळ खेळायचो ते.

    ——सोनल चौधरी.

    ReplyDelete
    Replies
    1. सोनल मनःपूर्वक धन्यवाद 😊! आठवं तू सुद्धा तुझे लहानपणीचे खेळ आणि सांग मला 😃. आवडेल मला ते सगळं ऐकायला तुझ्या कडून !😍❤

      Delete
  5. थोड्या वेळा करिता का होईना(वयाने) मोठे पणाच्या तनावयुक्त आयुष्यातून बालपणीच्या आनंदमय वातावरणात गेल्यासारखे वाटले

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय ! आणि फार महत्वाचे सुद्धा 😊! या ना त्या , आपल्या आवडत्या आठवणीत रमून वर्तमानातील तणावातून थोडा काळ का होईना बाहेर पडता येते ! 😍😇नाव नसल्याने कळत नाहीये कुणाचा अभिप्राय . मनःपूर्वक धन्यवाद !!🙏

      Delete
    2. मी विलास किनगे

      Delete
  6. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏मनीष 😍😇!! खूप छान वाटले तुला इथे बघून !!! 😍😍

      Delete
  7. Khup chan Tai, lahanpani che diwas khup chan hote, ,😊
    Nikhil

    ReplyDelete
    Replies
    1. बालपण देगा देवा💃💃💃 ! सारखेच वाटत असते सगळ्यांना😇 ! ती तर या सगळ्यात छान लहानपण परत जगते आहे !! 😇😍💖

      Delete
  8. Khupch Chan lahanpan upbhoglyasarkhe watle

    ReplyDelete
  9. खुप छान 👌👌 वाटले ग तुझा अभिप्राय वाचून मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. काकू खूप सारे धन्यवाद 🙏! अशाच इथे नियमित भेटत जा , खूप आनंद होईल मला ! 😍😇💖

      Delete
  10. Replies
    1. खूप सारे धन्यवाद 🙏! 😍😇

      Delete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. helo hold on ......u need to read properly ....this is just part 1 ....if u read it carefully ......n games which we used to play on tarrace only . the articles is just not about the games of our generation. u need to have some paitence

      Delete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. Hy varshali gacchiwaril khel aawadla mind parat balpanat gele study finish karun khelto kadhi aani kiti khello tari time kami padun andhar pathopath aaichi hak kani aani bhawndasobat andharat dhadpadat utarne hesare lahanpani anubhawle aahe kharech maan tajetawane zale hi tuze likhanachi jadu aahe all best pudhil likhanasathi

    ReplyDelete
    Replies
    1. काकू मनःपूर्वक धन्यवाद 🙏! हो वाचणाऱ्याच्या मनाला भरभरून आनंद देणे हाच मुख्य हेतू😍😇 ! तुमच्या सारख्या वाचकांमुळे , तुम्ही केलेल्या कौतुकाने मला छान हुरूप येतो पुढचे लिखाण करायला😇💖💕 !!! असेच कायम तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी असू द्या !!! 😊😍😇

      Delete
  14. मंदा चौधरीDecember 01, 2019 5:02 pm

    परत सगळं अनुभव घ्यायचा आहे असे वाटते आहे आणि मला वाटते तू अनुभवत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. yesssssssssssss totally!!!!! मी तर गेले काही  महिन्या पासून चौधरी सदनातच राहतेय !!!!💃💃💃

      Delete
  15. सरस्वतीDecember 01, 2019 6:51 pm

    वर्षे खूप भारिईईईईई

    ReplyDelete
  16. एल झेड कोल्हेJanuary 18, 2020 12:40 pm

    बालपणी गच्ची मैदानात पारंपारिक अनेक खेळ खेळून आनंद लुटलेला दिसतआहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना , अगदी खरंय , जाम मज्जा अली तेव्हा आणि आता आठवताना सुद्धा आणि वाटतेय खरंच सगळ्या बाजूंनी आमचे बालपण किती सुंदर आणि श्रीमंत होते !😍🤩😇

      Delete
  17. युवराज्ञी ढाकेJanuary 29, 2020 3:46 pm

    जुने दिवस आठवले

    ReplyDelete
  18. खूपच छान वास्तविक लिहिले आहेस.अक्षरशः बालपण आठवले.आज काल असे खेळ मुले कोणीही खेळत नाहीत.त्यांना सर्व ऑनलाइन खेळांची आवड निर्माण झाली आहे.त्यामुळे आज मुलांचा फिटनेस चा पण प्रश्न निर्माण झाला आहे.
    सुंदर लिखाण ����

    ReplyDelete
    Replies
    1. सर्वस्वी मुलांना दोष देणे बरोबर नाही. त्यांना खेळायला मैदान नाही अणि घरबसल्या खूप सारे gadgets उपलब्ध आहेत अणि सोबत नाही कुणाची....
      असो प्रत्येक generation च्या वेग वेगळ्या.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  19. रम्य ते बालपन ।।। मला वा ट ते सगल्याना स्वताचे बालपन आठवले असावे ।।।।

    ReplyDelete
    Replies
    1. ते आठवावे अणि काही क्षण तरी त्यातील आनंद मिळावा हीच माझी ईच्छा आहे 😊छान वाटले तुला आज ईथे भेटून!

