जनपद लोक (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) बंगळुरू-म्हैसूर महामार्ग! कायमच वाहतुकीची कोंडी! किंबहुना वाहतुकीच्या कोंडी साठीच प्रसिद्ध! एक तर रहदारी खूप . त्यातच आधी रस्त्यांची कामं, मग उड्डाण पुलांची कामं नंतर मेट्रोच्या पुलाची कामं. अशी एक ना अनेक कारणं त्यात सतत भर घालतच असतात , वाहतुकीची कोंडी होण्यासाठी! अर्थातच आम्ही सुद्धा बऱ्याचवेळा वाहतूक कोंडीचा भाग असतोच. आणि या वाहतूक कोंडी मधील बरेचसे हौशी पर्यटक न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, संध्याकाळचा चहा-खाणं या सगळ्यासाठी या महामार्गावरील एका कामात उपहार गृहात थांबतात, अगदी आम्ही सुद्धा! तिथे गेले की आधी गाडी लावायला जागा मिळायची मारामार. ती मिळालीच तर बसायला टेबल खुर्ची मिळायची मारामार! पण तरी बहुतेक सगळ्यांना तिथेच आवडते. तिथले अन्नपदार्थ तर छान असतातच आणि तिथले एकंदरीत वातावरण सुद्धा खूप छान असते! असो. ...