Skip to main content

प्रस्तावना

                                                                                  
                                                                                            प्रस्तावना                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            



                                                           'चौधरी सदन'  म्हणजे माझ घर, मी जन्मापासून अकरा  वर्षांची झाले तोपर्यंत या घरात राहिले. तर ही इमारत माझ्या आजोबांनी बांधली आहे. अणि त्यांनीच हे नाव दिले या आमच्या घराला . क्रमाक्रमाने एक एक मजला ते बांधत गेले, आम्ही वरच्या मजल्यावर स्थलांतरीत होत गेलो अणि खालचे मजले भाड्याने दिले गेले. आजोबा, ज्यांना आम्ही बाबा म्हणतो, आज  ते नाहीत आमच्यात, पण त्यांच्या उल्लेखाशिवाय 'चौधरी सदन' उभेच राहू शकत नाही, लेखाच्या स्वरूपात सुद्धा! मी त्यांच्या वाढदिवसाला माझ्या हाताने शुभेच्छा पत्र करून पाठवत असे बऱ्याच वेळा. पण कोण आनंद त्यांना त्याबद्दल, आणि किती कौतुक, शब्दात सांगणे केवळ अशक्य! आणि आता हे सगळे पाहून, वाचून तर त्यांना किती आनंद झाला असता याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. असे हे आमचे बाबा, हा एक स्वतंत्र अणि मोठ्ठा विषय आहे. त्यांच्या बद्दल नंतर सांगेनच, पण आज हे सगळे अनुभवायला ते सोबत नाहीत याची खूप मोठ्ठी खंत आहे माझ्या मनात. एक व्यक्ती असते .......आयुष्यभर सगळ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत असते, वेगवेगळ्या रूपाने. पण त्यांनी आम्हाला दिलेला आनंद अगदी अपरिमित आहे........अगदी आयुष्य भर पुरून उरणारा  !!!!   

