Skip to main content

थोडं (खूप सारं😉😆) गोडाचं-१(दराबा) (घरातील गमती जमती)


थोडं (खूप सारं) गोडाचं-१(दराबा)

(घरातील गमती जमती)




                                                         घरात सगळेच खाण्याचे शौकीन, मुख्य म्हणजे आमचे बाबा सुद्धा! त्यामुळे सारखं काही ना काही करणं आणि खाणं अखंडपणे चालूच असे. खाण्याच्या बाबतीत तर सगळ्यांचा भरपूर उत्साह होताच, पण करणाऱ्यांचा (सगळ्या मम्मी लोकांचा) सुद्धा उत्साह तेव्हढाच किंवा काकणभर जरा जास्तच मी तर म्हणेन. सगळं अगदी उत्साहाने करत. त्यांच्या या उत्साहाला आणि मेहनतीला तर कायमच आणि वारंवार सलाम करावासा वाटतो. कारण कुठलीही गोष्ट करायची असो, कधीही थोडी थोडकी करून भागतच नसे. त्यामुळे खूप बांधीलकी आणि वचनबद्धता असणे आवश्यक असे. बरं त्यांनी कुठलीही गोष्ट करायची म्हणून केली असे होत नसे . सगळं अगदी साग्रसंगीतच, योग्य आणि व्यवस्थितच करत असतं. जणू कंटाळा, थकवा असले शब्दच त्यांना माहीती नव्हते.  बरं घरातील सगळेच, सगळ्याच  म्हणजे गोड, तिखट, मसालेदार, चटपटीत, आंबटगोड अशा सगळ्याच चवीचे खाण्याचे शौकीन. या सगळ्याच पदार्थांच्या धम्माल गोष्टी मी सांगणार आहेच. आज मात्र थोडं गोडाचं .... 
                                                          सगळ्यात पहिला गोडाचा पदार्थ म्हणजे "दराबा", खान्देशची शान आणि प्रत्येक खान्देशी व्यक्तीच्या अगदी मना-हृदयाच्या  जवळचा आणि सगळ्यात आवडीचा! माझ्या तर खूपच आवडीचा! खान्देशी गोड राजा, दराबा! तर आजच्या या लेखात या खान्देशी गोड राजाची, दराब्याची गोष्ट. आमच्याकडे आणि प्रत्येक खान्देशी घरात हा दराबा वर्षातून कमीत कमी वर्षातून दोनदा होतोच. दिवाळीच्या गोडाच्या पदार्थांचा राजा म्हणजे दराबा, त्यामुळे दिवाळीत होतोच होतो एकदा आणि दुसऱ्यांदा म्हणजे अक्षय्य तृतीयेला. बाकी मग अजून कधी मूड आला की मग परत आहेच, हल्ली तर मूड आला तर कधीही वर्षभर मागणी करून विकत मिळतो. हे म्हणजे फार मेहनतीचे आणि कष्टाचे काम. दराबा पूर्ण तय्यार व्हायला कमीत कमी तीन दिवस तरी लागतातच. 
                                                            सगळ्यात आधी गहू ओले करावे लागतात. आमच्याकडे तेव्हा जवळ-जवळ आठ शेर गहू ओले केले जात. हे ओले केलेले गहू, मग रात्रभर एका सुती कापडात बांधून ठेवावे लागतात. दुसऱ्या दिवशी हे सोडून, घरातच किंवा सावलीतच थोडा वेळ वाळत घालावे. थोड्यावेळाने एक गव्हाचा दाणा, दाताने फोडून बघायचा, तो जर फुटला तर त्याचा अर्थ ते गहू बरोबर वाळले आहेत. मग हे गहू दळून घ्यायचे आणि दळल्यावर सोजीच्या चाळणीने चाळुन घ्यायचे. जर हे आठ शेर गहू असतील तर त्यातून दोन शेर रवा आणि सहा शेर सोजी निघते. आमच्याकडे या सहा शेर सोजी पैकी, चार शेर सोजी दराब्या करीता वापरली जात असे आणि उरलेली दोन शेर दुसऱ्या एका गोडाच्या पदार्थासाठी वापरली जात असे. त्याची गोष्ट नंतर कधीतरी. 
