💧💦🫧 जलदेवता - कलश किंवा घट 🫧💦💧 (featured) 🪻🌿🪻गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या आनंदी शुभेच्छा!🪻🌿🪻 यापूर्वी मी बऱ्याच वेळा माझे गुरु डॉ रा श्री मोरवंचीकर यांचा 'जलपुरुष' म्हणून केलेला आहे. तसेच त्यांच्या नावा आधी असलेल्या बिरुदांमध्ये 'जलपुरुष' हे बिरूद कायमच असते. सोबतच त्यांचे जल या विषयावरील संशोधन, अभ्यास या बद्दलही उल्लेख केलेला आहे. त्यांचा जल संस्कृती वरील एक एकमेवाद्वितीय ग्रंथ म्हणजे "भारतीय जल संस्कृती - स्वरूप आणि व्याप्ती" . या ग्रंथाचा उल्लेख पंचम वेद म्हणजेच पाचवा वेद असाही केला जातो. याच ग्रंथातील हा एक लेख. आपण सर्व वाचकांना अगदी मनापासून आवडेल, एव्हढेच नव्हे तर त्यातून बऱ्याच गोष्टी आकळतील. त्यातील शब्द न शब्द आपणास एक उर्जा देईल, विचार करण्यास प्रवृत्त करेल. अगदी आत पर्यंत पोहोचेल आणि एक प्रकारची स्वर्गीय तृप्ती देईल. जीवन म्हणजे एक बंधन आहे आणि प्रत्येक जन्मात हे बंधन क...