😆 थोडं(खूप सारं) गोडाचं(लाडू)-६ (घरातील गमती जमती) आधीच्या भागात म्हणजे थोडं गोडाचं-४ https://www.anandipavus.com/2022/01/blog-post.html मध्ये जिलेबीच्या मेजवानीचा आस्वाद घेतलाच आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे, याच काळातील म्हणजे हिवाळ्यातील अजून दोन गोड? पदार्थांची मेजवानी आणि गमती जमती (त्या पदार्थांच्या आग्रहाच्या)या भागात बघू या. वरील वाक्यात गोड शब्दापुढे प्रश्नचिन्ह चुकून पडले की काय असे वाटण्याची शक्यता आहे, तुम्हा सगळ्यांना. पण ते चुकून पडले नाही, तर अगदी जाणीव पूर्वक घातले आहे. का? ते पुढे समजेलच. आजचे दोन गोडाचे पदार्थ म्हणजे हिवाळा खास आणि अतिशय आरोग्यकारक, पौष्टिक. तर हे दोन पदार्थ म्हणजे दोन प्रकारचे लाडू. तर आधी त्या वरच्या प्रश्नचिन्हाचे उत्तर मिळेल अशा लाडू पासून सुरवात करते. अर्थातच तुम्हा चाणाक्ष वाचकांनी आधीच ओळ...