Skip to main content

उन्हाळी फळं आणि आम्ही-१ (घरातील गमती जमती)

उन्हाळी फळं आणि आम्ही-१
(घरातील गमती जमती)

                                                उन्हाळी फळांच्या गोष्ट. उन्हाळी फळं म्हणजे टरबूज (water melon), डांगर (musk melon ), आणि मोठ्ठी काकडी. या तीन फळांच्या गमती जमती सांगणार आहे मी. सोबत मुद्दाम इंग्रजी नाव सुद्धा दिली आहेत. कारण ही फळं, महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी संबोधली जातात म्हणून. वाचकांचा गोंधळ होऊ नये म्हणून. कारण मराठी नावात जरी गोंधळ असला तरी इंग्रजी नावं मात्र सगळ्यांना अगदी नीट माहिती आहेत. त्यामुळे मी नक्की कुठल्या फळाच्या गमती जमती सांगतेय ते नीट कळेल. 
                                              आज सगळ्यात आधी मोठ्ठ्या काकडीची गोष्ट. आता तुम्हाला वाटेल काकडीची काय गोष्ट? पण मला खात्री आहे, मी ज्या काकडीची गोष्ट सांगणार आहे, ती काकडी बऱ्याच जणांनी पहिली सुद्धा नसेल. सगळ्यांना सर्रास माहितीच्या काकड्या फारतर दीड ते दोन इंच व्यासाच्या आणि सात आठ इंच लांबीच्या. अलीकडेच गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच ठिकाणी फिक्या हिरव्या रंगाच्या, अगदी बारीक आणि एक ते सव्वा फूट लांबीच्या काकड्या मिळु लागल्या आहेत. पण या सगळ्यापेक्षा खूप वेगळ्या काकडीची गोष्ट सांगणार आहे मी. आता या काकड्या कुठेच मिळत नाहीत. आम्ही लहान असतांना या काकड्या मिळत असत. पण अलीकडेच माझे मामीशी बोलणे चालू असतांना ओघाने काकडीचा विषय निघाला . तेव्हा तिच्याकडून कळले, या ज्या अगदी बारीक आणि लांब, फिक्या हिरव्या रंगाच्या काकड्या असतात याच पूर्ण वाढू दिल्या तर या मोठाल्या काकड्या तयार होतात. पण हल्ली सगळ्यांना त्या बारीक बारीकच काकड्या हव्या असतात . त्यामुळे शेतकरी सुद्धा त्या वेलीवर मोठ्या होऊच देत नाहीत. छोट्या आणि बारीक असतांनाच तोडून घेतात आणि बाजारात विकतात. 
                                         या काकडीचा व्यास साधारण पाच-सहा इंच आणि लांबी दोन-तीन फूट. पूर्ण लांबीत ही काकडी पोकळ असे. या काकडीची एक चकती कापली तर कंकणाकृती किंवा कडं तयार होत असे , एक मोठ्ठी बांगडीच म्हणा ना.  फक्त एक फरक असे काकडीच्या बांगडीत आणि खऱ्या बांगडीत. खऱ्या बांगडीला बाहेरच्या बाजूने नक्षीकाम केलेलं असते आणि सोबत एक, दोन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी आवडीप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे रत्न बसवून सुशोभित केलेल्या असतात. तर या काकडीच्या बांगडीला बाहेरच्या बाजूने छान कंगोऱ्यां कंगोऱ्यांची नक्षी तर असते, पण आतल्या बाजूने सुद्धा  तीन ठिकाणी छान पांढऱ्या बीयारूपी रत्नांचे  गुच्छ-घोसच बसविलेले असतात! हे घोस जर काढून टाकले तर लहान मुलांच्याच नाही तर मोठ्यांच्या सुद्धा, हातात सहजच ही बांगडी जाऊ शकते! आणि हे सगळे चाळे आम्ही करत असु न चुकता आणि मम्मीचे लक्ष गेले तर भरपूर ओरडा सुद्धा, अगदी नियमित खात असू. 
                                           साधारण ही तीनही फळं बाजारातुन आणली की, सगळ्यात आधी कमीत कमीत अर्धा ते पाऊण तास तरी पाण्यात भिजत टाकली जात असतं. ही भली मोठी काकडी बाजारातून आणणे हे एक मोठ्ठे दिव्यच असे . कारण बाजारात गेले आणि ही काकडी घेतली आणि आले घरी असे होत नसे. ही काकडी सुद्धा शनिवारच्या आठवडे बाजारातच छान ताजी मिळत असे. त्यामुळे सगळा आठवडेभराचा बाजार कापडी पिशव्यांमध्ये भरून, त्या सगळ्या पिशव्या हातात धरून, परत ही भली मोठ्ठी काकडी हातात पकडायची आणि हे सगळं ओझं घेऊन, बाजारापासून घरापर्यंत चालत यायचे. शिवाय डोक्यावर सूर्यदेव आग ओकत असे, हे सांगायलाच नको. 