                                                                 मी वास्तुकलेचा अभ्यास करत असतांना मला चौथ्या वर्षी थिसीस करावा लागत होता. त्या वेळी माझ्या मनात "रिडेव्हल्पमेंट ऑफ नशिराबाद" हा विषय होता. जेणे करून मला आपल्या मूळ गावाबद्दल सगळी माहिती गोळा करता येईल, त्याचा अभ्यास करता येईल आणि सोबतच परिपूर्ण  रिडेव्हल्पमेंटचा आराखडा ही तयार करता येईल, असा माझा मानस होता. पण माझ्या गाईड ना हा विषय मान्य नव्हता. आणि त्यांनी मला "ऍग्रीकल्चर प्रोड्युस होलसेल मार्केटयार्ड" असा विषय घेऊन थिसीस करायला लावला. यानिमित्ताने मला जळगाव मधील मार्केट यार्डस  बघता आली, त्यांचा अभ्यास करता आला. पण तेव्हापासून नशिराबादच्या घराचे, 'चौधरी सदन'चे, गांधी नगरच्या घराचे दस्तावेजीकरण करावे हा विचार चालूच होते. पण मग मधल्या काळात स्थापत्यशास्त्राची पदवी  झाल्यावर लग्न, संसार, व्यवसाय  वगैरे वगैरे करता करता हे सगळे जरा बाजूला पडले.
                                                                 माझ्या मनात, डोक्यात 'चौधरी सदन', गांधी नगरचे घर आणि नशिराबादचे घर या सगळ्यांचे दस्तावेजीकरण करायचे होते हे खरेच. आणि मी ते आज ना उद्या केलेही असतेच. त्यामुळे मला खूप मानसिक समाधान आणि आनंद मिळाला असता. माझ्या काही या क्षेत्रातील मित्र-मैत्रिणी यांना सुद्धा मी हे काम दाखवले असते, त्यानांही ते सगळे बघून निश्चितच आनंद झाला असता, तसेच पुढच्या पिढीतील ज्यांनी कुणी या विषयाशी संबंधीत शिक्षण घेतले तर त्यांना सुद्धा ते सगळे बघायला नक्कीच आवडले असते. 
                                                                तीन-चार वर्षांपासून हे अधून मधून परत परत डोक्यात, मनात येत होते, पण कुठे काही सुरुवात होत नव्हती. दोन वर्षांपासून चंद्रमोहन कुलकर्णी सर, जे एक थोर चित्रकार आहेत आणि अभिनव म्हणजे माझ्याच महाविद्यालयाचे विध्यार्थी आहेत. यांनी निरनिराळ्या इमारती, दुकानं  यांच्या नावांच्या पाट्यांचा अभ्यास, फोटो, लिखाण सुरु केले आणि अधून मधून मला ते बघायला मिळत होते. त्यामुळे मग परत 'चौधरी सदन' ही अक्षरं माझ्या भोवती पिंगा घालू लागली, सारखे खुणावू लागली  आणि डोक्यात ठाणच मांडून बसली. दुसरे काही सुचूच देईनात मला! शेवटी योगिताला सगळ्यात सोप्पे होते म्हणून तिला 'चौधरी सदन' चे नावासहित दोन-तीन फोटो काढून पाठविण्याची विनंती केली आणि तिने ती लगेच मान्यही केली. मला वाटले दोन-तीन  दिवस तरी लागतील, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच अचानकपणे 'चौधरी सदन' समोर येऊन ठाकले. पारच गोंधळ उडाला माझा! काय करावे ते सुचेना. सगळ्या आठवणींनी मला एकदम झपाटून टाकले. शेवटी एक दिवस सरांना तो फोटो दाखवला. तो बघताक्षणी ते म्हणाले या इमारतीशी आणि नावाशी तुझी खूपच इमोशनल अटॅचमेंट दिसतेय आणि मला ती ऐकायला आवडेल. पण काही दिवस मी काहीच उत्तर देऊ शकले नाही त्यांना. दोन कारणे होती. एक महत्वाचे म्हणजे काय सांगावे, कुठून सुरु करावे  ते सुचेना आणि दुसरे म्हणजे माझा नेमका तेव्हाच उजवा खांदा दुखत होता, त्यामुळे सलग इतके टायपिंग करणे शक्य नव्हते. मग हे दुसरे कारण सांगून टाकले त्यांना. तरीही ते अधून मधून चौकशी करत, खांदा कसा आहे?
                                                                मग एक दिवस सरळ फोनवरच एक मोठा परिच्छेद  टाईप केला सुचेल तसा आणि दिला पाठवून त्यांना. त्यांनी तो लगेच वाचला आणि म्हणाले खूप काही दिसतंय तुझ्या जवळ 'चौधरी सदन' बद्दल सांगण्यासारखं. मी म्हटले हो खूप आहे पण तुम्ही कंटाळून जाल म्हणून थोडंच लिहिलं. मग ते म्हणाले लिही, लिही, सगळं लिहून काढ, माहितीवजा न लिहिता भावनिक पातळीवर जाऊन, अनुभवून लिही. मग डोक्यात, मेंदूत, मनात, हृदयात हा भुंगा शिरला आणि सारखं आतून पोखरू लागला. जराही  स्वस्थ बसू देईना आणि त्यातच समजले, 'चौधरी सदन' विक्रीला आहे. मग वाटले थेट चौधरी सदन मध्ये जाऊन प्रत्येक कानाकोपरा बघून अनुभवावा.कारण विक्री झाली की ती शंभर टक्के पाडून टाकली जाणार, पण तिथे जाऊन येणे मला आत्ता तरी अगदीच शक्य नव्हते. मग निलेश  माझ्या मदतीला धावून आला. शक्य तितके छायाचित्रं काढून पाठवले आणि मला छानपैकी  'चौधरी सदन' च्या कान्याकोपऱ्यातून  फिरवून आणले. पण तरीही कळेना कुठून लिहायला सुरवात करावी? आणि सगळी नीट माहिती गोळा करणेही आवश्यक होते. मग मी घरात सगळ्यांशी फोन आणि व्हाट्सअप वर चर्चा सुरु केल्या आणि सगळ्यांच्या आठवणी गोळा करायला सुरुवात केली. फार मस्त वाटत होती ही सगळी वाटचाल! सगळ्यांच्या आठवणींना उजाळा मिळत होता.  मग एक एक मुद्दे लिहून ठेवत गेले. 'चौधरी सदन'च्या लिखाणाला सुरुवात करायची होती पण बाकी विषयांवरचं लिखाण सुरु होऊन गेले. दोन महिन्यात जवळ जवळ दहा इतर विषयांवर लेख लिहून झाले, तरी 'चौधरी सदन' अजून विचारच करायला लावत होते. बाकी लिखाण झाल्याचा खूप आनंद वाटत होता, पण आपण 'चौधरी सदन' ची सुरुवात सुद्धा करू शकत नाही याची खूप खंत वाटत होती. 
                                                                एक विचार पक्का केला. कटू आठवणी नाही लिहायच्या. लिहायच्या त्या फक्त आनंदी आठवणी! ज्या मला आठवतांना , लिहितांना  आणि ते क्षण परत जगतांना  आनंद देतील आणि वाचणाऱ्याना वाचतांना , आठवतांना  आणि ते क्षण परत जगतांना  फक्त आणि फक्त आनंदच देतील आणि ओठावर, चेहऱ्यावर छानसं  हसू फुलवतील!!! पण तरी प्रश्न होताच सुरुवात कुठून करावी? माझ्या मनात  प्रचंड उलथापालथ, खूप विचार, नुसते विचार, फक्त विचार, असे सगळे खूप दिवस, म्हणजे दोन जानेवारी ते एक-दोन मे इतका मोठा काळ चालू होते. कारण ही इमारत  बांधायला सुरुवात केली तेव्हा मी नव्हते त्यामुळे मला त्याबद्दल काहीच माहिती नाही, मग आठवणी पण नाहीत. मग कशी  आणि काय एकदम कल्पना आली! सुरुवात गच्चीवरून करू या आणि मग एक एक मजला खाली उतरू या! आणि काय भारी वाटले माहितीये .......! was on cloud nine!!!
                                                               चंद्रमोहन सरांनी ही जी काय मला सगळं लिहून काढायची कल्पना दिली, त्यामुळे मला चक्क माझे बालपण परत जगण्याची संधीच मिळालीय. एव्हढेच नाही तर आमच्या अख्ख्या कुटुंबाला तो सगळा काळ परत जगण्याची आणि तो आनंद लुटण्याची आयतीच संधी मिळालीय. आता तर हे सगळे लिखाण ब्लॉग वर गेल्यावर असंख्य लोकांना वाचण्याची संधी मिळेल आणि या सगळ्यातून अगदी अनंत आणि अखंड आनंदाचा झरा कायमच झिरपत राहील. सर अगदी शतशः आभार!!!
                                                                  मग छान झाली मुद्देसूद सुरवात आणि पंधरा मे ला पहिला लेख लिहून झाला. तो म्हणजे कोजागिरीचा. माझ्या मनाहृदयातही कोजागिरी सारखा पूर्ण चंद्र उगवला आणि सगळी कडे लख्ख, शांत, मधुर चांदणं पसरलं, माझ्या आठवणींच्या लेखांचं! मी तर छान न्हाऊन निघाले आहे आणि न्हाऊन निघतच आहे कायमची या आनंदी आठवणींच्या चांदण्यात. तुम्ही सगळेही या माझ्या सोबत या, ह्या आनंदी आठवणींच्या चांदण्यात न्हायला! आणि ते सगळे छानछान आनंदी क्षण आपण परत सोबतीने जगू या आणि आनंदित होऊन जाऊ या.......!!!
  
