मेथीची भाजी (काही अनुभवलेलं ...) तीन दिवसांचा उत्खनन दौरा संपवून आज सकाळीच घरी परतले . गेले तीन दिवस घरी नसल्याने घरात भाजी नसणार हे गृहीतच होते . डोक्यात विचार चालू होते , काय स्वयंपाक करावा आज ? विचार करता करता एकदम आठवले , मी माझ्या बालकनीतील कुंड्यांमध्ये मेथी लावलेली होती आणि जातांना काळजी वाटत होती , मी गेल्यावर मेथीला नियमित पाणी घातले जाईल ना , की मी आल्यावर मला वाळलेली मेथी बघायला मिळेल ? हे आठवताक्षणी मी बालकनीकडे धाव घेतली . छान हिरवीगार मेथी बघायला मिळाली आणि माझा जीव भांड्यात पडला . खरंतरं ती मेथी बघून एक आगळाच उत्साह संचारला माझ्यात ! ठरलेच माझे , आज सगळ्यात पहिल्या दोन कुंड्यामधील मेथी काढून तीच भाजी करायची . पुढे लागोलाग विचार आला , बऱ्याच दिवसांपासून ठरविलेले पोपटी भाजीचे लिखाणही करावे . आणि केली ही सुरवात , सगळी आवरा आवारी झाल्यावर . आधी कुंडीतील मेथीची गोष्ट सांगते . खरंतरं माझ्याकडे...