उपवासाची वाळवणं-१ (घरातील गमती जमती) आजची गोष्ट आहे बटाट्याच्या वेफर्स आणि किसाची दोघांची करण्याची पद्धत साधारण सारखीच असते. फक्त वेफर्स करायचे म्हणजे बटाटयाच्या गोल चकत्या करायच्या आणि किस करायचा म्हणजे किसणीच्या जाड जाड भोकातून बटाटा किसायचा. नेहमीप्रमाणे सगळी फळं आणि भाजीपाला जसा शनिवारच्या आठवडे बाजारातून खरेदी केला जात असे, तसेच हे बटाटे सुद्धा शनिवारच्या आठवडे बाजारातूनच खरेदी केले जात. तेव्हा आमच्याकडे साधारण दहा किलो बटाटे आणले जात खास वेफर्स करण्यासाठी. बटाटे लगेच खराब होत नाही किंवा पिकून जात नाही, त्यामुळे त्याचे वेफर्स अगदी त्याच दिवशी केले नाही तरी चालतात. पण हे काम सकाळी किंवा दुपारी सुरु करता येत नसत, कारण ते करण्याची आमच्याकडची पद्धत. तर हे वेफर्स करण्याची सुरुवात साधारण संध्याकाळी केली जात असे आमच्याकडे. आता बटाट्याचे वेफर्स करायचे असो किंवा बटाट्याचा किस, किस...