ध्वनीफीत 






©आनंदी पाऊस 
 चौधरी सदन 
  ८ जून २०१९




Comments

  1. खूपच छान वर्षादी. खरे तर मी आधीही हा लेख वाचला आहेच आपल्या छोट्या ग्रुप वर. पण तू हे सगळे ब्लॉग वा लिहितेस याचा विशेष आनंद आहे. तुझा आनंदी पाऊस आता फक्त आपल्या ग्रुप पुरता नसून सगळे जण या पावसात भिजू शकतील हे खूपच छान झाले. मी नक्की माझ्या इतर मैत्रीणीनापण सांगेन वाचायला. पुढच्या असंख्य लेखासाठी खूप खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
    Replies
    1. khup khup manpurvak dhanyvaad!!khup chhan vatle tula ekade baghun
      :-)

      Delete
  2. मस्त अक्का..प्रस्तावनेचा वर्षाव अनुभवताना खुपच आनंदी वाटले...लेख&ब्लॉग यांच्यातील सुरुवात करण्याजोगा दुवा म्हणजे जन्म &जन्मदिवस...वा वा खुपच छान..

    ReplyDelete
  3. Nice new subject. The idea is novel too. Like your Chandra Mohan sit, we are also curious to read your series of articles in coming days. Best wishes for your writing venture.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !!! कुणाचा अभिप्राय ? नाव सांगाल का कृपया ?

      Delete
  4. Prastavanacha 🌧bhijun anand bhetala pan atta ajun jeev asurala ahe anandacha pausat olechib honas
    Vatt bhaghatoy pudhil....

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !!! कुणाचा अभिप्राय ? नाव सांगाल का कृपया ?