                                                            मग ही सोजी छान पैकी मंद आचेवर तुपात भाजून घ्यायची. चार शेर सोजीला जवळ जवळ तीन-साडे तीन किलो तरी तूप लागते. त्यातही हिवाळ्यात जास्त तूप लागते आणि उन्हाळ्यात थोडे कमी तूप लागते. आता आमच्याकडे एव्हढी सोजी भाजायची असायची त्यामुळे कढई वगैरे उपयोगाचीच नाही. किती तरी वेळ लागणार थोडी भाजत बसल्यावर. आमच्याकडे लोखंडी, पितळी आणि अल्युमिनियम च्या बऱ्याच वेगवेगळ्या मापाच्या घमेल्या होत्या. मग त्यापैकी एखादी घमेलीच मग गॅसच्या शेगडीवर आरूढ होत असे. मग त्यातच मस्त मंद आचेवर सोजी भाजली जात असे. हे चालू असतांना सगळ्या घरभर, छान वास दरवळत असे आणि जिभेवर जवळ-जवळ दराब्याची निम्मी चवच येत असे. त्यामुळे दराबा खाण्याची तल्लफ जोरातच खवळून उठत असे. पण लगेच दराबा तयार होणार नाही हेही नक्कीच माहित असे, त्यामुळे वाट बघण्याशिवाय दुसरा पर्यायच नसे. तर ही सोजी तुपात छान मंद आचेवर तुप सुटेपर्यंत छान भाजून घ्यायची. ही भाजलेली सोजी तशीच झाकून एक दिवस तरी किंवा कमीत कमी बारा तास तरी ठेवून द्यायची. असे केल्याने ती छान मुरते. 
                                                             मग दुसऱ्या दिवशी खरी मज्जा! कारण इथपर्यंतचे दराब्याचे काम मम्मी लोक करत. पण या पुढचे काम फार मेहनतीचे आणि कष्टाचे काम. या कामासाठी दादा-पप्पा-नाना यांचा सुद्धा सहभाग असे, म्हणण्यापेक्षा त्यांच्या सहभागाशिवाय हे काम केवळ अशक्य. हे काम म्हणजे हा एक दिवस मुरलेला दराबा रगडणे. रगडणे म्हणजे काय तर एक मोठ्ठी परात किंवा घमेली घ्यायची, त्यात डावा हाताचा तळवा ठेवायचा, त्यावर थोडा थोडा दराबा घ्यायचा आणि उजव्या हाताच्या तळव्याने त्यातील कण आणि कण रगडून काढायचा. अगदी प्रत्येक कण रगडला जायला हवा, अगदी एक बारीक सुद्धा गाठ राहायला नको. हा कार्यक्रम आमच्याकडे रात्री साडे आठ नंतर चाले. सगळी पुरुष मंडळी घरी येऊन त्यांची जेवणं वगैरे आवरेपर्यंत साधारण हीच वेळ होत असे. मागचे आवरून मम्मी लोक सुद्धा त्यांच्या मदतीला येत. मदत म्हणजे त्यांना ही भाजलेली सोजी देणे , रगडून झालेली वेगळी काढून ठेवणे. घरातील पुरुष मंडळी, घरातील कामात सहभागी झाले म्हणजे एक वेगळीच मज्जा येते. जवळ-जवळ चार किलो सोजी आणि साधारण तेव्हढेच तूप. किती तरी होत असे हे सगळे. त्यामुळे हा रगडण्याचा कार्यक्रम सुद्धा जवळ-जवळ दीड-दोन तास नक्कीच चालत असे. पार थकून जात सगळे जण ही सोजी रगडून-रगडून! 
                                                           त्यानंतर वेळ येते, ती यात पीठी साखर कालवायची. साधारण जेव्हढी सोजी तेव्हढीच पीठी साखर, म्हणजे चार शेर सोजीसाठी चार शेर पीठी साखर. चार शेर पिठी साखर म्हणजे जवळ-जवळ चार किलोला थोडी कमी. आता बहुतेक सगळीकडे बाजारात पीठी साखर मिळते, निदान महाराष्ट्रात तरी. पण तेव्हा काय परिस्थिती होती हे माहिती नव्हते मला. त्यात आमच्याकडे सगळे घरी करण्याची पद्धत/सवय होती, अजुनी आहे . मिक्सर जेव्हा पहिल्यांदा घरात आला, तो प्रसंग अगदी नीट आठवतोय मला . मग त्याआधी एव्हढी साखर कशी बारीक करत?, आणि एव्हढी साखर मिक्सर मध्ये बारीक करणे सुद्धा सोप्पे नव्हतेच. अंधुक आठवत होते, तेव्हा आमच्याकडे एक छोटसं 'जातं' घरात होतं. पण जमिनीत एका जागी घट्ट गाडून ठेवलेले नव्हते . पण ती कोळशाची इस्त्री ठेवायला जशी लोखंडी मांडोळी होती, तशीच एक दगडी मांडोळी(रिंग) होती. तिचा व्यास साधारण जात्याच्या व्यासाइतकाच होता आणि उंची पाच-सहा इंच असावी. तर या जात्यावर साखर दळली जात असावी असे वाटले. पण खात्री नव्हती. मग परत त्याबद्दल मम्मी-दादांबरोबर चर्चा केली, व्हाट्सअँप वर. त्यावर मम्मीचे उत्तर आले, काही वेळेला जात्यावर दळल्याचे आठवतेय.  