थोडं (खूप सारं ?) गोडाचं-४(जिलेबी) (घरातील गमती जमती) आपला सगळ्यात गोड सण तोंडावर आलाय. त्यानिमित्त ही गोडाची मधुर मेजवानी! अर्थातच आमच्या घरातील मकरसंक्रांती निमित्ताची खास मेजवानी. आमच्या घरी अगदी वर्षानुवर्षे प्रत्येक सणाची आणि काही खास दिवसांची एक खास आणि ठरलेली मेजवानी असते. आज मकरसंक्रांतीच्या खास मेजवानीची गोष्ट, जिलेबीच्या मेजवानीची कुरकुरीत मधुर गोष्ट. आम्हा सगळ्यांची अतिशय लाडकी . किती लाडकी , तर त्यादिवशी वरण, भात, भाजी, पोळी कोशिंबीर वगैरे स्वयंपाक केला जात असेच, पण अगदी नावालाच. त्यादिवशीचे दुपारचे जेवणं, रात्रीचे जेवणं, दुसऱ्या दिवशीचे जेवणं म्हणजे जिलेबी, फक्त जिलेबी आणि जिलेबीच! अर्थातच जिलेबी दुकानातून विकत आणलेली नाही तर, पूर्णपणे घरघुती, घरी केलेली, अगदी प्रत्येकवेळी गरमागरम आणि कुरकुरीतच! चला तर मग आता या आमच्या लाडक्या जिलेबीची गोष्ट सांगते, अगदी सविस्तर. मी आधीच्या काही लेखात ...