Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

आनंदी सोहळा-२ ( उत्तरार्ध )

  आनंदी सोहळा-२ ( उत्तरार्ध )    💧💦 "आनंदी‌ पाऊस" वर्षावातील‌ सारे‌ लेख वाचत असताना 'आपल्या ‌आठवणीची बरसात माला ही visualise होतेय.😍🤩🤓 ह्या आनंदी वर्षावाचे‌ थेंब हे 'गारेगार icecream व तिखट गोड दिवाळीच्या फराळाप्रमाणे असो वा दिव्याच्या सणाच्या‌ आठवणी................ सारे आल्हदायकच!!!!😘🤩 'चौधरीसदनातील' बाल्कनीतील‌ गंमतीजमती व‌ बागेतील मऊ आठवणी,चरखा पेटी व स्वातंत्र्यसैनिकांसाठी केलेला‌ नित्यउपवास........हे Greatच.👏🏻 दराब्याचे पहिल्यांदाच पाहिलेली पाककृती व डोसा,इडली चटणी🍽️ खाण्याच्या पाककृती....आहा हा !आहा हा😍😋 ✈️🚊"गोष्टी आपल्या पर्यटनाच्या मधील आठवणीचे थेंब आपसुकच त्या ठिकाणी घेऊन जातात. "भेटवस्तूंची ध्वनीफित ऐकताना,प्रासंगिक भेटवस्तुंचे महत्व व त्यामागच्या आठवणी अप्रुप  वर्णिलेआहे.. खरोखरच भेटवस्तूरूपी आठवणी ह्या जास्त मौल्यवान असतात हे खरे मर्म." असाच सर्वांच्या मनात बरसणारा 'आनंदी ‌पाऊस वर्षाव ',☔🌧️ कोणत्याही'instrument'मध्ये अमापनीय आहे. || पुढील लेखन-वाट चालीस माझ्याकडून शुभेच्छा || 💐 संजीता माझी एक छान मैत...

आनंदी सोहळा-२ (पूर्वार्ध )

 आनंदी सोहळा-२ (पूर्वार्ध ) 🌺🌺🌺 आजच्या या आनंदी सोहोळ्यात आपल्या सगळ्यांचे  अगदी प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक स्वागत ! त्रिवार स्वागत ! 💐💐💐 तू चालवलेल्या प्रयत्नाला शास्त्रीय भाषेत "इन्ट्रोव्हर्टेड कल्चर" (introverted culture) म्हणजे अंतर्मुख करायला लावणारी संस्कृती म्हणतात. म्हणजेच दार बंद केल्यावर सुरु होणारी संस्कृती, स्त्रिया, मुलं, चलन वलन, स्वयंपाक-पाणी, पंगती, त्यातील पदार्थ, ते कसे बनविले जातात वगैरे वगैरे. सध्या मानवाची कुटुंब विभाजनाची प्रक्रिया, अगदी एकेकट्या राहण्याच्या शेवटच्या टोकापर्यंत वाटचाल सुरु आहे. तू , हरवत चाललेली संस्कृती, निरनिराळ्या प्रकारच्या निमित्ताने आनंदाचे रूप घेऊन, तप्त झालेल्या पृथ्वीला/समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न करतेस. तुझ्या आनंदी पावसाचा हा आत्मा आहे.  आनंदी पाऊस केव्हा-जेव्हा सगळे तृषार्त झालेले असतात, वैशाख वणवा पेटलेला असतो, सगळेच पावसाची आतुरतेने वाट बघत असतात .....                  गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले .....              ...

शेवपुरी (अनुभवलेलं काही...)

 शेवपुरी  (अनुभवलेलं काही...)                                 ही गोष्ट आहे , मी एका खाजगी कार्यालयात काम करत होते , तेव्हाची . मुख्य कार्यालय अगदी हमरस्त्यावर , तेही माझ्या अगदी आवडत्या ! जायला यायला सोयीचे , कार्यालयाची वेळ संपली की त्याच भागात भाजारहाट करून घरी परतता येत असे . त्यातच तिथे छान मैत्रिणी पण मिळाल्या , त्यामुळे एकदम खुश होते मी . पण माझ्याच पाय गुणामुळे 😄 की काय कार्यालयातील प्रकल्पांची संख्या वाढली . त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढवावी लागली . कार्यालयाची जागा तशी फारशी मोठी नव्हती . म्हटलं या नवीन कर्मचाऱ्यांना बसवणार तरी कुठे ? तर आम्हा सगळ्यांचीच बसण्याची सोय एका दुसऱ्या जागेत करण्यात आली .                            आता आमच्यासारख्या कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्यांचा खूपच राबता असतो , तसाच आमच्या कार्यालयात सुद्धा होताच . क्लायंट , कंत्राटदार , मजूर , माल पुरवणारे वगैरे वगैरे . त्या...

लाकडी गल्ला (माझा वारसा)

  लाकडी गल्ला  (माझा वारसा)                             मी आता पर्यंत , वारसा स्पर्धा आणि माझा वारसा या सदरातून माझ्या/आमच्या बऱ्याच वारसा असलेल्या गोष्टी आणि त्यांच्या विषयी माहिती सांगितली . अजूनही अशा बऱ्याच वारसा असलेल्या गोष्टी सांगणार आहेच . या सगळ्या उपक्रमांच्या आधी मला यातील फारच मोजक्या गोष्टी माहिती होत्या . पण या उपक्रमामुळे मला बऱ्याच गोष्टींची नीट , पूर्ण आणि खोलवर माहिती झाल्या . पैकी सगळी माहिती मला दादांकडून (वडील) मिळाली . पण माझ्या दोन काकूंनी , या सगळ्या वस्तू अजूनही नीट जपून ठेवल्या आहेत . एक काकू म्हणजे जी अजूनही आमच्या मूळ घरात राहते आणि दुसरी काकू , जी खूप वर्ष आमच्या मूळ गावी असलेल्या घरात राहिलेली आहे . यापैकी फार थोड्या वस्तू वापरात आहे आज , बाकीच्या वापरात नसलेल्या वस्तूही त्यांनी नीट , अगदी निगुतीने जपून ठेवल्या आहेत . म्हणजे खऱ्या अर्थाने वारसा जपून ठेवण्याचे काम त्यांनीच केले आहे आणि अजूनही करत आहेत . या वस्तू जपून ठेवणे म्हणजे खूप सोपे काम नसते खरतरं . वेगळ्या अर्थान...