      Delete
  5. Anandi athavanicha chandanat nahaila

    ReplyDelete
  6. खूप छान वर्षा मस्त साधी सरळ भाषा.. all d best

    ReplyDelete
    Replies
    1. मनिषा मनःपूर्वक धन्यवाद

      Delete
  7. Aprtheem, ek ek shabd manala sparsh karun gele. Tumhi lehath raha amhi wachath rahu ashi ichaa ahe

    ReplyDelete
    Replies
    1. वाव खूप आनंद झाला अभिप्राय वाचून ! संजिता ना तू ?

      Delete
    2. oh ...very sorry sarika maam.....thats just amazing !!! thnk u so much!!!

      Delete
  8. सगळ्यांचे खूप खूप मनःपूर्वक आभार !!! पण कृपया अभिप्राय देताना आपलं नावाचा उल्लेख केला तर , सवांद छान साधता येईल .

    ReplyDelete
  9. Varsha tai chhan..Goldr memories

    ReplyDelete
    Replies
    1. विलास खूप आनंद झाला तुला इथे बघून ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!

      Delete
  10. मी देवश्री किनगे..... तुमचा लेख वाचून मी प्रभावित झाले...आर्किटेक्ट इंजिनिअर असुन सुद्धा मराठी चांगली लिहिता

    ReplyDelete
    Replies
    1. व्वा देवश्री ! खूपच आनंद झाला तुला इथे बघून , खूप खूप धन्यवाद !!!

      Delete
  11. Khup chan Tai, Eagerly waiting for further blogs, Keep writing and keep sharing the joy.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे धन्यवाद निखिल !!!

      Delete
  12. Replies
    1. खूप खूप धन्यवाद !!! कुणाचा अभिप्राय ?

      Delete
  13. सर्वात आधी तुझे अभिनंदन!! "प्रस्तावना"एवढी सुंदर आणि एखाद्या साहित्यिक सारखी की तुझ्या पुढील लेखांची आपोआपच उत्सुकता निर्माण झाली.

    ReplyDelete
    Replies
    1. मकरंद मनापासून धन्यवाद ! बाप रे खूपच मोठ्ठा शब्द वापरलास , तुझ्या या अभिप्रायावर कसे व्यक्त व्हावं तेच कळत नाहीये मला !! अगदी मनात आत खोलवर खूप खूप छान वाटले ...... खूपच आनंद झाला !!!
      या पुढेही माझे लेख नियमित वाचून असे छान छान अभिप्राय मला प्रोत्साहन देत रहा ......
      तुझ्या अभिप्रायाची आतुरतेने वाट बघेन ........

      Delete
  14. Khup chan, ha lekh wachlyanantr mla mazch lahanpan aathvaila lagl, khrach yekda wachaila surwat kelyavr to purn hoiparent thambav asach watl nahi.
    kojagiri warcha lekh nakki wachaila aavdel lvkr share kra.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे धन्यवाद !!! कुणाचा बरं हा अभिप्राय ? कृपया नाव सांगा कुणाचा अभिप्राय ते

      Delete
  15. अपर्णा , व्वा छान वाटले तुला इकडे बघून ! खूप धन्यवाद !
    लवकरच वाचायला मिळेल कोजागिरी चा लेख !!!

    ReplyDelete
  16. Khup chan lihele ahe varsha
    Ase ch chan light raha
    Heartly congratulation

    ReplyDelete
    Replies
    1. चारू खूप सारे धन्यवाद ! खूप छान वाटले तुला इथे बघून ....
      अशीच इथे सुद्धा नियमित भेटत राहशील अशी आशा करते !!!

      Delete
  17. खूप मस्त वर्षे ,आता पुढच पुढच वाचायची इछा आहे ��������...
    सरस्वती

    ReplyDelete
    Replies
    1. मस्तच सरु ! भारी वाटले तुला इथे बघून
      अशीच नियमित भेटत जा इथे !!!

      Delete
  18. ताई इतकी सुंदर प्रस्तावना केलीस खरच खूपच छान.
    चौधरी सदन बद्दल पुढचे वाचण्यास खुप आतुर झालो आहे.कारण या घराशी 33 वर्षापासून माझी नाळ जोडली गेली आहे आणी या घरातील प्रत्येकांशी एक वेगळं नात तयार झालेलं आहे.
    जेव्हापासून मी हे अनुभवलं आहे त्या अगोदर चे ऐकायला किंवा वाचायला मी खरोखरच मी आतूर झालो आहे. आणी आमच्या अक्का इतकं छान लिहू शकते याचा खूप आनंद आणी अभिमान देखील वाटतो.
    पुढील ब्लॉग लवकरात लवकर प्रसिध्द कर मी वाट पहात आहे ताई.

