Skip to main content

Posts

Showing posts from October, 2023

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

🌳वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे...३🌳 (चित्रं मालिका)

 🌳 वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे...३🌳  (चित्रं मालिका) बाप्पा जसा विविध प्रकारे रेखाटता येतो, तसेच झाडांचेही आहे. अगणित प्रकार आहेत वृक्ष रेखाटनाचे सुद्धा. कुठल्याही प्रकारे रेखाटले तरी ते झाड छानच दिसते एव्हढेच नाही तर ती सगळी झाडं डोळ्यांना, मनाला, ह्रदयाला, आत्म्याला एक आगळीच शांतता आणि सावली देतात! आज आणखी काही माझे आवडते प्रकार, बघायला आणि रेखाटायलाही !  आनंदी पावसाच्या माध्यमातून अनुभवा ही थंडगार सावली, ऑक्टोबरच्या रणरणत्या उन्हात. आपल्या सगळ्यांनाच एक हवाहवासा गारवा देईल!  आम्ही वास्तू विशारद, विविध वास्तूंचे आणि आवाराचे विधान(प्लान) रेखाटतो, तेव्हा त्यात निरनिराळ्या पद्धतीने झाडं रेखाटतो. त्यातील ही एक पद्धत, माझी अतिशय आवडती! एक पर्णहीन वृक्ष, त्यातही मला  सौंदर्य दृष्टीस आले, मग तोही रेखाटला. नुकतीच पालवी फुटत असलेली, एक शाखा! त्यावर विसावलेल्या पक्षांमुळे ती शाखा अजूनच  चैतन्यमयी झाली! आम्ही वास्तू विशारद, विविध वास्तूंचे आणि आवाराचे विधान(प्लान) रेखाटतो, तेव्हा त्यात निरनिराळ्या पद्धतीने झाडं रेखाटतो. त्यातील ही एक पद्धत, माझी अजून एक अति...