📮 अडीच अक्षर-१ 📮 (काही अनुभवलेलं...) 📮 ✉️ ✉️ ✉️ ✉️ ✉️ ✉️ 📮 मुन्शीराम डाकिया 📮 लेकर पिला पिला थैला पत्र बांटने आता यह है मुन्शिराम डाकिया सब की चिठ्ठी लता है सर्दी हो या गर्मी हो पानी गिरता छर छर छर चला जायेगा नही रुकेगा चिट्ठी देता घर घर घर... बडे डाक खानेसे आता कभी लाता रुपैय्या कभी किताबे दे जाता है मुझको हस हस भैय्या गाव गाव जाता है पर कभी नहीं है थकता लाता है सबकी खुशखबरी सब के मन को भाता ✉️ ✉️ ✉️ ✉️ ✉️ ✉️ शालेय जीवनात हिंदीच्या पाठ्य पुस्तकांत असलेली ही कविता! आज इतक्या वर्षांनीही जरा सुद्धा कष्ट न करता अगदी सहजपणे आठवते आणि गाताही येते. ही कविता वाचल्यावर, मग ती वेळ पहिली असो की दुसरी की शंभरावी असो, डोळे नकळत पाणावतातच, अगदी आजच्या इमेलच्या जमान्यात सुद्धा! अडीच अक्षर! अडीच अक्षर म्हटले की स...