    ReplyDelete
    Replies
    1. अजय खूप मनापासून आनंद झाला तुझा अभिप्राय वाचून !
      अगदी मनःपूर्वक धन्यवाद !
      लवकरच ...म्हणजे साधारण आठवड्यात एक लेख मी या ब्लॉग वर प्रसिद्ध करीन .
      आशा करते इथे असाच नियमित भेटशील तुझ्या छानछान अभिप्रायासह !!!

      Delete
  19. Replies
    1. व्वा हिमाली !! एकदम भारी वाटले तुला इथे बघून !!
      मस्तच , अशीच इथे नियमित भेटत जा तुझ्या अभिप्रायासह .......

      Delete
  20. Khup chan lihele ahe akka
    Ase chan light raha 👌👌👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद अभिप्रायाबद्दल !
      पण कोण आहे कळले नाही, नाव कळेल का कृपया

      Delete
  21. खूप सुंदर अप्रतिम लिखाण... प्रस्तावनाचं इतकी इंटरेस्टिंग तर पुढील ब्लॉग्स नक्कीच ऑस्सम असतील... आजोबांची आठवण येऊन गेली.. waiting फॉर कोजागिरी.. congrats ताई

    ReplyDelete
  22. परेश खूप खूप सप्रेम धन्यवाद !
    खूप आनंद झाला तुला इथे बघून !
    हो आठवड्यातून एक लेख इथे प्रकाशित होणार ....
    येस्स्स्स्स, अजोबांशीवाय यातील काहीच शक्य नव्हते
    कित्ती आनंद दिलाय त्यांनी आयुष्यात ......पण आज या आनंदात सहभागी व्हायला ते आपल्यात नाहीत याचे खूप आतून वाईट वाटतेय मला........
    असो , असाच नियमित इथे भेटत रहा

    ReplyDelete
  23. वर्षाली सर्व प्रथम तुझे अभिनंदन.प्रस्तावना खुप छान.सुंदर लिहिलेस.असच छान लिही. तुझ्या आनंदी पावसात चिंब भिजून आम्हाला ही आनंद घेऊ दे.पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. आनंदी पाऊस ........ नावातच सगळे आले ....... सगळ्यांना आनंदी पावसात भिजवून चिंब करण्यासाठीच आहे हे सगळे ......रत्ना काकू ,मनापासून आभार ...... असच नियमित भेट जा इथे..... तुमच्या छान छान अभिप्रायासह !

      Delete
  24. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद रश्मी ! फारच मस्त वाटले तुला इथे बघून!

      Delete
  25. Khup chan lihile ahe Tai Prastawna wachun, Ata pudhil lekhachi Aturtene wat pahat ahe. Pappa kaka atya kadun nehamich sadanike chya athwani sangitlya jatat. Tuzya lekhat te wachayla awdtil

    ReplyDelete
    Replies
    1. पराग खूप खूप आभार ! असाच नियमित भेट जा इकडे ........

      Delete
  26. Khupach sunder ani apratim lekh ahe ....

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !!!
      कुणाचा अभिप्राय ? नाव सांगाल का

      Delete
  27. Dr Amit ChaudhariAugust 31, 2019 3:41 pm

    खूप छान लिहले आहे ताई. वाचून मी पण त्यानिमीत्ताने जुन्या गल्लीत फिरुन आलो.
    चौधरी सदन हे त्यावेळेपासून दिमाखात उभे आहे. त्यात आजोबा बंगळीवर बसलेले. मी लहान होतो, त्यामुळे जरा भितभीतच आत शिरायचं. ��
    असच छान लिहत रहा. खुप शुभेच्छा ��

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद अमित ! पण तुझा थोडा गैरसमज होतोय बहुशः , पहिले पेज पहिले तर तुझ्या लक्षात येईल हे लिखाण नव्या पेठेतील चौधरी सदनाबद्दल आहे .....

      Delete
  28. छान झाली आहे सुरुवात ब्लॉगची!

    ReplyDelete
    Replies
    1. अमित खूप मनःपूर्वक धन्यवाद !!!

      Delete
  29. आक्का खूप छान प्रस्तावना लिहिली आहे.नशिराबाद म्हटले कि मनातला आठवणींचा एक भावनिक कप्पा जागा होतो.चौधरी सदन बद्दल नक्किच वाचायला आवडेल.
    Eagarly waiting for next.....

    ReplyDelete
    Replies
    1. हाय सोनल , मनापासून धन्यवाद !!! खूप छान वाटले तुला इथे बघून , अशीच नियमित भेटत जा इथे ......

