जेवणाची संध्याकाळ
(गच्चीवरील गमती जमती)
हल्ली बऱ्याच गोष्टींच्या व्याख्या आणि कारणं सुद्धा बदलली आहेत . काही काळाची गरज म्हणून , तर काही वेळा नवीन आधुनिक जीवन पद्धती म्हणून . त्यातील एक म्हणजे जेवण ! हल्ली बऱ्याच कारणांनी बाहेर जाऊन जेवण केले जाते . ह्याही पुढे जाऊन म्हणजे हव्या असलेल्या अन्नाचे पुडके मागविणे किंवा जाऊन घेऊन येणे . काही वेळा बदल हवा असतो म्हणून बाहेर जेवायला जातात , किंवा काही कारणं असतात म्हणून . कधी वाढदिवस , कधी लग्नाचा वाढदिवस , कधी निकाल , कधी बढती मिळालेली असते , कधी आलेल्या पाहुण्यांचा आग्रह , कधी केळवण , कधी निरोप समारंभ , कधी किटी पार्टी , कधी जुन्या मित्रांचे किंवा नातेवाईकांचे स्नेहसंमेलन , अशी एक ना अनेक असंख्य कारणं असतात . कधी कामाने बाहेर गेलो म्हणून , घरात खूप जास्त काम होती म्हणून , घरात कीटक नियंत्रण केले म्हणून , घरातील गृहिणी आजारी आहे म्हणून , कधी गृहिणी बाहेर गावी गेलीय म्हणून अशा बऱ्याच वेळा , गरज म्हणून सुद्धा बाहेर जेवावे लागते , किंवा अन्नाचे पुडके आणावे लागते .
आमच्या लहानपणी बाहेर जेवायला जायचे याचा अर्थ फारच वेगळा होता . आज जसे बाहेर जेवणे म्हणजे हॉटेल मध्ये जाऊन जेवणे , तसे आमचे तेव्हा नव्हते . बाहेर जाऊन जेवण करत असू , पण घरून सगळा सैपाक करून तो डब्यात घालून न्यायचा आणि जिथे ठरले असेल त्या ठिकाणी जाऊन जेवायचं . माझ्या मम्मीला बाहेर मोकळ्या हवेत जाऊन जेवायला फार आवडत असे , मग तिच्या ह्या आवडीतून , तिच्या मनात अशा वेगवेगळ्या कल्पना यायच्या . मग आमची धमाल होई !
ह्या लेखनाचा विषय चौधरी सदन . त्यामुळे आज चौधरी सदनाशी निगडीत , पण बाहेर जेवण्याची गम्मत गोष्ट आहे . आता चौधरी सदनाशी निगडीत तरी बाहेर ? गम्मतच आहे की नाही !! बाहेर म्हणजे घराबाहेर , पण चौधरी सदनातच ! तर अशी जागा म्हणजे चौधरी सदनाची गच्ची !!!
अधून मधून एखाद्या संध्याकाळी आमचे ठरत असे संध्याकाळी गच्चीवर जेवायचे . आम्ही बहिणी तशा फारच लहान होतो . चौधरी सदन सोडले तेव्हा मी जेमतेम अकरा वर्षाची होते . एकदा का ठरले आमचे गच्चीवर जेवायचे , की आम्ही एकदम खुश . कोण उत्साह संचारत असे आमच्यात ! काय करू नि काय नको असे होऊन जाई . स्वयंपाकात काही मदत करता येत नसे , पण वरची छोटी छोटी कामं करून मम्मीला मदत करण्यात आम्हा बहिणींची कोण तारांबळ आणि धांदल उडे . उत्साह एकदम ओसंडून वाहात असे !!
गच्चीवर जेवायचे म्हणजे काही ठरावीक बेतचं असत आणि ते सगळेच आमच्या आवडीचेच असत . त्यामुळे त्या बेत पैकी कुठलाही बेत असला तरी आम्ही खुश असायचो . खरतर प्रत्यक्ष जेवण करणे हा एक छोटासा भाग असे त्या संध्याकाळचा . एकदाचे ठरले गच्चीवर जेवायला जायचे म्हणजे मम्मी आणि काकूंची सैपाकाची गड्बड चालू व्हायची . त्या दोन-तीन बेतांपैकी कुठला तरी एक बेत ठरायचा .