दादांचे जे उत्तर आले, त्याने मात्र मला मोठ्ठाच धक्का बसला. ते म्हणाले आपण मॉरिशिअस वरून आयात केलेली पिठी साखर वापरत होतो. आधी मला वाटलं  चेष्टा करत आहे. परत विचारले खरंच की चेष्टा  माझी? तर त्यांचे उत्तर आले, खरंच  तेव्हा उच्चं आणि चांगल्या प्रतीची, तीच साखर बाजारात उपलब्ध होती . मला चांगलाच धक्का बसला! लगेचच त्यांना सांगितले, सकाळी फोन करते तेव्हा बोलू. मला  घाई झालेली, केव्हा एकदा सकाळ होते आणि केव्हा एकदा मला  बोलायला मिळते. 
                                                           आमच्याकडे शेती होती आणि शेतात कायम साखरेचा ऊस लावलेला असे . मग तरी असे का? बाहेरच्या देशातून आयात केलेली साखर का वापरली जात असे आपल्या घरात? बरं आमच्या घरात , असे बाहेरच्या देशातून आयात केलेल्या गोष्टी वापरण्याचे कौतुक आणि प्रस्थ अजिबातच नव्हते, किंबहुना अजूनही नाही . एकदाची सकाळ झाली  आणि त्यांना फोन केला . तर त्यांच्याकडून मिळालेली माहिती फारच धक्कादायक आणि अकल्पित होती. ऊस  आपल्याकडे भरपूर पिकवला जात असला तरी, त्यापासून गुळ आणि खानसरी बनवली जात असे. खानसरी म्हणजे उच्च प्रतीच्या गुळाची भुकटी (पावडर).  आरोग्यदायी जीवन सरणी होती तेव्हा!  साखर कारखानेच नव्हते  (आता हीच साखर बहुतेकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.) त्यामुळे साखर वेगवेगळ्या देशातून आयात केली जात असे. त्यात सगळ्यात चांगल्या प्रतीची साखर म्हणजे मॉरिशिअसची . मग हीच वापरली जात असे आपल्या घरात. त्यांना भाव सुद्धा आठवतोय, नशिराबादला असतांना एक रुपयाची तीन किलो आणि नंतर जळगावला आल्यावर एक रुपया किलो. चौधरी  सदनाच्या या उपक्रमामुळे मला सुद्धा  ही आणि अशी कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळतेय. अन्यथा या आणि अशा विषयांवर माझी त्यांच्याशी कधी चर्चा झाली असते असे नाही वाटत. 
                                                           तर जेव्हढी सोजी तेव्हढी पिठी साखर, वेलची पूड, जायफळ हे सगळे घालून सगळं छान एकत्र कालवायचे. ह्या साखरेची सुद्धा अगदी मऊशार भुकटी(पावडर) हवी अगदी सोजीच्या चाळणीने चाळलेली. पिठी साखर सुद्धा घरी दळलेली असो किंवा बाजारातून विकत आणलेली असो, सोजीच्या चाळणीने चाळूनच घेतलेली हवी. त्यात अगदी एखादाही, अगदी बारीक सुद्धा खडा नको साखरेचा. मग हे सगळे छान मिळून येईपर्यंत कालवायचे. सगळे अगदी छान जमलेले असले तर छान पांढरा शुभ्र रंग येतो. त्यात मुख्य म्हणजे सोजी योग्य प्रमाणात भाजली गेलेली हवी. तसेच रगडतांना आणि साखर कालवतांना हात एकदम स्वच्छच हवेत. नाहीतर दराबा नक्कीच काळवंडून जातो. हे सगळं झालं की दराबा तय्यार! मग हवे त्या आकाराचे लाडू वळायचे. लाडू नाही वळले तरी चालतात. सगळा दराबा एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवून द्यायचा. खायचा असेल तेव्हा, हवा तेव्हढा वाटीत घ्यायचा आणि मस्त चमच्याने खायचा. तोंडात टाकताक्षणी मस्त मधुर चव सगळ्या तोंडात पसरते आणि दराबा छान विरघळून जातो...सुख...अगदी स्वर्ग सुख!!!
                                                         दराबा करतांना फक्त एकच दिवस मुरतो, पण हा लेखातील दराबा मात्र बरेच दिवस मुरलाय त्यामुळे फारच सुंदर, मधुर आणि मुलायम झालाय छान! 