      Delete
  20. छानच लेख आहे. मी माझ्या मुलांना आजीच्या गावाकडे गेलो की मुद्दाम हे सारे खेळ त्यांच्या मावस बहिनिंबरोबर खेळायला लावते. खूप मज्जा येते त्यांना. परवाच लॅपटॉप चा data transfer करताना लेकाचे जुने लंगडीचे व्हिडिओ सापडले. आनंदच सापडला जणू...

    ReplyDelete
    Replies
    1. जागा अणि सोबत असेल तर मात्र त्यांना नक्किच हे सगळे खेळ खेळायला लावले पाहिजे अणि शिकविले पाहिजे!
      सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
  21. प्राजक्ता डोंगरेMay 05, 2020 4:12 pm

    Mastach g... June khel khup miss karato aapan��... Nahitar aajchi mula nusti digitally busy astat... Unadpana nahich mahit tyana .. Matit pan nahi khelat kay t dirty mhane��

    ReplyDelete
    Replies
    1. ह्म्म्म त्यांना दोष देवू नकोस, परिस्थिती तशीच आहे, ते तरी काय करणार?
      आपण मात्र हे सगळे खूप miss करतोय हे मात्र नक्की ! ☺️

      Delete
  22. छान वर्णन ..... मजा आली. गच्चीवर कधी गोट्या (कंचे) नाही खेळलीस का? अंगणापेक्षा सपाट जमीन असल्याने खूप इकडे तिकडे घरंगळत जायच्या, त्यामुळे नेम धरणे सोपे व्हायचे. लिहिती रहा...!

    ReplyDelete
    Replies
    1. हा भाग 1 आहे ना? थोडी कळ काढ, मिळेल तेही वाचायला.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  23. युवराज्ञी ढाकेMay 05, 2020 4:14 pm

    Khupach chan

    ReplyDelete
  24. निलिमा झोपेMay 05, 2020 4:52 pm

    Aatachya ya corona chya tension madhe tuza lekh lahanpanichya aathavni deun manala halke karato khup sunder aathavani aahet v tu lihilya pan agdi chan khup mast ashich lihit raha ��������

    ReplyDelete
    Replies
    1. वावा, खुपच छान वाटले, तुझी ही प्रतिक्रिया ऐकून!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊

      Delete
  25. प्रियंवदाMay 05, 2020 4:55 pm

    Khupach chhan hote te diwas

    ReplyDelete
    Replies
    1. Very happy to hear from you today!!!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  26. Akka mast !! me pan khelate ahe ase watale.

    ReplyDelete
  27. सतीश कुलकर्णी, पुणे
    सध्या दररोज सायंकाळी दोन तास गच्चीवर जातो आम्ही ... तेव्हा तुझ्या गच्चीवरच्या गमती जमती खुप जवळच्या वाटल्या...
    किती साध्या वातावरणात किती आनंदी होतो आपण ....
    धन्यवाद व खखुप शुभेच्छा तुला..

    ReplyDelete
    Replies
    1. खरचं गच्ची सारखा आनंद नाही या जगात.!
      भाग्यवान आहात, मी मात्र या आनंदाला मुकलेले आहे.
      मात्र सोबतीला या सुंदर आठवणी आहेत.
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  28. प्रतिभा अमृतेMay 07, 2020 1:47 pm

    खरच खेळकर लेख. लहानपणीचे सगळे खेळ परत खेळताना (?)मज्जा आली. विशेषतः ठिक्कर आणि दोरीच्या उड्या. मी एकदम expert होते. सध्याच्या पिढीला त्यातली गंमत कळणे कठीण. गच्चीवरचे खेळ खूपच धम्माल.

    ReplyDelete
    Replies
    1. अरे व्वा आपले हे पण सेम सेम ठीक्कर आणि दोरीच्या उड्या!
      खुप सारा आनंद आणि खूप सारे धन्यवाद 😍

      Delete
  29. किशोरीMay 07, 2020 2:42 pm

    Mi atahi shalet mulanbarobr langdi khelte��
    Ajhi ever green games ahet te awdiche
    Pn uuwa ������Nako nako

    ReplyDelete
    Replies
    1. U r too lucky!!!खरंय उवा अगदीच नको.
      धन्यवाद 🙏

      Delete
  30. Kishor ChaudharyMay 08, 2020 12:45 pm

    अरे बेटा खरच आधी वाचलं नव्हतं पण नंतर तुझा म्यासेज वाचून नंतर तुझं लिखाण वाचले आणि एकदम पाचवीत ,सहावीत असल्या सारखेच वाटले लहानपणी बाबांसोबत घोटी वरून चौधरी सदन वर आलो तेव्हाची आठवण झाली, फारच सुंदर लिखाण, अगदी लहान पण समोर आल्यासारखे वाटले, इतके लांबलचक लेख वाचायला नातींमुळे वेळ मिळत नाही, लहान नात,पूर्वा उठल्यापासून आई बाबा, आजी सोडून फक्त दादा पाहिजे असतात, तरी असो, तुझा लेख अगदी अप्रतिम����������������

    ReplyDelete
    Replies
    1. अरे बापरे, घोटी ला होता का? 🤔 हे आजच कळले मला!
      असो वेळात वेळ काढून वाचल्या बद्दल धन्यवाद 🙏 😊

      Delete
  31. खरच खुपच छान लेख माझ बालपण खेड्यातल पुन्हा एकदा लहान पण देगा देवा अस वाटत सौ सावऴे

    ReplyDelete
  32. खरच खुपच छान लेख माझ बालपण खेड्यातल पुन्हा एकदा लहान पण देगा देवा अस वाटत सौ सावऴे

    ReplyDelete
    Replies
    1. ह्म्म्म, बकालपणाला पर्याय नाही अणि ते एकदाच मिळते ..... पण आपण आठवणीतून परत परत त्याचा आनंद घेऊच शकतो!!!
      मनापासुन आभार 🙏 😇

      Delete
  33. Refresed the old memories down the lane....such beautiful description and excellent superlative

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
      नाव नाही, त्यामुळे आपण कोण समजले नाही...

      Delete
  34. रेखा अत्तरदेNovember 10, 2020 2:21 pm

    लेख वाचून मला एक मजली होते ते घर आठवले आणी आमचे बालपण आठवले खूप अंगणात खेळायचो आम्ही आणी लिंबाच्या झाडाची खूपछान सावली असायची रहदारी अजिबात नव्हती त्यावेळेची शांतता खूप आठवते खूप आठवणी आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. वावा मस्तच ! हे एक मजली घर आम्हाला अनुभवायलाच नाही मिळाले . याच्या सगळ्या गमती जमती आणि गोष्टी मात्र सगळ्यांकडुन ऐकायला मिळतात वेळोवेळी . सप्रेम धन्यवाद ही छान आठवण सांगितल्याबद्दल !😇🤩🥰💖

      Delete
  35. रंजना राणेNovember 10, 2020 2:54 pm

    तुम्ही जे वर्णन केलेले आहे ते सगळे खेळ आम्ही पण खूप खूप खेळायचो खरंच आठवणींना उजाळा ड्रॉइंग पण खूप छान आहे तुमचे����������������������������

    ReplyDelete
  36. वावा मस्तच !मनःपूर्वक धन्यवाद 🙏 🤩😇

    ReplyDelete
  37. अरे व्वा मस्तच. आपला लेख आम्हाला बालपणीच्या काळात घेऊन जातो... सर्व पारंपरिक खेळ माला परिचयाचे, पण आम्ही आईचं पत्र हरवलं हा खेळ खेळत असू..असो.. सर्व रेखाटलेली चित्रे खूपच छान.
    गच्चीच्या अवकाशमानाच आकारमानाची सुंदरता हि एकत्रं खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळामुळे वाढते,लेखनवर्णनातून दिसतो.

    ReplyDelete
    Replies
    1. आमच्याकडे मात्र मामाचं पत्रच ! सगळ्या कौतुकाबद्दल खूप सारे धन्यवाद !🤩😇😍

      Delete
  38. माला की न ई हा लेख खूप खूप आवडलाय.आणी १नंबर अप्रुपच असं वर्णिले आहे जणू डोळ्यासमोर चित्र ऊभ राहतयं. चित्रें ही सुरेख रेखाटलेली आहेत,चित्रातील निळ्या झग्यातील खेळणारी मुलगी ही माला तुमच्या सारखी दिसते.तीन चाकी सायकलीचा खेळाचा किस्साही आवडलाय.
    सारयाच खेळांची प्रत्येकाची एक वेगळीच मजा काही औरच आहे.
    माला क्रीकेटहा खेळ जाम आवडतो खेळायला
    तुम्ही रूमालपाणी,भोवरा,काचाकवड्या,भाकरया मारणे हे खेळ खेळले का?नक्किच हे खेळ आपण परत खेळू.

    ReplyDelete
  39. मला माझे बालपण आठवले. आपल्याकडच्याच काय पण त्या काळातील बहुतेक सर्व मुली या खेळ खेळतच. लंगडी खेळतांना एखादी रतडी देणारी असायचीच आऱ्णि तुमच्या चित्रांव्यतिरिक्त अजून एक वेगळ्या प्रकारे आखत असू. , दोरीवरच्या उड्या आता मारायला हव्यात पण आता जमत नाही😢आम्ही दुपारच्या वेळी घरात चौपट आणि पत्त्यांमध् बदाम सात , झब्बू व इसपिकचोर पण खूप खेळायचो . शाळेत खो खो व थ्रो बॅाल हे खेळ खेळायचो. १-२ वर्ष कबड्डी मधेपऱ्क्रिन भाग घेतला हेता. क्रिकेट , गोट्या , पतंग हे मी कधीच खेळले नाही. समृध्द बालपण जगलीय आपली ती पिढी.

    प्रा. सौ. वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...