बेत एक म्हणजे कळण्याच्या भाकरी आणि सोबत दोन रंगाच्या दोन चटण्या . रंगांच्या म्हटले , कारण आम्ही त्या चटण्यांचा रंगानेच उल्लेख करत असू . एक म्हणजे पांढरी चटणी आणि दुसरी लाल चटणी . कळण्याची भाकरी म्हणजे ज्वारी आणि उडीद यांचे दोनास एक प्रमाण आणि चवीप्रमाणे मीठ घालून दळून आणलेले पीठ . हो, मीठ सुद्धा दळणात घातलेले असे कारण सर्रास सगळ्या सैपाकासाठी खडी मीठच वापरले जाई . फक्त पानात / ताटात वाढण्यासाठी बारीक मीठ वापरले जाई आमच्याकडे . या पीठापासून केलेली भाकरी म्हणजे कळण्याची भाकरी . ही भाकरी झाली , की त्याचा मस्त पोपडा काढायचा आणि त्या गरम गरम भाकरी वर तेल घालायचे आणि तो पोपडा परत त्यावर दाबायचा . जेवणाची वेळ होईपर्यंत छान मुऱते मग ही भाकरी . पांढरी चटणी म्हणजे भाजलेले शेंगदाणे , लसूण , हिरव्या मिरच्या , कोथिंबीर आणि मीठ , एकत्र वाटून घेतले की झाली . तेव्हा वाटून म्हणजे अक्षरशः वाटून , म्हणजे पाट्या-वरवंट्याने वाटून केलेली असे चटणी . दुसरी म्हणजे लाल चटणी . लाल चटणी म्हणजे लाल वाळवलेल्या मिरच्या , लसूण , मीठ एकत्र वाटून बनवली जात असे . या लाल चटणी ला आमच्याकडे एक खास शब्द आहे 'निस्त्याची चटणी' , काही वेळा ही आंबट गोड सुद्धा केली जात असे , चिंचेचा कोळ आणि गुळ घालून .
बेत दोन म्हणजे मेथीची पोळी किंवा भाकरी . परत या सोबतही वरील दोन्ही चटण्या असत . तर मेथीची पोळी म्हणजे मेथीचे पीठ , कणिक , हळद आणि मीठ घालून केलेली पोळी , तव्यावर तेल घालून छान खरपूस भाजून घेतलेली . भाकरी म्हणजे फक्त कणकेच्या जागी ज्वारीचे पीठ घालायचे आणि भाकरी सारखी थापून भाकरी करायची . या भाकरीला सुद्धा पोपडा सुटतो . मग या वर सुद्धा पोपडा काढून तेल घालून परत दाबायचा . आम्ही याला प्रेमाने किंवा लाडाने पिवळी भाकरी आणि पिवळी पोळी म्हणतो !
बेत तीन म्हणजे बाजरीची भाकरी आणि ठेचा . बाजरी गरम असते त्यामुळे साधारणपणे हिवाळ्यातच खाल्ली जाते . त्यामुळे हिवाळा असेल तरच हा मेन्यू असायचा . हे पण तसेच , गरमगरम भाकरीचा पोपडा कडून त्यावर तेल घालून परत तो दाबायचा पण तेलापेक्षा तूप छान लागते आणि पौष्टिक सुद्धा ! पण का कोण जाणे आमच्या भागात सगळ्या पदार्थांवर तेलाचं घालून खायची पद्धत आहे . आणि ठेचा ! ठेचा म्हणजे भाजलेल्या हिरव्या मिरच्या , लसूण , कोथिंबीर आणि मीठ , हे सगळे एकत्र लाकडाच्या बडगीत , लाकडाच्या ठेचणीने ठेचून बारीक केलेला असतो . मिरच्या फारच तिखट असल्या आणि खाणारी लहान मुलं असली तर मात्र यात भाजलेले शेंगदाणे सुद्धा सोबत घालून ठेचले जातात .