                                           गॅलरीतून मम्मीलोक येतांना दिसल्या की, आम्ही भिन्नाट पळत जाऊन जीन्याचा दरवाजा गाठत असु. ते दार उघडुन त्यांची वर यायची वाट बघत असु . त्या वर आल्या की आम्हाला झेपेल ते त्यांच्या हाताततुन घेत असु. त्यापैकी एक म्हणजे ही मोठ्ठी काकडी. ही काकडी एकदम ताजी, एकदम कुरकुरीत/करकरीत. खाली पडली के शंभर टक्के फुटणार! अशी पडुन फुटलेली अनुभवलेली आणि पाहिलेली आहे आम्ही. त्यामुळे ती खाली पडणार नाही याची काळजी घेऊन, नीट पणे न्यावी लागे. ही आणली की आधी पाण्यात टाकावी लागे आणि मम्मी प्रत्येक वेळी न चुकता सांगत असे, आधी पाण्यात टाका ग ती काकडी. मग आम्ही सुद्धा, न्हाणी घरात जाऊन एका मोठ्ठ्या बादलीत पाणी सोडून, त्यात ती काकडी टाकत असु आणि तिथेच रेंगाळत असु, पाण्याशी आणि काकडीशी खेळत. अधुन मधुन विचारात असू मम्मीला, किती वेळ झाला?, काकडी खायची घाई असल्याने.  मग मम्मी म्हणे थांबा अजून थोडावेळ, आत्ता तर टाकली ना काकडी पाण्यात? असे साधारण दोन-तीन वेळा तरी होत असे. 
                                         मग साधारण तासभर झाला की मम्मी सांगे, आणा ग, ती काकडी घरात. तोपर्यंत तिचा सगळा बाजार निवडुन, जागच्या जागी ठेवून झालेला असे. आता ही काकडी लांबच्या लांब. तिचा व्यास बरोब्बर मधोमध मोठ्ठा असे आणि दोन्ही टोकांकडे निमुळता होत जाणारा असे. मग जास्तीत जास्त काकडी मिळावी आणि मोठ्ठी बांगडी मिळावी म्हणून आम्ही मम्मीला बरोब्बर मध्यभागी काकडी कापायला लावत असु . आम्हाला प्रत्येकी दोन दोन बांगड्या मिळत, सुरुवातीला. मग आमचे त्या काकडीच्या बांगडीसोबत खेळणे आणि खाणे, दोघंही चालू असे, बराच वेळ. आधी त्यातील बिया खाऊन टाकायच्या. या बियांची चव सुद्धा एकदम छान असे, आम्ही अगदी आवडीने खात असु. कुणाला नको असतील, तर आम्ही मागून घेऊन खात असू. पण कधी कधी या बिया थोड्या कडवट लागत चवीला, पण खाणे शक्य असे तरीही. पण कधी कधी प्रचंड कडू निघत अशावेळी त्या फेकून देण्याशिवाय काही पर्यायच नसे. अगदी फारच क्वचित ही काकडी अगदी थोडी  कडू असे, पण खाण्याच्या योग्य! आजकाल छोट्या छोट्या काकड्या सुद्धा एकदम कडू निघतात की फेकून देण्याशिवाय पर्यायच राहत नाही. 
                                       या बिया खाऊन टाकल्या की, ती बांगडी अगदी सहजच हातात घालता येत अस. मग या हातातून त्या हातात घालून बघायची, एकमेकींना दाखवायची, बघ माझी बांगडी किती मोठ्ठी आहे, असे सांगायचे. असे एक ना अनेक चाळे चाललेले असत आमचे. अर्थातच मम्मीचे लक्ष जात असे आमच्याकडे, मग काकडी खाण्या आधी, तिचा ओरडा खावा लागे. 
                                 मग बऱ्याच वेळाने खायला सुरुवात करत असू. त्या खाण्याच्या सुद्धा कित्ती तऱ्हा! एक म्हणजे सरळ दोन अर्धगोल करायचे आणि एक एक खायचा. दुसरी पद्धत म्हणजे सगळ्या बाजूने त्या काकडीच्या बांगडीची जाडी कमी करत करत सगळ्या बाजूने खायची. तिसरी तऱ्हा म्हणजे एका ठिकाणी तोडून पहिला घास खायचा आणि मग पूढे तशीच गोलगोल खात जायचे, दुसऱ्या टोका पर्यंत. आधी वाटे अजून हवी काकडी, पण या दोन चकत्याच इतक्या मोठ्ठ्या असतं की त्या खाऊनच पोट तुडुंब भरल्यासारखे वाटे. परत संध्याकाळी सगळ्यांची खाऊन झाल्यावर शिल्लक राहिली, तर अजुन थोडी काकडी मिळे. पण या चकत्या साधारण शेवटच्या टोकाजवळच्या असतं, जिथे या काकडीच्या मधली पोकळी जवळ जवळ नसेच. शिवाय बिया खाऊन टाकल्यावर सुद्धा हातात घालण्या इतकी मोठी बांगडी तयार होत नसे. परत उशिराची संध्याकाळ, म्हणजे सगळे आवरून पटापट झोपायची घाई. कारण कुठल्याही सुट्टीच्या दिवशी आम्हाला उशिरा उठण्याची मुभा नव्हती, अगदी आजोळी गेलो तरी. सकाळी सहा म्हणजे सहा वाजता उठावेच लागे! मग ती काकडी तशीच पटापट खाऊन टाकायची आणि जेवण करून झोपी जायचे, कुठलीही टंगळ मंगळ आणि चाळे न करता. 

