राधा-लक्ष्मी दालन (featured) माझे गुरु, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास आणि पुरातत्व संशोधक , संस्कृती पुरुष , ऋषीतुल्य आदरणीय डॉ रा. श्री. मोरवंचीकर यांनी आपला व्यक्तिगत ग्रंथ संग्रह(जवळपास तीन हजार ग्रंथ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, महाराष्ट्र येथे देणगी स्वरूपात दिला. त्या दालनाचे नामकरण "राधा-लक्ष्मी दालन" असे केले. उद्घाटन प्रसंगी माझे याबद्दल दोन शब्द. मी स्वतः या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. तथापि उपस्थित मान्यवरांनी उद्घाटन प्रसंगी हे माझ्या वतीने वाचून दाखविले. तेच इथे प्रकाशित करत आहे. राधा-लक्ष्मी दालन! ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर , महाराष्ट्र) याबद्दल बोलायचे झाले तर मला तीन मुद्दे महत्वाचे वाटतात. एक- हा ग्रंथ संग्रह कुणाचा ? दोन– या ग्रंथ संग्रहात काय काय आहे ? तीन– या दालनाचे नाव राधा-लक्ष्मी दालन का ? तर हा संग्रह आहे , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहास आणि पुरातत्व संशोधक , संस्कृती पुरुष , ऋषीतुल्य आदरणीय डॉ. प्रा. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर सर यांचा! सरां...