यापैकी कुठलाही बेत असू दे , सोबत ताकाची कढी , उडदाचे भाजलेले पापड , काही वेळा ज्वारीचे पापड आणि बिबडे , कच्चा कांदा , कैरीचं लोणचं , सिझन असेल तर मुळा , हे सगळे सोबत असायलाच पाहिजे. शिवाय कुठलीही चटणी असो किंवा ठेचा असो , त्यावर खाताना वरून घालायला तेल हवेच . ही झाली सगळी सैपाकाची तयारी . बाकीची तयारी म्हणजे ताट काढणे , पेले काढणे , पिण्याच्या पाण्याच्या एक-दोन घागरी किंवा मडके भरणे . आणि मग एक एक करून गच्चीवर नेवून ठेवणे .
ही सगळी लगबग संपली की मग आमचा सगळ्यात आवडीचा भाग सूरु व्हायचा ! आम्ही मुलं मुलं रोजच संध्याकाळी गच्चीवर येऊन वेगवेगळे खेळ खेळत असू . पण मग ही संध्याकाळ मात्र एकदम खास असे ! कारण या संध्याकाळी आमच्या सोबत आमच्या मम्मी आणि काकू सुद्धा खेळत असत . कधी पळापळी , कधी लंगडी -पळकी , तर कधी लंगडीची घरं , तर कधी सोनसाखळी . जाम धम्माल येत असे आणि जाम आनंद मिळत असे या सगळ्यातून .
मग भरपूर खेळून झाले , की सपाटून भूक लागत असे . मग अंगत पंगत करून जेवायला बसत असू . ताटात सगळं मम्मी , काकू वाढत असत , पण लोणच्याची फोड मात्र आम्ही आमच्या हाताने अगदी निवडून निवडून सगळ्यात मोठ्ठी आणि कोपऱ्याची फोड घेत असू . ती नाही मिळाली तर कधी भांडणं सुद्धा होत . कळण्याच्या भाकरीचा मेन्यू असेल तर मात्र आम्हा प्रत्येक मुलीला मम्मीच्याच ताटात जेवायचे असे . पण सगळ्यांना एकदम तिच्या ताटात जेवणे शक्य नसे . त्यावरून पण भांडणं होत . मग आमची कशीबशी समजूत घालून ती आम्हाला शांत करत असे . पण तरीही प्रत्येकीला मम्मीनेच कळण्याची भाकरी आणि चटणीचा काला कुस्करलेला हवा असे . मग प्रत्येकीला मम्मी काला कुस्करून द्यायची , मग सगळ्यांना काला कुस्करून दिल्यावर शेवटी ती स्वतः करिता काला करीत असे आणि मग जेवत असे . आम्ही मग जेवणावर आडवा हात मारून जेवत . अगदी ओव्हर इटिंग ! इतके खाऊन दमत असू आम्ही की बसल्या जागेवरून उठून उभे राहणेही मुश्किल होई . तो पर्यंत काळामीट्ट अंधार होत आलेला असे आणि घरातील पुरुष मंडळींची घरी येण्याची वेळ सुद्धा . त्यामुळे मम्मी लोकांना खाली जाण्याची घाई झालेली असे . आम्हाला मात्र वाटत असे त्यांनी परत आमच्या बरोबर खेळावे , पण ते शक्य नसे . एक म्हणजे त्यांना खाली जायची घाई आणि दुसरे म्हणजे आमची पोटं इतकी तुडुंब भरलेली असत , की जागचे हलणेच मुश्किल तर खेळणे फारच लांबची गोष्ट असायची !