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
२२ फेब्रु २०२०


दराबा लाडू 



सोजी भाजतांना 



छान भरपुर तुप सुटे पर्यंत भाजायची 



रगडुन असा छान मऊ करायचा 



मग पिठी साखर मिसळायची 



मग पुन्हा कण आणि कण रगडुन घ्यायचा 



आता हा दराबा तय्यार आहे !!









            




Comments

  1. तोंडाला पाणी सुटले पुण्यातील एक आठवण आहे काकूंकडे दिवाळीत दराबा करायचा कार्यक्रम सुरू होता व मी मदतीला गुरुवार असल्याने काकूचा उपवास व रंगडायला मी साखरेची पूर्ण पिशवी ओतली तरी मी चव घेऊन सांगतो काकू अजिबात गॉड लागत नाहीये आधी काकूंच्या शिव्या खाल्ल्या मग कळले की चुकून पिठी साखरे ऐवजी जवळील मैद्याची पिशवी वापरली आहे मग काय सारेच मुसळ ....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्य आहेस तु 🙏😁😂 , बिचाऱ्या काकूंचे आणि त्या लाडूचे काय झाले असेल 😒🙄, एक तेच जाणे की तो देवच जाणे ........ पण खुप धन्यवाद अशी गमतीशीर आठवण सांगितल्याबद्दल !😍🤩

      Delete
    2. खूप छान

      Delete
  2. एल झेड कोल्हेNovember 06, 2020 1:16 pm

    दराब्याचे लाडू कृती सह माहिती छान ��

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपुर्वक धन्यवाद !🙏😇😇

      Delete
  3. जनार्दन चौधरीNovember 06, 2020 2:44 pm

    माहिती व आपल्या आठवणि चे संकलन ओघवत्या शब्द रचनेने व क्रमा क्रमाने शैलिदार पणे मांडून वाचनीय झालेले असुन माहिती सुलभ रितिने आत्मसाथ करण्या योग्य आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खुप सारे , अगदी आभाळभर प्रेम !!!😇🤩🥰😍

      Delete
  4. ऐवढ सगळं मस्त लिहिले आहे खुप छान.
    सौ.मंदा चौधरी.