      Delete
  30. आर्किटेक्ट वर्षाताई खूप छान लिहिले आहे
    मराठी उत्तम आहे अगदी छान सुरुवात केली nice blog आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी मनःपूर्वक धन्यवाद ! नाव नसल्याने कोणाचा अभिप्राय आहे ते कळत नाहीये , कृपया नाव कळेल का?

      Delete
  31. Very well written..pradip ( friend of Anand Deshpande)..

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून खूप खूप धन्यवाद, प्रदीप सर  !!!😊😊😊

      Delete
  32. खुपच छान.. लिहीत रहा..जुन्या आठवणी मुळे..Mind refresh hote..

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी शंभर टक्के खरंय✅ ! या जुन्या गोड आठवणीच खूप बळ आणि सकारात्मकता देतात😍💖 !!!  नाव नाही त्यामुळे कळत नाहीये अभिप्राय कुणाचा , नाव कळेल का?🤔

      Delete
  33. प्रतिभा अमृतेDecember 05, 2019 1:55 pm

    लय भारी. ��Tuzya aanadi athavaninchya chandnyat nhavun nighayala nakkich aavadel. Go ahead dear Varshali. ��

    ReplyDelete
    Replies
    1. या चौधरी सदनात तुमचे मनःपूर्वक स्वागत🙏🙏 ! आणि कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद !😇😍

      Delete
  34. डॉ ज्योती वायकोळे चौधरीDecember 20, 2019 10:53 am

    मस्तच लिहिलेय. साधे, सरळ, सुटसुटीत पण एक वेगळीच किमया साधली आहे, आनंद देण्याची. मला खात्री आहे की हे लेख वाचणारा प्रत्येक व्यक्ती आपआपल्या बालपणात हरवून चेहऱ्यावर एक हास्याची लकेर नक्कीच उमटवत असेल.
    अशीच लिहित रहा आणि आनंद वाटत रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. ज्योती सगळ्यात आधी तुझे मनःपूर्वक स्वागत 🙏या चौधरी सदनात ! आणि अगदी मनःपूर्वक धन्यवाद🙏 !!! तुझ्या शुभेच्छांनी खूप छान प्रोत्साहन मिळाले आणि खूप सकारात्मकताही ! माझ्या मनाच्या आणि हृदयाच्या जवळ असलेल्या प्रत्येक व्यक्तीने या चौधरी सदनात यावे ही मनापासून इच्छा माझी , ती तू तुझ्या उपस्थितीने तुझ्याबाजूने तू पूर्ण केलीस , खूप आनंद झाला मला !💖💕💃

      Delete
  35. वाचलं, एखादया मुरलेल्या लेखका प्रमाणे छान लिहतेस����

    ReplyDelete
    Replies
    1. तुझीही इथे उपस्थिती माझ्यादृष्टीने खूप महत्वाची आणि खूप आनंदाची आहे😃😍 ! तुझे मनःपूर्वक स्वागत🙏 तुझेही !! आणि खूप खूप मनापासून धन्यवाद !!! माझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मदत होणार या सगळ्या शुभेच्छा आणि कौतुकाची !😇🥰💃

      Delete
  36. संजय वाणीDecember 22, 2019 6:10 pm

    प्रिय वर्षा,
    “चौधरी सदन” ह्या तुझ्या ब्लाॅगमधील ही प्रस्तावना वाचतांना मनस्वी आनंद झाला आणि मन:चक्षुंसमोरुन नकळत गेल्या सुमारे चाळीस वर्षांचा कालपट तरळून गेला आणि माझे अनेक कारणांसाठी “चौधरी सदन” शी असलेले साहचर्य ही....
    वर्षा, सदरचा ब्लाॅग पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर, तू वास्तुशास्त्रकलेप्रमाणे लेखनकलेतदेखील एवढी पारंगत आहेस ह्याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय आला आणि तुझ्या व्यक्तिमत्वातल्या ह्या पैलूचासुघ्दा... कमालीची अकृत्रिम, सहज, लाघवी आणि प्रवाही तरीही कमालीची प्रभावी भाषा वाचून तुझ्या लेखनकौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेचं... एका उदयोन्मुख लेखिकेचे लिखाण वाचण्याच्या अविर्भावात सुरुवात केली खरी पण अंतत: प्रचिती मात्र आली एका सिध्दहस्त लेखिकेची आणि तुझ्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाची...
    ब्लाॅगमधल्या कन्टेंटबद्दलही बरेच लिहीण्यासारखे आहे, ते पुन्हा केव्हातरी...
    पण तू अशीच लिहीत रहा, अशीच व्यक्त होत रहा आणि तुझ्या अद्वितिय प्रतिभेचा सुंदर अविष्कार पुन्हा पुन्हा होवू दे.... तुझ्या ह्या नवीन उपक्रमास मनापासून शुभेच्छा....