मग पुन्हा वर आणलेलं सगळं खाली घेऊन जाण्यासाठी वर खाली खेपा कराव्या लागत . पोट तुडुंब भरलेलं असे आवडत्या जेवणाने आणि मनही तुडुंब भरलेलं असे आनंदाने ! मग ती संध्याकाळ संपूच नये असे वाटे . पण ते शक्य नसे . मग आम्ही पुन्हा अशा पुढच्या संध्याकाळची स्वप्नं आणि वाट बघत खाली उतरत असू .
आनंदी पाऊस
गच्चीवरील गमतीजमत
१६ मे २०१९
थापुन तयार भाकरी
तव्यावर भाकरी
टमाटम भुगलेली भाकरी
कळण्याची भाकरी आणि पांढरी चटणी 😍😋😋🤤🤤
मेथीची भाकरी टमाटम फुगलेली
मेथीची पोळी आणि पांढरी 😋😋🤤🤤
बाजरीची भाकरी आणि ठेचा 😃😋😋
निस्ताची चटणी 😜
कळण्याची भाकरी
वॉव अक्का पाहून आणि वाचून तोंडाला पाणी सुटले आहे आणि आता असे वाटते कि आजच सगळे मिळुन संध्याकाळी गच्चीवर जाऊन ते दिवस परत आणावे.
ReplyDeleteनाव नसल्याने कळत नाहीये कुणाचा अभिप्राय आहे . पण खरंच त्या क्षणात जावेसे वाटत्येय परत 😎आणि तिथेच फ्रीझ व्हावेसे वाटतेय😇 ! आणि खार सांगू का मी गेले कित्त्येक महिने या लिखाणाच्या माध्यमातून , मनाने तर चौधरी सदन मध्येच राहते आहे !!!💃💃💕💕👭👭👭👭
Delete😋wow
ReplyDeleteManhi tudumb ani pothi tudumb👌👍chan varanan
वर्षा , खरंच ग , तुडुंब या शब्दाला पर्यायी शब्दच नाही इथे तरी , या क्षणी सुद्धा अनुभवू शकते मी तो सगळा तुडुंबपणा !!!😋🤤😍😍💖💖💃💃
Delete😋😋😋
ReplyDeleteछान लिहले आहेस.
मलाही मोठ्या मम्मीतच जेवायला आवडायचे आणि ती जेवूही द्यायची पण फरक हा की मी असतांना मला COMPETITION ch नव्हती.😇☺
लहान असण्याच्या भरपूर फायद्यांमधला हा पण १ फायदा .
काय जादू🎆🎇✨होती मम्मी च्या ताटात माहित नाही🤷♂️ , आजतागायत कळले नाही , पण सगळ्यांनाच मम्मीच्याच ताटात जेवायला आवडे आणि त्यावरून प्रचंड भांडण ......🤼♀️🤼♀️🤼♀️ आणि सगळ्यात लहान असल्याचा हा सगळ्यात मोठ्ठा फायदा होता तुला नो कॉपीटिशन अट ऑल !!!💖💃😍
Deleteमस्त. पुन्हा एकदा वाचतानाही तीच मज्जा आली...
ReplyDeleteकितीही वेळा वाचले तरी तीच गम्मत यायला हवी , तरच त्या लिखाणाला अर्थ ! तुमच्या सारख्यांच्या सपोर्ट मुळेच खार तर हे शक्य होतेय !!!😍💖💃💕
DeleteMaam jevana baddal ha vishai kithi saadharan asthe pun pratyek vyakti chya mana javal asthe. Mala tumchya ya blog madhe phaar avhadleli gosht mhanje, tya vegveglya prakar chi bhaakri ,lahsun chutney, tehcha aani tumha sarvanchi dhavpal. Kithi chaan pramane varnan keleli hai. Malaa us vaatle ki me pun tithe tumchya sobath hote. You transformed me to a different world
ReplyDeletesarika maam hats off to u😇 !!! just love u for all this !!! 👭💕💃
Deleteवर्णन एवढे अवर्णनीय आहे की वाचताना जिभेला निरनिराळ्या चविंचा स्वाद अनुभवायला मिळतो आणि अस वाटत की आपण एखाद्या माळरानावर बसून वणभोजन करतो आहोत.
