Skip to main content

Posts

Showing posts from September, 2023

🌸🌺🌷बाप्पा मोरया-२ 🌷🌺🌸 (चित्रं मालिका)

🌸🌺🌷बाप्पा मोरया-२ 🌷🌺🌸  (चित्रं मालिका) गणपती बाप्पा मोरया... 🎵🎶🎵🎶 !!! 🪔🪔🪔🪔🪔 🌸🌸🌸 🌺🌺🌺 🌷🌷🌷 🪔🪔🪔🪔🪔 सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची| नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची | सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची| कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा| चंदनाची उटी , कुमकुम केशरा| हिरेजडित मुकुट, शोभतो बरा | रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया| जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥ लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना | सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना| दास रामाचा, वाट पाहे सदना| संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना| जय देव जय देव, जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥ 🪔🪔🌸🌸🌸🌸🌸🪔🪔 https://youtu.be/w0W8Wh-8UCg?si=ylg2J5BfXgRaZeRc 🪔🪔🌸🌸🌸🌸🌸🪔🪔                  आज आणखी काही विविध माध्यमातील बाप्पा! खरतरं बाप्पा अगदी कुठल्याही माध्यमातून प्रकट होत असतो. अगदी कुठलेच माध्यम त्याला वर्ज नाही. मानवनिर्मित पासून ते निसर्गनिर्मित म्हणजेच स्वयंभू! अगदी श्रीफळ...

🌸🌼🌷बाप्पा मोरया-१🌷🌼🌸 (चित्रं मालिका)

 🌸🌼🌷बाप्पा मोरया-१ 🌷🌼🌸  (चित्रं मालिका) गणपती बाप्पा मोरया... 🎵🎶🎵🎶 !!! 🪔🪔🪔🪔🪔 🌸🌸🌸 🌺🌺🌺 🌷🌷🌷 🪔🪔🪔🪔🪔 ओम नमोजी आद्य   ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥ देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥ म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥ अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥ मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥ हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रम्ह कवळलें ॥ ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥ आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ॥ ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥ 🪔🪔🌸🌸🌸🌸🌸🪔🪔 https://youtu.be/7KSv1D2vpmw?si=PBNWePwp05VEXiYg 🪔🪔🌸🌸🌸🌸🌸🪔🪔          श्रावण चालू झाला म्हणजे सणवार-व्रतवैकल्ये जोमाने सुरु होतात.  प्रत्येक जण आपापल्या परीने, पद्धतीने, परंपरेने श्रावण साजरा करत असतो! बाप्पाचे तर साऱ्यांनाच श्रावणापासूनच वेध लागलेलेच असतात. अगदी आबाल-वृद्धांपासून, गृहिणी, कलाकार, लेखक, कवी, मूर्तिकार, रसिकजन, भक्तगण, पूजेसाठी लागणारे साहित्य विक्रेते, पूजा सांगणारे ब्राह्मण आणि स...

🎵🎶संगीतमय रेखांकन-२ 🎶🎵 (चित्रं मालिका)

🎵🎶संगीतमय रेखांकन-२ 🎶🎵 (चित्रं मालिका)     आज मनातील आणखी काही वाद्य.  मनातील सगळ्यात आवडत्या वाद्यांच्या जोडी सहित! संवादिनी(हार्मोनियम) टाळ, मंजिरी (जलरा, करताल, करताळा किंवा गिनी) वरची दोन नावं मला माहिती होती.  पण इथे प्रकाशित करायची म्हणून बरोबर आहेत  की नाही, हे शोधायचा प्रयत्न केला तर बाकीचीही नावं  सापडली. मग ती सर्वच इथे नमूद केली  मनातील सगळ्यात आवडत्या संगीत वाद्यांच्या जोडी पैकी एक! बाजा  (हार्मोनिका, फ्रेंच वीणा, माउथ ऑर्गन) मनातील वाद्य  डफली  मनातील वाद्य  चिपळ्या  मनातील सगळ्यात आवडत्या वाद्यांच्या जोडी पैकी दुसरे वाद्य! टाळ-चिपळ्या पाहिल्या की मनात आपोआपच  हा अभंग आल्याशिवाय राहातच नाही! https://youtu.be/fIRpCNDe_p8?si=NMPx7hX4NyWarBsy टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग दरबारी आले रंक आणि राव सारे एकरूप नाही भेदभाव गाउ नाचु सारे हो‍उनी निःसंग जनसेवेपायी काया झिजवावी घाव सोसुनिया मने रिझवावी ताल देउनी हा बोलतो मृदंग ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई एक एक खांब वारकरी होई कैलासाचा ना...

जन्माष्टमी(चित्रं मालिका)

जन्माष्टमी  (चित्रं मालिका)  वेणू गोपाल  बाल वेणू गोपाल  कान्हा  दह्या-दुधाची करतो चोरी  नंदाचा हरी...    माखन चोर  यशोदा नंदन