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏😃 ! तुझ्या तर नेहमीच वावरण्याचे एक ठिकाण होते हे एके काळी . या इतक्या सगळ्या कौतुकास मी खर तर पात्र नाही , पण तरी या सगळ्या बद्दल तुझे अगदी मनःपूर्वक धन्यवाद . कौतुक हवेसे तर वाटतेच पण त्यापेक्षाही जास्त त्यातून जे प्रात्साहन मिळते त्यामुळे पुढचे  करायला खूपच हुरूप येतो , हे सगळ्यात महत्वाचे !! माझी अगदी मनापासून इच्छा आहे , चौधरी सदनात वावरलेल्या प्रत्येकाने इथे या चौधरी सदनात उपस्थित राहावे आणि या विस्तृत कुटुंबाचा भाग व्हावे ! असाच इथे नियमित भेट देत रहा ! खूप खूप धन्यवाद !! 🙏🙏😊😇😇

      Delete
  37. एल झेड कोल्हेJanuary 08, 2020 1:13 pm

    घराची अटॅचमेन्ट चांगली वाटते. प्रतावनेत लेखन कसे सुचले ?आणि कुलकर्णी सरांची प्रेरणा ,!पुढील लेख नक्कीच चांगला असणार याची खात्री अाहे.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार सर ! या चौधरी सदनात तुमचे मनःपूर्वक स्वागत ! ब्लॉग सुरु झाल्या पासून माझी मनापासून ईच्छा होती , माझे शाळेतील गुरुजन सुद्धा इथे उपस्थित असावे आणि त्यांचे सुद्धा आशीर्वाद आणि अभिप्राय मला मिळावे . आज तुम्ही इथे उपस्थित राहून शुभेच्छा , कौतुक आणि अभिप्राय सुद्धा दिला , खूप खूप आनंद झालाय मला . शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे हा आनंद . अशीच इथे नियमित भेट देऊन वेळोवेळी अभिप्राय आणि आशीर्वाद देत राहावे ही विनंती . खूप खूप मनापासून धन्यवाद !!!

      Delete
  38. युवराज्ञी ढाकेJanuary 25, 2020 2:56 pm

    खुप छान ताई.

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत ! मनःपूर्वक धन्यवाद !🙏😍

      Delete
  39. It was incredible what I read and was written ��������

    ReplyDelete
    Replies
    1. तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत ! आणि खूप खूप मनापासून धन्यवाद !🙏🙏

      Delete
  40. उत्सुकता वाढवणारी प्रस्तावना..

    ReplyDelete
    Replies
    1. तीनच शब्दांचा अभिप्राय , पण किती प्रोत्साहन देणारा आणि माझा उत्साह वाढविणारा ! सप्रेम धन्यवाद !

      Delete
  41. खूप छान लिहिला आहे मॅडम चौधरी सदन सारखं असं एखादं तरी सदन असतं याची जाणीव करून देणारे प्रस्तावना आहे ...... हे प्रत्येकाला नाही जमत असं लिहिन,,*****

    ReplyDelete
    Replies
    1. चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत तुमचे ! आणि मनःपूर्वक धन्यवाद !!

      Delete
  42. आठवणी ... या आपल्या जगण्यातल्या उर्जा असतात. मनात आलं की मनमोकळ्या मांडण्यामध्ये आनंद असतो. वेगळे समाधान असते.
    तुझ्या आठवणी या आपल्या पिढीच्या सर्वांना आपल्या स्वतःच्याच वाटणार्या आहेत....
    आनंदी पाऊस हे ..जगलेले क्षण आहेत... असे वाटते... छान...।

    ReplyDelete
    Replies
    1. सतीश सर , तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत !  आणि खूप खूप धन्यवाद !!

