🏃♀️🤾♀️ऑलिंपिक-२०२४ च्या निमित्ताने 🏋️♀️🚴♂️ (काही अनुभवलेलं...) अधिकृत प्रतिक चिन्ह ऑलिंपिक-२०२४ चे प्रतिकचिन्ह बऱ्याच आधी पासून बघायला मिळत होते. फारच लक्षवेधी वाटले. मनापसून आवडले. सर्जनशील वाटले. ते निर्माण करणाऱ्या कलाकाराला दाद द्यावीशी वाटली. माझ्या बौद्धिक कुवतीनुसार त्याचा अर्थ लावला. नंतर खरा अर्थ शोधला, अर्थातच आंतरजालात! तो असा, 'According to the official Paris 2024 website, the logo has significant historical meaning - and a name:Marrianne. within the logo are three symbols: the gold medal, the olympic flame, Marrianne the embodiment of The French Republic, bourn out of the 1789 French Revolution. म्हणजेच, अधिकृत पॅरिस २०२४ वेबसाइटनुसार, या प्रतिक चिन्हाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अर्थ आहे आणि नाव - मारियान. लोगोमध्ये तीन चिन्हे आहेत - सुवर्णपदक, ऑलिम्पिक ज्योत आणि मारियान, फ्रेंच प्रजासत्ताकाचे मूर्त स्वरूप, 1789 च्या फ्रेंच क...