आमचा चाट कॉर्नर, घरातला-१! (घरातील गमती जमती) घरातील गृहीणी सगळ्याच बाबतीत हौशी असली तर, घरातील सगळ्याच सदस्यांची सगळ्याच बाबतीत एकदम चंगळ असते. त्यापैकी एक महत्वाचे म्हणजे जीभेचे चोचले! आणि चौधरी सदन या बाबतीत खूपच भाग्यवान! यातील एक भाग म्हणजे हा आमचा घरातील चाट कॉर्नर! हल्ली सगळ्या भारतभर चाट माहितीचा आणि आवडीचा सुद्धा. अगदी सगळीकडे मुबलक प्रमाणात चाट ची दुकानं, गाड्या, ठेले असतात. खायची इच्छा झाली की लगेचच खायला मिळते. अर्थातच चव आणि स्वच्छतेचा मात्र मोठ्ठा प्रश्न असतो. पण बऱ्यापैकी घरोघरी सुद्धा यातील काही पदार्थ बनविले आणि खाल्ले जातात. आम्ही लहान असतांना मात्र तसे नव्हते. अख्ख्या गावात एखाद-दुसरीच गाडी असे चाटची आणि त्यावरील ग्राहकांची संख्या सुद्धा खूप तुरळक. हल्ली तसे नसते, अगदी 'सुलभ' च्या शेजारी जरी चाट ची गाडी, ठेला, दुकान असले, तरी तिथे खाण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. मला तर हे वाक्य ल...