    ReplyDelete
    Replies
    1. 🥰खुप खुप्प खुप्प प्रेम !🤩😇🥰😍

      Delete
  5. संजय दीक्षितNovember 06, 2020 3:36 pm

    तोंडाला पाणी सुटले आहे दराबा वाचून����������pl send sample pack Diwali

    ReplyDelete
    Replies
    1. अरेच्च्या , मला वाटले  पाठविणार आहेस , मी वाटच बघत होते , कधी तुझ्याकडून दराबा ते 😂😁😅 मनःपुर्वक धन्यवाद !

      Delete
  6. खुपचं सुंदर आणि मऊ झाला आहे दराबा (लेख). मलाही माॅरिशसची साखर वाचुन आश्र्चर्य वाटले आता दिवाळी चा दराबा करायची वेळ आली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना , दिवाळी अगदी तोंडावर आलीय म्हणून तर खास दराबा ! साखरेची कहाणी खरंच खुपच नवलाची ! सप्रेम धन्यवाद !😍🥰🤩

      Delete
  7. रंजना राणेNovember 06, 2020 8:44 pm

    द रव्याच्या लाडू ला साखर पण सो जिच्या चाळणीने चाळून घ्यायची हे मला खूप आवडले

    ReplyDelete
    Replies
    1. खुप  सारे धन्यवाद !!🙏😇

      Delete
  8. Appratim lekh�� majja aali vachun���� Mipan karatech ladu next week la

    ReplyDelete
    Replies
    1. वाट बघत आले लाडू च्या पार्सल ची , लवकर पाठव , खुप झालीय खायची , खूप सारे धन्यवाद !😅😇🤩

      Delete
  9. स्वाती चौधरीNovember 06, 2020 10:07 pm

    वा मस्त माहिती

    ReplyDelete
  10. दराब्याचे लाडू माला अगदी नवीन आणि unique वाटताहेत. हा आपला गोड लाडोबा-लेख आणि दराब्याची कृती व सामग्रीचा मेळ हे अप्रुपच.
    I am adding it my sweet list and try to make in home.
    Thanks 😊

    ReplyDelete
    Replies
    1. आहेच मुळी ते खुप unique !!! 
      just  loved the  title by you गोड लाडोबा लेख!!!
      try it for sure ! n m sure , u will just love it !!!
      दराब्या सारखे गोड  मुलायम प्रेम !!!🤩😍🥰😇

      Delete
  11. Replies
    1. खूप सारे धन्यवाद !🤩😇😍

      Delete
  12. दराबापुराण अतिशय चविष्ट....

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप सारे धन्यवाद🤩😇😇🤩 !

      Delete
  13. Yes daraba khanke khandech chi shan. Diwali Ali ki saglikde tech . Ole gahu dalun denar kahi . Girniwalyala hamkhas ha prashn . Mazya aaichya ghrasmorch girni. Tyamule as he aikayla yaych. Pn kharch darabyacbi. Chav dusrya kuthlya ladula nahi yet����

    ReplyDelete
    Replies
    1. हो तर , दराब्याला पर्यायच नाही ..... दराबा हवाच , दराबाच हवा आणि दराबाच हवाच !!!🤩😍🥰😇😇💖

      Delete
  14. Daraba varanak vachun v pahun tondala pani sutle mag mi pan udya karnar aahe daraba��
    Khup sunder lihile aahes g sarv mahiti chanch��
    Tu kay kay banvinar aahes faral��

    ReplyDelete
    Replies
    1. माझी चकली भजनी तय्यार आहे , बाकीचे काय माहिती नाही 😂😅😁. मनःपुर्वक धन्यवाद !😍💖

      Delete
  15. Morishshchi sakhar hey ter navinch yeikate
    Darabache varnan vachata vachata kadhi to jibhevar aala ani virghalapan 😋
    Kharach chan lihiles, barik sarikh goshtipan madalas👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. सारे धन्यवाद आणि  प्रेम !!!!😍😇😇🤩

      Delete
  16. Pahilyandach naw aikale
    Kadhi khalle nai
    Tu pn kadhi dile
    Nai