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
८ जुन २०२०


हल्ली बाजारात मिळणाऱ्या  काकड्या 


हल्ली बाजारात मिळणाऱ्या  काकड्या 


हल्ली बाजारात मिळणाऱ्या  काकड्या 


खिरे 


हल्ली बाजारात मिळणाऱ्या  काकड्या 


चिबुड किंवा वायकु काकडी 
सगळ्यात गोड काकडी 








ह्याच त्या बारीक बारीक फिक्या 
हिरव्या रंगाच्या काकड्या 
हल्ली बाजारात मिळतात 



थोड्या मोठ्या झालेल्या काकड्या 



हीच काकडी अजून मोठ्ठी होऊ 
दिली तर , बरोब्बर मधोमध 
एक मोठ्ठी पोकळी तयार होते 




या काकडीच्या चकत्या . 
अशाच असत आमच्या त्या मोठ्ठ्या काकडीच्या 
चकत्या/ बांगड्या 
बाहेरून कंगोरे कंगोरे आणि मात्र 
मधोमध मोठ्ठी पोकळी !














Comments

  1. Nanda wagle unhali phalichi gammat punha lahanpani aathwanit geli bajaratun aajjine kakdi aanli ki kakdi khayla chadha oodh ektra kutumbat mule bharpur sunder lekh

    ReplyDelete
    Replies
    1. खरच एकत्र कुटुंबात काहीही खाण्याची धमाल काही वेगळीच असते! क्षणात फडशा पडतो प्रत्येक गोष्टीचा!!
      सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
  2. Nanda pics sunder gharatil sadhe lahan sahan gammti sopiya bhashet vrushali lihites ki janu tu samor basun ekhadi gost sangtes all the best

    ReplyDelete
    Replies
    1. काकू, खूप खूप धन्यवाद अणि खूप सारे प्रेम, ईतक्या सगळ्या कौतुकाबद्दल! अणि तुमच्या आठवणी सांगितल्या बद्दल ! 😊😍😇🙏

      Delete
  3. आम्ही ही अशीच मज्जा करायचो.हि काकडी आता मिळतच नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. अरे खरच की काय? सारखीच मजा केली की आपण! मस्तच! ❤

      Delete
  4. Wa chan varnan
    Tya kakadicha chakatana bangadichi upama wa tey biyarupi motiche ghuccha wa sunderch ����

    ReplyDelete
    Replies
    1. 😍😇मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊

      Delete
  5. स्वाती प्रभुणेJune 19, 2020 3:49 pm

    वा मस्तच तुझा आजचा लेख अगदी सस्पेन्स सिनेमा सारखा झाला मला वाटले आता इतर फळांचे वर्णन येईल पण नाही आमच्या कडे वाई ला अजूनही मोठ्या काकड्या मिळतात पण बांगडी व पाण्यात टाकून ठेवतात ही नवीनच माहिती मिळाली आता मी नक्कीच बांगडी घालेन आमच्या भागांत दसऱ्याला ही काकडी पुरुष मंडळी सीमोल्लंघन करून आले की पाठीवर फोडत असत (नागपूर कडे)कलीगड व डांगर ला टरबूज खरबूज चिबुड अशी नावे आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. 😁😁😀 खर तर तीनही फळ एकत्र लिहिण्याचा विचार होता, पण खूपच मोठा झाला लेख, मग ठरवले अणि तीन भाग केले!
      वाई ला जायला पाहिजे तुमच्या सोबत एकदा, काकडी खायला!
      पाठीवर काकडी फोडणे नवीनच कळले मला!
      खुप सारे धन्यवाद 😍 😇 🙏

      Delete
  6. Sanjita ShrikantJune 19, 2020 3:51 pm

    Kovali Kakadi and types liked very much

    ReplyDelete
  7. Prajkta DongareJune 19, 2020 3:53 pm

    Mast as usual���� waiting for part2��

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏, लगेचच या आठव्यात
      येतोय भाग 2 तुमच्या भेटीला !!

      Delete
  8. Kishori matekarJune 19, 2020 3:55 pm

    Pn mala kashi ti kakdi nai awdli
    Baki sgl bharpur khall
    Playing cards n carrom ratri 1,2 paryant khelalot

    ReplyDelete
    Replies
    1. व्यक्ति तितक्या प्रकृती! 😜😁😀

      Delete
  9. शुभा पाटीलJune 19, 2020 4:37 pm

    अगदी असेच आम्ही पण आमच्या घरी धाब्यावर जावून रात्रीच्या जेवणनंतर टरबुज ,डांगर.खात असो आधी मोठ्या बादलीत घरी आणले की थंड करायला ठेवायचे.

    ReplyDelete
    Replies
    1. वावा मस्तच!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 तुझ्या आठवणी सांगितल्या बद्दल

      Delete
  10. सौ
    सावळे वा छान काकडी म्हनजेथंड फळ बरेच आठउन लिहीला लेख मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना, पण एक विशय ठरला की सगळे आठवते आपोआपच
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  11. सीमंतिनीJune 19, 2020 5:51 pm

    वा.. काकडीसारखा लुसलुशीत लेख.. आमच्या पंढरपुरात चैत्रागौरीच्या हळदीकुंकाला कैरीच्या डाळी सोबत काकडीच्या चकत्या देत. पण इतक्या मोठ्या नसत त्या.
    काकडी मी मोठेपणीच जास्त आवडीने खाल्ली..

    ReplyDelete
    Replies
    1. व्वा फारच आनंद झाला तुला ईथे भेटून!
      खुप सारे प्रेम!!! 😊😁😇😍❤️

      Delete
  12. मस्त वर्णन केले आहे खुप छान एवढ सगळ छान आठवून लिहिले आहे मोठ्या काकडीची सर छोट्या काकड्यानानाही मला अजून त्या काकडीची चव आठवते

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय बाकी कुठल्याही काकडीला, त्या मोठ्या काकडीची सर नाही! 😊😇❤️

      Delete
  13. Rasadar kakadicha gar gar vatanara lekh aahe tuza khanyachya tarha pan mast
    khup chan

    ReplyDelete
    Replies
    1. 😀😁😊पोर वय अणि त्यातील पोरकट खेळ, दुसरे काय!! 😉

      Delete
  14. तेव्हा या काकड्या नदीपात्रातील वाळूमध्ये होत
    असाच एक प्रकार म्हणजे शेतातील काकड्या मोठ्या झाल्या की पिकतात व गोड लागतात फूट म्हणतात त्याला आठवते का ? भरभरून बालपण जगल्याच्या खुणा तुझ्या लेखातून दिसतात रम्य ते बालपण मी सुटीत (व एरवी सुद्धा) चिकार पुस्तकं वाचायचो तुझ्या वाचनावर पण लिही कधीतरी