ReplyDeleteसर अगदी दोनच ओळीचा अभिप्राय दिलाय पण खूप मोठ्ठी दाद दिलीय माझ्या लिखाणाला !!! खूप खूप मनःपूर्वक आभार !!! 🙏🙏🙏
Deleteकळण्याची भाकरी आणि पांढरी चटणी ���������� wow . Khuuuup varshe zali . . .. Kadhi milel parat khayala . papad pan .... tula athawate Varsha , how we used to finish ur papads at ur rooms terrace when we were in college ? gele te din gele ...
ReplyDeleteवनिता , ते सगळं विसरणे केवळ अशक्य !😇💕 ते एक नवीन सदर सुरु करावे लागेल , "सुगंधी गच्चीवरील आठवणी "😍💕💖 ! पांढरी चटणी आणि कळण्याची भाकरी खायला बरेच ऑपशन्स आहे तुला . तुला आवडेल तो निवड !!!😊😃
Deletehahhaha....... kadhi karayacha mag bet .
Deleteanakhi sobatila wangyache bharit asel tar .... ..... Kya bat hai
Deleteतू सांग कधी करायचा बेत , लगेच करूया😇😍 ! नाही तर या परत विमान विमान खेळत मग करू या😉😉😆😆😜😜 !
Deletewas expecting , u will talk about this too ! वांग्याचे भरीत 🤤😋🤤😋! आता होईलच वांग्यांचा मौसम चालू , तिकडे घरी गेलीस तर मजाच तुझी💃💃💃 !
वनिता , मस्तच वाटले तुझा अभिप्राय वाचून .....!!!😍💖👭
ReplyDeleteवर्णन वाचून भूक नसतांनाही तोंडाला पाणी सुटले. झकास बेत !
ReplyDeleteवावा ! छान दाद दिलीस माझ्या लिखाणाला !! मनःपूर्वक धन्यवाद !
Deleteखूप छान, खरोखरच लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
ReplyDeleteसंगीता खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 😍💖!!!
Deleteसहभोजनाचे आनंदी क्षण छान
ReplyDeleteअगदी साग्रसंगीत वर्णन...
भोजन एक निमित्त असतं
संगतीचं सारं महत्त्व असतं...
मनःपूर्वक खूप धन्यवाद !!!
Deleteकळण्याची भाकर माझी पण favorite आहे :)
ReplyDelete😍😇 कळण्याची भाकर म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय ! पिझ्झा🍕 , केक🎂🍰 सारखा कळण्याच्या भाकरीचा सुद्धा ईमोजी करायला हवाय खरंतर , तूच बघ जमले तर हे काम करायला !😊😃
DeleteHaha..good idea!
Delete😍😇 आयडिया छानच आहे ! पण ती पुढे कशी न्यायाची ते मला माहित नाही . so u need to take some action for this . 😃
DeleteApratim lekh jalgaon chi khadhya sanskruti kalali wachta wachta mi hi maze maher gacchiwar pochle ashich angat pangat bawanda meetrinisobat hoot aase baki yaa chutny bhakrichi chav kontiyach hotel menushi honar nahi pics sunder tondala pani sut te aasech chodhari sadan nigdit aathwaniche pudhi lekh sunder hou de khoop shubhecha
ReplyDeleteकाकू , मस्तच😇! माझ्या आठवणी सगळ्यांना सांगता सांगता , मला तुम्हा सगळ्यांच्या आठवणी सुद्धा मला ऐकायाला मिळत आहे , फारच छान आहे हे सगळे😍💖 ! सगळ्या सगळ्या करता मनःपूर्वक धन्यवाद🙏 !
Deleteफारच छान वाटतंय तुम्हाला इथे भेटायला😍💖❤ !
Very nice.... ..Sometimes it feels like i am actually back to those days...
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !!! आपण कोण कळेल का?
Deleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद😇😍 !!!पण नाव नसल्याने कळलं नाही कुणाचा ते , नाव कळेल का प्लिज ... 🙏🙏
ReplyDeleteअगदी मोजक्या शब्दांत , पण किती छान दाद दिलीय आपण माझ्या लिखाणाला !!!🙇♀️🙇♀️🙇♀️
लेख वाचल्यावर तोंडाला पाणीच सुटले,लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्याबरोबरच संध्याकाळच्या जेवणाचा मेनूहि ठरला.कळण्याची भाकरी, लाल चटणी आणि सोबत मस्तपैकी कढि....
ReplyDeleteछानच.
वावा मस्तच 😍💖!! आता तुमचा मेनू वाचून माझ्या तोंडाला पाणी सुटले😋🤤😋🤤 !! मनःपूर्वक धन्यवाद🙏 ! नाव नसल्याने अभिप्राय कुणाचा ते नाही कळले . नाव कळेल का कृपया ?🤔
DeleteSonal Chaudhari.नाव टाकायच विसरले.
Delete😍😇💖
Deleteखूप छान लिहितेयस अक्का. चौधरी सदनाच्या मला फार आठवणी नाहीयेत पण वाचून जिल्हा पेठेतल्या गच्चीवरच्या आठवणी जाग्या झाल्या.खूप धमाल यायची ग तेव्हा.
ReplyDeleteसगळ्यात आधी मनःपूर्वक आभार🙏 !!! हो खरंय तू म्हणते ते , गांधी नगर च्या घरी मात्र आपण सगळ्यांनीच खूप धम्माल केलीय💃💃💃 !!! असं वाटतंय फिरून येतील का ते दिवस !!?? पण छान अशीच नेहमी भेटत जा चौधरी सदनात !😇😍
Deleteईथंभूत हकिकत क्रमाक्रमाने सविस्तर प्रोग्राम डोळ्यासमोर ऊभा करण्याचि हतोटि वाखाणण्याजोगी च आहे
ReplyDelete💃💃💃💃😇😇😇💖💖💖बाकी काहीही असले तरी तुमच्या कौतुकाला कशाची सर नाही !!!!
Deleteवॉव अक्का खुप छान वाचून तोडाला पाणी सुटले जिल्हा पेठेतील आठवणी ताज्या झाला आम्ही जिल्हा पेठ मध्ये खूप मजा केली वाचून खूप बरे वाटेल
ReplyDeleteखरंय गांधी नगर ला आपण जामच मज्जा केलीय . हे वाचून सगळ्यांना तिथल्याच आठवणी आठवत आहे
Delete😍😇💃
गच्चीतील जेवण मलाही आवडले पण ताेंडी लावायला कांदा व लाेणच नव्हते का?वर्णन वास्तव आहे.
ReplyDeleteसर , आहे की कांदा लोणचे तोंडी लावायला त्याशिवाय कशी मज्जा येणार ! धन्यवाद !!🙏
Deleteखुपच छान ����
ReplyDelete😎🤩
Deleteए भारी.. आजोळच्या अंगणातल्या अन पंढरपुरच्या वाड्यातल्या माडीवरच्या चांदण्यातल्या पंगती आठवल्या..
ReplyDeleteतू प्रत्येकाच्या मनातलं चौधरी सदन जागं करते आहेस..
व्वा.. मजा आली भूतकाळातून फिरून येताना..
या लिखाणाचा मुख्य उद्देश हाच वाचतांना , वाचकाच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर उमटावी हे वाचून आणि स्वतः चे बाळ पण आठवून ! 😍🤩😊💃
Deleteगच्चीवरचा मेनू वाचून तोंडाला खरंच पाणी सुटले. माझ्याही लहानपणीच्या अंगणातल्या जेवायच्या आठवणी आहेत. भाकरी कुठलीही असो, आजही आवडतेच. बाजरी कधी कधी व्हायची त्यामुळे त्याचे अप्रूप जास्त. भाकरी बरोबर हमखास होणारा पदार्थ म्हणजे वांग्याचे भरीत. ������ त्यात हमखास तेलाचा तवंग असायचा. विदर्भात तसेही तेल जरा जास्तच पडते. बेसन पेरून केलेली कांद्याची, मेथीची किंवा पातीच्या कांद्याची भाजी म्हणजे अहाहा.... लोणचे मला फार आवडत नाही परंतु वेगवेगळ्या चटण्या मला अजूनही आवडतात. असो ! माझे पुराण जरा लांबतच चालले आहे.