    ReplyDelete
    Replies
    1. अगं , मी इतके सगळे काही करत नाही . शॉर्ट कट मारते . आणि आपण कुठे भेटायला वरचे वर ! दोन ध्रुवावरची माणसं भेटतील एकमेकांना , पण आपले भेटणे अवघड ..... 😁😅😁

      Delete
  17. Must be super healthy and yummy
    Never tasted
    But can imagine

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपुर्वक धन्यवाद !😍🥰🤩😇

      Delete
  18. दराबा पाहून जुन्या आठवणी आल्या खूपच सुंदर लागतो, ट्रिपमध्ये आम्ही खास फर्माईश करायचं
    अगदी पेड्यासारखा माऊ आणि सुंदर चव लागते
    यावर्षी दिवाळीत बघायला मिळाले 👌👌👍🏼

    ReplyDelete
    Replies
    1. दराबा!!! याला पर्यायच नाही या जगात!!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  19. डॉ सुभाष ओरसकरNovember 21, 2021 9:06 pm

    धन्यवाद �� लाडूत तुमच्या हाताचा गोडवा आला आहे. तुमच्याइतकेच गोड आहेत ❤️

    ReplyDelete
  20. दराबा आवडता पदार्थ. गोड गोड लेख. आमच्याकडे दराबा बनत नसे, लाडू बनत, त्यामुळे दराबा हा बिघडलेला लाडू असतो असा माझा समज होता 😃

    ReplyDelete
    Replies
    1. भारीच समज हो! पण अगदीच सार्थ! खुप सारे गोड आनंदी धन्यवाद 🙏

      Delete
  21. सोजी भाजतांनाचा खमंग सुगंध घ्राणेंद्रियाला जाणवतोय आणि जिव्हेने आपला पाझरायचे काम सुरू केलेय. खूप सुंदर जसेच्या तसे हुबेहूब डोळ्यासमोर चित्र उभे . Perfect recepi 😋😋

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫 🤩

      Delete
  22. राधिका टीपरेOctober 18, 2022 2:04 pm

    वर्षाली , खूप सुंदर लेख आहे. माझ्यासाठी सगळेच नवीन होते. Daraba हा शब्दही मी पहिल्यांदच ऐकला. खूप मस्त वाटले. मऊसूत , पांढरे शुभ्र लाडू पाहून आपसूक चव तोंडात विरघळली. अभिनंदन.

    ReplyDelete
    Replies
    1. दराबा पण तोंडात टाकल्या टाकल्या लगेच विरघळतो! सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨

      Delete
  23. खूप छान वर्णन. आमच्या समोर बुलढाण्यातील मलकापूरच्या पाटील काकी रहात होत्या. त्यांच्याकडून हे लाडू येत असत. तेव्हा पहिल्यांदाच खाल्ले होते. तुम्ही वर्णन केल्याने आता करून बघावेसे वाटताहेत. आणि मोरास साखरेच्या आठवणी माझे बाबा पण सांगत असत. पण माझ्या आठवणीत आई जात्यावर पिठीसाखर आणि मोदकाचे पीठ आणि खलबत्त्यामध्ये अनाराश्याचे पीठ तयार करत असे. लाडू मस्तच झालेत !

    ReplyDelete
    Replies
    1. वावा छान आठवणी अणि अनुभव!
      खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 ✨

      Delete
  24. रेवती डींगरेOctober 18, 2022 7:46 pm

    दराबा खूपच आवडला.मेहनतीचे काम आहे.तू अगदी सविस्तर लिहिलेस.चव जिभेवर रेंगाळली
    दिवाळीचा शुभारंभ झाला.असेच विविध पदार्थांचे किस्से वाचायला मस्त वाटते.लिहीत रहा आम्ही वाचत राहू.तुम्हा सर्वाना दिवाळीच्या भरपूर आनंदी शुभेच्छा👌🪴

    ReplyDelete
    Replies
    1. असेच तुमचे आशिर्वाद असू द्या! खूप ऊर्जा मिळते मला त्यातून!
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 😇😍💫✨

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...