    ReplyDelete
    Replies
    1. अर्थातच, फक्त माहिती नाही, तर या जगातील माझे सगळ्यात आवडते फळ आहे फूट! पण खूप वर्ष झाले खायला मिळाले नाही
      एकदम खरंय आनंदी अणि स्वच्छंद बालपण!
      अरे हो वाचायला मिळेल ते सुद्धा. थोडा धीर धर
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  15. Wow we do not get so many varieties of cucumber nowadays....this article reminded me of ny childhood days

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
  16. उषा पाटीलMarch 15, 2024 9:31 am

    वा रे वा काकडीच वर्णन खूप छान'बांगडी तर खूप आवडली वर्णन वाचून मनीषा वर्षा राणी दीपा पळत जाऊन आईच्या हातातील फळ घ्यायला पळणाऱ्या आठवल्या खूप सुंदर वर्णन चालू ठेव

    ReplyDelete
  17. यशवंत ढाकेMarch 15, 2024 9:31 am

    Really excellent & very informative
    👌👌👌👍👍🌹

    ReplyDelete
  18. नि रा पाटीलMarch 15, 2024 10:20 am

    आनंदी ताई,बालपणाच्या आठवणी जागविल्या.तू ज्या लांब काकडीचं वर्णन केलं आहे ती उन्हाळ्यात थळ्यांमध्ये येणाऱ्या काकडीचं आहे.आता या काकड्या क्वचितच बाजारात येतात आणि आल्याच तर ताबडतोब संपतात.नदीच्या वाळवंटात जाने-फेब्रु.मध्ये भोई(कोळी) जमातीचे लोक डांगर(दोन प्रकारच्या-गुयभेली,पोटभरू),टरबूज आणि या काकड्या पेरत असत.हंगाम साधारणतः होळी नंतर दीड-दोन महिने चालत असे.या तळ्यात गिरण्या,वाघूर,मोर आणि सुकी नद्यांच्या पात्रांच्या वाळवंटात घेत.मेमध्ये थळ्या उलगत असत.शेतकऱ्यांजवळ पैसे नसले तर धान्यावर(ज्वारीवर) विनिमय पद्धतीने घेत असत .असो,पण तुझी कथा छान आणि मनाला भावणारी आहे.काकडी खाल्ल्यानंतर आनंदी पाऊस पडल्यासारखी!👌🏼🙏🌷🌹💐

    ReplyDelete
  19. जुने दिवस आठवलेत ..आता नाही तशी मज्जा ...
    सुंदर शब्द चित्रण ...

    ReplyDelete
  20. नि रा पाटीलMarch 15, 2024 3:33 pm

    थळ्यांमध्ये भोई लोक वांग्यांचीही लागवड करीत.ही वांगी लगनसराईत गावपंक्तीभोजनातील भाजीसाठी वापरत.वरन-पोई अन वांग्याची भाजी ! या वांग्यांची भाजी खूप चवदार असे.

    ReplyDelete
  21. प्रभात चौधरीMarch 17, 2024 4:46 pm

    काकडी,टरबुज व डांगर खाण्याच्या आठवणी सर्वांच्याच आहेत कारण उन्हाळ्यात घराघरात ते पदार्थ असतात.आम्ही पालला राहत असताना तिथल्या नदी पात्रात टरबूज,काकडी, भाजीपाला यांची लागवड करीत.एकतर संध्याकाळी तिथे जाऊन खायचे नाही तर घरी आणून पाण्यात टाकून रात्री खायचे.आता ती मजा गेली,तसे दिवस पुन्हा नाही यायचे.नगावर मिळणार्या ह्या वस्तू आता किलोने मिळतात.
    काकडीचे नवीन वाण आलेले आहे बारीक बारीक असतात ह्या काकड्या पण मला खुप आवडतात.गावामध्ये त्यावेळी आपुलकी,आदर असे आता तसे दिसत नाही.असो.काळ आपल्या सोबत काहीतरी घेऊन येतो व जुन्यावर नव्याचे आक्रमण होते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...