Skip to main content

Posts

Showing posts from August, 2025

🌧️💧💦😇आनंदी पावसासोबत मनमोकळ्या गप्पा😇💦💧🌧️ (featured)

 🌧️💧💦😇 आनंदी पावसासोबत मनमोकळ्या गप्पा😇💦💧🌧️  (featured)                आनंदी पावसाचे मनोगत! त्याच्या जन्म कसा, केव्हा झाला अशा बऱ्याच गोष्टींचा तपशील आज पर्यंत अनेक लेखांमधून या ना त्या कारणाने येत गेला. तथापि सलग तासभराचा गप्पांचा कार्यक्रम किंवा ध्वनीफीत स्वरूपात मात्र उपलब्ध नव्हता. आज मात्र हा मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम ध्वनिफीत स्वरूपात उपलब्ध झालेला आहे. त्याची यु-ट्युब लिंक खाली दिलेली आहे. त्यावर जाऊन आपणास ती ऐकता येईल.                 आता थोडे या गप्पांबद्दल. तर माझी अगदी सख्खी मैत्रीण, वास्तूविद्या महाविद्यालयातील वर्ग मैत्रीण, आता बारामतीच्या वास्तुविद्या महाविद्यालयात, प्राध्यापक आणि शैक्षणिक प्रमुख अशा दुहेरी भूमिकेत कार्यरत आहे. आपली सख्खी मैत्रीण, तिची कार्यभूमी, तिचे शैक्षणिक कार्यात योगदान हे सारे मला कौतुकाने प्रत्यक्ष बघण्याची अगदी मनापासून इच्छा होती. तसेच तिनेही बऱ्याचदा त्यांच्या महाविद्यालयात येण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु योग आल्याशिवाय कुठलीही गोष्ट तडीस ...

🪔 🌷 🪻 🌿 आनंदी सोहळा - ६ 🌿 🪻 🌷 🪔 🪔🌷🪻🌿(ज्ञानेश्वरीतील जल दर्शन) (featured) 🌿🪻🌷🪔

🪔  🪔 🌷 🪻 🌿 आनंदी सोहळा - ६ 🌿 🪻 🌷 🪔 ( ज्ञानेश्वरीतील जल दर्शन) 🪔🌷🪻🌿 (featured) 🌿🪻🌷🪔 🪔 🌿 🌿 🌿 🌿 🌿 🌿 🌿🪔 🪔 🪻 🪻 🪻 🪻 🪻 🪔 🪔 🌷 🌷 🌷 🪔 🪔 🪔 🪔 🪔 🌾🌾🌾आज आनंदी पाऊस सहा वर्षांचा झाला. त्यानिमित्ताने हा आनंदी सोहळा -६!🌾🌾🌾           आजतागायत प्रत्येक आनंदी सोहळ्या निमित्ताने काहीतरी वेगळे, सुरेख आणि साऱ्यांचाच आनंद द्विगुणीत करणारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही तसाच आणखी एक प्रयत्न!    आज मितीस साऱ्यांचाच जीवनातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पाणी! जल!             माझे गुरु जलपुरुष डॉ रा श्री मोरवंचीकर यांनी जलावर अतिशय व्यापक आणि सखोल अभ्यास, संशोधन केलेले आहे, याचा मी या पूर्वीही अनेकदा उल्लेख केलेला आहेच. त्यांच्याच जलावरील ग्रंथाचा उल्लेख पंचम वेद असा केला जातो. याच ग्रंथातील हा एक महत्त्वपूर्ण लेख! लोकमनातील पाणी या शीर्षकाखाली अनेक संतांची वचने दिलेली आहेत. त्यापैकी एक संत म्हणजे ज्ञानेश्वर. त्यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी . ...

🪈कृष्ण कथा शिल्पं - जन्माष्टमी विशेष, जलकंठेश्वर मंदिर, वेल्लोर, तामिळनाडू🪈 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

🪈🪈🪈 कृष्ण कथा शिल्पं -  जन्माष्टमी विशेष   🪈🪈🪈 संदर्भ : जलकंठेश्वर मंदिर, वेल्लोर, तामिळनाडू   (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)                 आपल्या भक्ती प्रधान भारत देशात असंख्य प्राचीन मंदिरे आहेत. हल्ली  सार्वजनिक माध्यमाच्या माध्यमांतून त्याबद्दलची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचतच असते. तसेच अनेक प्रकारच्या सहली नियोजन करणारे सुद्धा या स्थळांना भेट द्यायला पर्यटकांना घेऊन जातात. त्या त्या ठिकाणी गेल्यावर तिथे मार्गदर्शक सुद्धा असतात, त्यांच्या मदतीने ती ठिकाणे आपण समजून घेऊ शकतो. शक्यतो त्यापैकी ASI संस्थेने नियुक्त केलेल्या मार्गदर्शकांची मदत घ्यावी, कारण त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलेले असते. तथापि मंदिरे बघायची झाल्यास, त्यांच्या मदतीशिवाय सुद्धा आपले आपल्यालाच बऱ्याच प्रमाणात समजून घेता येते. ते कसे? तर आपण सर्वच बालपणी आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींकडून रामायण, महाभारत, देव-देवता, त्याचे अवतार, त्यांचे कार्य इत्यादी बद्दलच्या गोष्टी ऐकतच असतो.                तसेच हल्ली...

अडीच अक्षर - २ (मैत्री दिन विशेष) (काही अनुभवलेलं..)

 🌷अडीच अक्षर - २ (मैत्री दिन विशेष)🌷  (काही अनुभवलेलं..)                भारतीय डाक विभागाने गेल्या वर्ष अखेर अडीच अक्षर/ढाई अक्षर अशा शीर्षकाखाली एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात मला माझा सहभाग नोंदवता आला नव्हता, तथापि त्याकारणे आनंदी पावसात "अडीच अक्षर" ह्या नवीन सदराची सुरुवात झाली. या सदरातील पहिला भाग प्रकाशित झालेला आहे. आज म्हणजे ३ ऑगस्ट २०२५ रोजी मैत्री दिनाच्या निमित्ताने हा दुसरा भाग आपल्या भेटीस येत आहे.                भारतीय टपाल खात्याशी अगदी लहान वयापासून ते आजतागायत माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या सर्व प्रवासात म्हणजे डाक विभागाशी संबंधित प्रवासात कायम साथ लाभलेल्या अनेक व्यक्तींपैकी एक महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी सख्खी मैत्रीण. वास्तुकला महाविद्यालयात असल्या पासूनची ही मैत्री आणि तितक्याच वयाचा हा आमचा सोबतीने केलेला टपाल-प्रवास. आज मैत्री दिनाच्या निमित्ताने या आनंदी प्रवासाची झलक आनंदी पावसाच्या वाचकांसाठी!                ...