💧💦जलमित्र जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने!💦💧 (featured) ६ डिसेंबर, म्हणजे आमच्या दादांचा, म्हणजेच माझ्या गुरूंचा म्हणजेच आंतरराष्ट्रीय किर्तीचे इतिहास आणि पुरातत्त्व संशोधक, जलपुरुष, संस्कृती पुरुष, ऋषीतुल्य, आदरणीय #डॉराश्रीमो म्हणजेच #डाॅराश्रीमोरवंचीकर #DrRSMorwanchikar #सातवहन आद्य संशोधक यांचा जन्म दिवस! दादा, खूप खूप आनंदी सदिच्छा! 💐💐💐 🙏🙇🏻♀️😇 गेल्या वर्षी याच दिवशी मी एक नवीन सदर सुरु केले होते "निवडक राश्रीमो"! जल मित्र जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने दोन शब्द, या खास दिवशी! पुरस्कार! मग तो कुठलाही असो, प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो, आपल्यालाच मिळावा असे वाटते. तो मिळण्यासाठी, मिळविण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले जातात. बरेच पुरस्कार तर असे असतात की त्यासाठी अर्ज करावे लागतात, अनेक औपचारिकता पर पाडाव्या लागतात, बऱ्याच दिव्यांतून जावे लागते, स्वतःला सिद्ध करावे लागतात. ...