      Delete
  43. Replies
    1. आत्या ,  तुझं खूप खूप मनःपूर्वक स्वागत स्वागत या चौधरी  सदनात ! 🙏🙏🤩🤩

      Delete
  44. पराग आसोदेकरMarch 26, 2020 9:02 pm

    Mi balpani jitkya veli geloy chaudhari sadan madhe , baba n aai sobat
    Pratek veli mothi aai n kaku ni mala agrahane jevay la vichala ahe he mi visaru nahi shakat

    Khup chan divas hote te

    Nilesh dada chi ladies cycle cha mi nehami
    Chakkar ghet ase ��

    ReplyDelete
    Replies
    1. पराग , तुझे मनःपूर्वक स्वागत या या चौधरी सदनात ! मला वाटतंय तुझी थोडी गल्लत होतेय , मला वाटतंय तुला चौधरी सदनात आलेलाच नाहीये , तू ज्या आठवणी सांगतोय त्या गांधी नगर च्या घरातील आहेत . निलेश दादाची लेडीज सायकल म्हणजे बहुतेक ती माझीच असावी , छान माझ्या सायकल ची आठवण करून दिल्यामुळे😍 ! छान वाटले तुला इकडे भेटून , मनःपूर्वक धन्यवाद !🙏😇🤩

      Delete
  45. नंदू पाटीलApril 04, 2020 9:22 pm

    वर्षा , आनंद व अभिमान ही आहेच. थांबू नकोस.मुक्त पणे ,खळाळणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुझी प्रतिभा शब्दब्रम्हातून पूर्ण करण्यासाठी शारदादेवीचा तुला आशिर्वाद मिळाला आहे...����

    ReplyDelete
    Replies
    1. मामा, सगळ्यात आधी तुमचे मनःपूर्वक स्वागत! मन अगदी भरून आल aheआहे तुमचा अभिप्राय वाचून ....
      मनःपूर्वक धन्यवाद! 🙏

      Delete
  46. very vivid and lucid.

    ReplyDelete
    Replies
    1. मनीष तुझे मनःपूर्वक स्वागत तुझे या चौधरी सदनात ! आणि खूप सारे धन्यवाद !🙏😀🤩

      Delete
  47. डॉ मनीष चौधरीApril 15, 2020 10:15 am

    Khupach Chchan lihile agadi lahanpan aathavte

    ReplyDelete
    Replies
    1. Very very happy to see you here!
      तुझे खूप खूप स्वागत या चौधरी सदनात!!!
      अणि धन्यवाद 🙏 😊

      Delete
  48. *अभिप्राय -*
    *वर्षा ,इतका छान ब्लॉग लिहिल्याबद्दल प्रथम तुझे मनःपूर्वक अभिनंदन*
    *तुझ्या ब्लॉग मुळे मी पण जळगावच्या माझ्या चांगल्या भूतकाळात गेलो.*
    *मला अजून ही आठवतय की , वस्त्रालंकार आणि चौधरी सदन ही चौधरी कुटुंबाची ओळख होती आणि आहे.*
    *आणि तू जी भावनिक ओढ लग्न झाल्यानंतर सुद्धा नशिराबाद बद्दल दाखवलीस* *त्याबद्दल तुला सलाम.*
    *असेच छान लिखाण करत रहा.तुला तुझ्या भावी वाटचालीस असंख्य हार्दीक शुभेच्छा����*

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुझे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात!!
      छान योग आहे हा ईतक्या वर्षानी भेटण्याचा तेही ईथे!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  49. भारतीApril 24, 2020 7:25 pm

    Ye tu khoop chhan lihite ani mukhya ase ki tula sarva athavate suddha.

    ReplyDelete
    Replies
    1. भारती सगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत!! अणि खूप सारे धन्यवाद!! 🙏 😇

      Delete
  50. संध्या फालकJuly 08, 2020 7:22 am

    खुप छान वाटले प्रस्तावना वाचून
    वेगळाच विषय. अगदी लहानपणीच्या आठवणी दाटून आल्या. खूपच छान��

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत! !
      Ani खुप खुप धन्यवाद!!

      Delete
  51. विकास गायकवाडJuly 26, 2020 6:00 pm

    खूप छान ताई मी पण चौधरी सधनचा भाग झालेला आहे आफिस कामाला मी नेहमी यायचो मला नेहमी घरा सारखा अनुभव आला

    ReplyDelete
    Replies
    1. विकास आनंद झाला तुला ईकडे बघुन! तुझे खुप खुप मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात!
      अणि खुप सारे धन्यवाद 😍

      Delete
  52. Khup chan varshaji. Very nice initiative. Chaudhari sadan cha photo baghun mazya maherachya gharachi athvan zali. thod far asach structure ahe. khup athvani ahet mazyasuddha. tumcha blog vachun khup athvani jagya zalya. Asch lihit raha. All the best.

    ReplyDelete
    Replies
    1. दीपाली तुमचे खुप खुप मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात!!
      अगदी मनापासुन आनंद झाला तुम्हाला ईथे भेटून .😍
      सप्रेम धन्यवाद 😍

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...