😍 स्नेहाळ मेळावा!😍 (काही अनुभवलेलं...) अभ्यास सर्वेक्षणाच्या निमित्ताने घरी गेले होते. गेल्यावर कळले, दुसऱ्याच दिवशी मम्मी-दादांचे मित्र-मैत्रिणी जमणार आहेत. मी या सर्वांबद्दल बरेच ऐकून होते. त्यांची काही प्रकाशचित्रं सुद्धा पाहिलेली होती. तथापि त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग मात्र कधी आलेला नव्हता. आता मात्र त्या साऱ्यांनाच भेटता येणार म्हणून आनंद आणि कुतूहल सुद्धा होतेच. ही सगळी मंडळी म्हणजे प्रवासाच्या/सहलींच्या निमित्ताने झालेली ओळख. या सगळ्यांनी बऱ्याच सहली एकत्र केलेल्या आहेत. तथापि तब्बेतीच्या तक्रारींमुळे, गेले दोन-तीन वर्षांपासून मम्मी-दादांना प्रवास करणे शक्य होत नाही. तरीही या सर्वांची मैत्री अबाधित आहे. कायम ते एकमेकांच्या संपर्कात असतात. एकमेव समर्थन प्रणाली(support system) म्हणजे हुशार भ्रमणध्वनी(smart phone)! या हुशार भ्रमणध्वनीच्या नावाने कितीही शंख करा, त्याला बोल लावा, पण तो सगळ्यांसाठीच या ना त्या कारणाने...