ReplyDeleteतुझ्या लिखाणाला आता एक स्टाईल येऊ लागली आहे......आवडेल अशी. भावना उत्कट असल्या की त्याप्रमाणे शब्द उतरत जातात.
लिहिती रहा,
सगळ्यात आधी मनपूर्वक धन्यवाद ! तेलाचा तवंग वगैरे खान्देशात सुद्धा असतोच , आताशा जरा प्रमाण कमी झालेय . पण तेव्हा मात्र अगदी इंचात मोजता येईल इतका तेलाचा तवंग असे सगळ्यांवरच !
DeleteAgdee Chan varnan delay...jevnyache varnan tar etke Chan aahe ke aata yeun tumchya Chaudhari sadan chy gachhi var jevave vatate aahe..
Deleteअतुल तुला काही चौधरी सदन काही नवीन नाही , नेहमीचे येणे होतेच तुझे , तरी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏 ! फार आनंद झाला तुला इकडे भेटून 😄! सगळ्यांचीच इच्छा आहे एकदा चौधरी सदनात जायची , आणि माझ्या डोक्यात सुद्धा सुरूय , काही तरी कार्यक्रम करावा तिथे , बघू या कसे जमतेय ते ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏😇
Deletejevanachi sandyakal mastch ahe
ReplyDeleteIts reminds me of our childhood not similar pan d enjoyment and also mobile free lifes best thing.
To actually play
कांचन मनःपूर्वक आनंद झालाय तुला इथे बघून🤩 ! तुझे स्वागत या चौधरी सदनात ......आणि मनःपूर्वक धन्यवाद !🙏😍
Deleteकाल तुमचा जेवणाची संध्याकाळ लेख वाचला, भाकरी चटणी चे हुबेहब वर्णन वचुन तोंडला पाणी सुटले, की मी लगेच रात्रि तोच मेनू बनवला !!!!
ReplyDeleteसगळ्यात आधी तुझे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात!!
Deleteवावा फारच छान!!
परत डबा party करू
ReplyDeleteमनीष, नक्कीच करू या! बरेच प्लॅन आहे डोक्यात, बघू या काय काय शक्य होते 😊!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
छान वर्णन केले आहे वर्षा ताई 👍👍
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 😊
Deleteखरंच खुपच छानच अगदी सर्वाचाच आवडीचा बेत आहे
ReplyDeleteखूप मनःपूर्वक धन्यवाद . 🙏
Deleteतोंडाला पाणी सूटले न!
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद आणि खूप सारे प्रेम !!🤩😇😍
DeleteLoved Bonapetiteमय लेख.. आम्हाला आमच्या लहानपणीच्या अंगतपंगतची आठवण करून देतो.
ReplyDeleteमाला तिखट जास्त नाही आवडतं.. पण गोड खुप आवडतं.
मस्तच..
but u must teste all these , at least once ! u will just love it !
Deleteखूप सारे धन्यवाद आणि खूप सारे प्रेम !!😋😋🤩😇
Kalnyachi bhakri n chatni tyat nistyachi asli ki mg kahi sangaylachbnako. Tondala panich sutl rao. Majjach majja. amcha 20 families cha khandesh group ahe. Akhi kadhi kadhi daba party krto. Reva hamkahs 1 tri dabba chatni bhakricha asto. Khup chan lihly
ReplyDeleteआपण चटणी भाकरी शिवाय जगूच शकत नाही ! मज्जा येते अश्या डबा पार्टी ला तर खूप !
Deleteमनःपूर्वक धन्यवाद !😋😍
Khup mast tai
ReplyDeleteLahanpanicha kal aathvla
Vachun tondala Pani sutle agdi😋
👌😋
ReplyDelete