Skip to main content

Posts

Showing posts from July, 2023

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे...२ (चित्रं मालिका)

   वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे...२  (चित्रं मालिका)  अनिल अवचट यांच्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर  चित्र आहे, तेच बघून तसेच चित्र काढण्याचा प्रयत्न!   त्याच पुस्तकातील एक चित्र,  आवडले, मग तेही काढण्याचा प्रयत्न केला!  एकदा असेच विचार करता वाटले,  झाडाची जमीनीवर जशी रचना असते,  तशीच जमीनीच्या खाली सुद्धा असते  थोडक्यात प्रतिबिंब!  (फक्त जमीनीच्या वरच्या भागात  पानं, फूलं, फळं असतात  तर जमीनी खाली, यातील काहीही नसते.) मग ते लगेचच काढून सुद्धा पाहिले!  वारली शैलीतील झाड वारली शैलीतील अजून एक झाड!  आनंदी पाऊस  ( चित्रं मालिका  )  मे २०२३

माऊली : जीवन घटनाक्रम-५(समाधी पर्व) (featured )

  माऊली : जीवन घटनाक्रम-५    (समाधी पर्व) (featured ) छायाचित्र सौजन्य : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी फेसबुक पेज  चांगदेव गर्वहरण प्रसंगानंतर ज्ञानदेवांच्या मनात समाधीचा विचार आला. परंतु निवृत्तीनाथांनी त्यांना नकार देवून त्यांची समजूत काढली. त्यांना सांगितले समाधीपूर्वी आपण सर्व संत मांदियाळीसह तीर्थयात्रा करावी. तथापि ज्ञानदेवांची इच्छा होती, ही तीर्थयात्रा करतांना नामदेवांची सोबत असावी. मग त्यांना सोबत घेण्यासाठी म्हणून ज्ञानदेवादि भावंडे पुन्हा पंढरपुरास रवाना झाली. आज तीर्थयात्रा शब्दाचा अर्थ अतिशय संकुचित तर झालाच आहे, पण अर्थ बराच बदललाही आहे. तीर्थयात्रा म्हणजे देवदर्शन तर आहेच. परंतु त्या काळी अशा प्रकारच्या तीर्थयात्रेतून विविध ठिकाणच्या संत मांदियाळीचा सहवास मिळतो, विचार-चिंतनाची देवाण-घेवाण होते. समाजप्रबोधनाचे कार्य होते. समाजाला आपले दुःख, अडचणी व्यक्त करण्याची संधी मिळते. म्हणून तीर्थयात्रा! पंढरपुरास जाऊन त्यांनी नामदेवांस आपल्या सोबत तीर्थयात्रेला येण्याची विनंती केली. तथापि नामदेवांनी सांगितले, मी पंढरीरायास व...

माऊली : जीवन घटनाक्रम-४(आळंदी पर्व२) (featured )

  माऊली : जीवन घटनाक्रम-४  (आळंदी पर्व२) (featured )       आज गुरुपौर्णिमा! माऊली,  गुरु माऊली,  ज्ञानेश्वर माऊली,  जगत् माऊली रुपी गुरु, विश्व गुरु रुपी माऊली!  सविनय वंदन करून,  आज आळंदी पर्वाची सुरुवात करते! चारही भावंडे 'भावार्थदीपिका' लोकार्पण करून आणि काही काळ तेथील संत मांदियाळीत व्यतीत करून आळंदीस परतली. तोपर्यंत साऱ्या वार्ता आळंदी पर्यंत पोहोचल्या होत्याच. त्यामुळे आळंदीकरांचा, या भावंडांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होताच. तथापि प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. तसेच आळंदीत ही काही अपवादात्मक लोक होतेच. त्यांना अजूनही या भावंडांचे श्रेष्ठत्व, संतपण मान्य नव्हतेच. त्यामुळे त्यांचे, ज्ञानदेवादि भावंडास या-ना त्या कारणे त्रास देणे सुरु होतेच.  या काळात सर्वांना माहिती असलेले तीन प्रसंग घडले. पहिला प्रसंग म्हणजे ज्ञानदेवांचा विसोबाने काही कारणास्तव अवमान केला. तो अवमान ज्ञानदेवांना सहन न झाल्याने ते कुटीत आले आणि ताटीचे दार बंद करून घेतले. त्यांनी दार उघडावे म्हणून, मुक्ताईने ' ताटीचे अभंग' रचले, "ताटी उघडा...

माऊली : जीवन घटनाक्रम-३(नेवासा पर्व) (featured )

  माऊली : जीवन घटनाक्रम-३ (नेवासा पर्व) (featured ) नेवाश्यात प्रवेश करते वेळी, यांना एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या अंतिम यात्रेस सामोरे जावे लागले. ज्ञानदेवांनी तात्काळ प्रेतयात्रा थांबवून, प्रवरेतील अमृतजलाच्या सिद्धीने सच्चिदानंदांचे कलेवर सर्वासमक्ष सजीव केले. पुढे जाऊन हेच सच्चिदानंद कुलकर्णी ज्ञानदेवांच्या निरूपणाचे आणि सर्वच साहित्याचे लेखकु झाले. पुढील सर्व काळ त्यांच्या बरोबरच राहिले. आणखी एक चमत्कार! आपल्याकडे कुणाही थोर व्यक्तीचे आयुष्य चमत्काराशिवाय पूर्णच होत नाही. तथापि इथेही क्षणभर थांबून, थोडा विचार व्हावा. परत भूतकाळाची पुनरावृत्ती झाली, पैठणकरांप्रमाणेच नेवासेकरांनी  त्यांचे भव्य स्वागत केले. सारा गाव त्यांच्या दर्शनासाठी गोळा झाला आणि त्यांचे वास्तव्य तसेच योग-क्षेमाचे प्रश्न सुटले. इथेही त्यांनी सांगितले, आम्ही संन्यासी आहोत, आम्ही मंदिरातच वास्तव्य करू. आणि त्यांनी प्रवरे काठच्या शिवालयात वास्तव्याचे नक्की केले.  मधल्या काळात हे शिवालय उध्वस्त झाले होते. त्याचे कारण समजू शकत नाही. तथापि महापूर किंवा ...