उनपदेव
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
जळगाव पासून ३८ कि मी, चोपडा पासून २५ कि मी आणि अडावद पासून ६ कि मी अंतरावर असलेले हे ठिकाण
सातपुड्याच्या पायथ्याशी अतिशय निसर्गरम्य, अगदी निसर्गाच्या कुशीतच आहे.
पुर्वी इथे गाव असल्याच्या खुणा आहेत.
रामायण कालीन शरभंग ऋषींचा आश्रम असल्याचे सांगितले जाते.
श्रीराम चौदा वर्ष वनवासात असतांना, शरभंग ऋषींच्या उपचारासाठी रामाने बाण मारून उष्णोदक झरा निर्माण केल्याची आख्यायिका सांगितली जाते.
पण काहीही ऐतिहासिक पुरावा नाही.
शिवाच्या देवालयाच्या खालच्या बाजुने भरीव दगडास एक गोमुख आहे. या गोमुखातुन अखंडपणे गरम पाणी येत असते . त्याखाली लाल विटांच्या बांधलेल्या हौदात पडते.
७.५ मी लांबी असलेला चौकोनी हौद, १. ७५ मी खोल आहे. हे पाणी ६० डीग्री सेन्टिग्रेड तापमानाचे असते. बऱ्याच लोकांची समजुत आहे, हे पाणी त्वचेचे सगळे आजार बरे करते
या कारणांमुळेही बरेच लोक या ठिकाणी येतात.
पण हे पाणी चवहीन आहे. त्याला एक विशिष्ट वास आहे. हा वास गंडकापेक्षा खूप वेगळा आहे. बॉंबे मेडीकल अँड फिजिकल सोसायटी ने केलेल्या, परीक्षणाअंती सिद्ध झालेले आहे की या पाण्यात कुठलेही वैद्यकीय गुणधर्म नाहीत.
तिथला दगड खूप कठीण असल्या कारणाने, या झऱ्याचे उगमस्थान अजुनही माहीती नाही.
पुर्वी हे स्थान त्रंबकेश्वरच्या खालोखाल पवित्र मानले जात असल्याने, दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी होत असे.
या परिसरात मुरलीधर(कृष्ण बलराम), राम(सीता लक्ष्मणासह), हनुमान, महादेव, गणपती आणि शनी यांचे देवालय आहेत.
उत्तरेस टेकडीवर गोविंद महाराजांची समाधी आहे.
उष्णोदक हौदाच्या पश्चिम बाजूला लागुनच जमिनीत, शरभंग ऋषींची गुंफा आहे.
गुंफेत महादेवाचे लिंग आहे.
शहरी जीवनापासुन लांब आणि सातपुड्याच्या पायथ्याशी हे ठिकाण असल्याने, निसर्गाच्या सानिध्यात, शांततेत वेळ घालवल्याने मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती आणि आनंद मिळतो.
©आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
उनपदेव चा इतिहास
गोमुख
पाण्याचे कुंड
It is said that ।।।।। If you take bath in this hot water you will not get skin problems ।।
ReplyDeleteHow ever the flow of hot water is totally reduce ।। Feed back
yeah , true ! flow is reducing day by day as water level is going deeper n deeper day by day . we humans are only resonsible for this .......very sad....
Deletenot all hot water springs cures skin diseases . n this doesnt for sure ....
thnk u so much !
Apratim
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteखूप छान
Deleteधन्यवाद 😊
DeleteAkka,I mentioned about it and you wrote on same. You could get good photos but when we visited 2 years back it was not in good condition.
ReplyDeleteactually it was lined up before u told.
Deletebut yes u can always suggest , so that i get new topics.
thnks a ton!
खूपच सुंदर स्थान आहे हे, मी देखील ३ वेळेस तेथे जाऊन आलो आहे . सुंदर लेख सुंदर वर्णन.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
DeleteChan thikan ahe mi pan fhar varshanpurvi bhet dili pan etaki detail mahit navhati mahit chan varnan kelas kahi goshti vistrut kalala
ReplyDeleteआता सोबत जाऊ एकदा नक्की आणि सगळी ठिकाण नीट बघू आणि अनुभवू तिथली !
Deleteछान माहिती
ReplyDeleteधन्यवाद 😍
DeleteWa chan mahiti aahe Unaodev thikanachi
ReplyDeleteKadhi janyacha yog nahi aala pan nakki jau pudhe����
मनःपूर्वक धन्यवाद !
Deleteवर्णन छान
ReplyDeleteमी अजुनही बघितले नाही. त्यामुळे या रूपात भटकंती झाली
नाहीतरी आता काही काळ सगळे virtual करावे लागणार आहे 😝😊
DeleteKhup chhan ..purvi mhnayche ki tya panyat sulfer aahe..mhanun skin disease hot Nahi pn tasa Kahi lab testing madhe prove zale nahiye..bt chhan spot aahe.,👍👍
ReplyDeleteनाही नाही . ह्या पाण्याच्या चाचण्या झाल्यात , त्यात सिद्ध झालेय . हे पाणी औषधी पाणी नाही , कुठलेही रोग यात बरे होत नाहीत
Deleteखुपच छान माहिती उनपदेव सुनप देव पण आहे ना तिथे? माझ्या मैत्रिणी जायच्या तिथे
ReplyDeleteफोटोमुळे तिथे गेल्यासारखे वाटते👍🏻🌷
सुनप देव पण आहे पण ते इथे नाही . बऱ्याच वेगळ्या ठिकाणी आहे ते , त्याबद्दल नंतर कधीतरी सांगेन .
Deleteफरकांडे झुलते मनोरे वाचून जुनी आठवण झाली आम्ही तिथे गेलेलो आहे त्या मनोऱ्यावर मी वर पर्यंत गेलेली आहे आणि आम्ही जाऊन आल्यानंतर आठ दिवसात दुसऱ्या मनोरा पडला होता गमतीने ऑफिसचे काही लोक गमतीने आम्हाला म्हणले होते तुम्ही तिथे जाऊन आले ना म्हणून तू पडला म्हणून माझा हा मनोरा लक्षात आहे👌👌
ReplyDeleteवावा भारीच आठवण ! पण तुम्ही नशीबवान ठरला , तुम्हाला दोन्ही मनोरे बघता आले !
DeleteKhupach chan varnan keley tai ase vatte Unapdev lach jaun aloy
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !
Deleteउनपदेवला फास्परस जमीनीत असल्यामुळे झरा गरम पाण्याचा आहे. रोग बरा होतो ही भावना खरीही असेल पण त्या फास्परसयुक्त पाण्याने.
ReplyDeleteमी हे स्थळ बऱ्याच वेळा बघितले आहे.
मनःपूर्वक धन्यवाद !
DeleteThis has refreshed my childhood memories we used to go here every year and its really very sacred and beautiful place...inwas also unaware of the information about it....nice article
ReplyDeletegreat ! thnks a tons !
Deleteमी उनपदेवला लहानपणी गेलो होतो तेव्हा जरा लांब जाउन डोंगराच्या पायथ्याशी गरम वथंड पाण्याचे झरे असल्याचे मला आठवतात थंड पाणी अतिशय गार वगोड होते .तू सर्व वर्णन फारच सुंदर केले आहे मंदा चौधरी.
ReplyDeleteअरे वावा ! ही तर माहिती !
Deleteखूप छान माहिती आणि फोटो पण
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !
Delete