🪔🪔🪔🦉लक्ष्मी-वाहन : घुबड🦉 🪔🪔🪔 🪔 भारत देश, शेती प्रधान पेक्षाही जास्त भक्ती प्रधान देश आहे. हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव-देवता आहेत. इथे कोटी हा शब्द संख्यावाचक नाही, तर उच्चतम/सर्वोत्तम या अर्थाने येतो. या सगळ्या देवतांप्रती ही भक्ती अनुभवास येते. त्यात सकळ जनांत प्रिय असणारी देवता म्हणजे माता लक्ष्मी. दिवाळी म्हटली की, या लक्ष्मी-प्रेमाला, भक्तीला अगदी उधाण येते. तिच्या स्वागताची आणि पूजनाची धांदल उडून जाते. पुष्पं, दीप, आकाश-दीप, रंगावली, वस्त्र-आभरणे, सुवर्ण-रजत दाग-दागिने आणि काय-काय! सोबतच नैवेद्यासाठी संपूर्ण फराळाचे पदार्थ चकली, शेव(अनेक चवींचे), चिवडा(विविध पद्धतींचा), लाडू(अगणित प्रकारचे), गोड-खारे शंकरपाळे, ओल्या नारळाची, सुक्या खोबऱ्याची करंजी, सांजऱ्या, चिरोटे, पाकातल्या पुऱ्या, खारी-गोड बुंदी, मोतीचूर, कडबोळे, अनारसे या सर्व मराठमोळ्या पदार्थांसोबतच अखिल भारतीय खाद्य-संस्कृतीमधील सर्व ज्ञात आणि लोकप्रिय असे अनेक पदार्थ!🪔 🪔 प्रत्यक्षात तर या लक्ष्मीची प्रचंड उलाढाल ...