Skip to main content

खास कामं आणि व्यक्ती (घरातील गमती जमती)




खास कामं आणि व्यक्ती 
(घरातील गमती जमती)


      आमच्या बाबांनी साधारण एकोणीसशे बावन्न मध्ये खादीचे दुकान सुरु केले , "सर्वोदय खादी भांडार" . ते स्वतः कायम खादीच वापरत , डोक्यावर पांढरी गांधी टोपी , लांब पांढरा सदरा आणि पांढरे धोतर . यात कधीच , कुठल्याच कारणाने बदल झाला नाही . अगदी घरातील लग्नकार्य असले तरीही ते हेच कपडे घालणार आणि पायात काळी जुती . 
                         सकाळी साधारण आठ-साडेआठ पर्यंत जेवण वगैरे आटोपून दुकानात जात . दुकानात पांढरे , रंगीत खादीचे कापड , मोठे रुमाल (पंचा) , छाटी(डोक्याला बांधण्याचे रुमाल , हे हात रुमालापेक्षा मोठे असतात) आणि रुमाल वगैरे विकले जात असे . पण यासोबत गांधी टोप्या आणि बंडी (खादीचे शिवलेले बनियन) सुद्धा विकायला असत . या गांधी टोप्या आणि बंड्या दुकानातच शिवल्या जात असत . हे सगळे शिवत असत आमचे 'हरी मामा' . हरी मामा म्हणजे आमच्या आईचे(आजीचे) बंधू . हरी मामा सुद्धा एकदम उंच बाबांसारखे , पण शरीरयष्टी मात्र एकदम शिडशिडीत . यांचा पेहराव सुद्धा अगदी बाबांसारखा , गांधी टोपी , लांब खादीचा सदरा , डोक्यावर गांधी टोपी(सगळे पांढऱ्या रंगाचे) आणि पायात  मात्र हे चप्पल घालत तेव्हढाच काय तो फरक . हे दुकानात बाबांबरोबर दिवसभर असत , त्यांच्या मदतीला . दुकानातील साफसफाई पासून सगळी काम हे करत आणि हो , दुकानात खोजा होता , पिण्याच्या पाण्यासाठी , तो सुद्धा तेच भरून ठेवत . मग आम्ही जर का दुकानात गेलो तर कधीच या खोजातील पाणी पिण्याची संधी सोडत नसू आणि एकमेकींना चिडवण्याची सुद्धा , "शी ! सिंहाने उलटी केली आणि तीच पितेय ." पण पंधरा दिवसातून एकदा दीड-दोन तासासाठी घरी येत हरी मामा , एका खास कामासाठी . आजच्या लेखात या खास कामाची गोष्ट . 
                          माझ्या आठवणी प्रमाणे ते साधारणपणे दुपारून येत असत . जेव्हा दुकानात जरा शांततेची वेळ असे . यांच्या या खास कामासाठी सुद्धा त्यांना घरी आले की बरीच पूर्व तयारी करावी लागे . आता तुम्हाला वाटेल एव्हढे कसले काम आणि त्याची काय ही पूर्व तयारी ? तर हे काम म्हणजे बाबांच्या कपड्यांना इस्त्री करणे . कपडे म्हणजे सदरा आणि टोपी . धोतर मात्र ते इस्त्रीशिवायचं घालत . पण ते धोतर सुद्धा त्यांना एकदम पांढरे शुभ्र आणि एकही सुरकुती नसलेले लागे . यासाठी त्यांचे धोतर धुवून झाले की त्याला नीळ केली जात असे रोजच्या रोज . मग घट्ट पिळून , छानपैकी जोर-जोरात झटकून , त्यावरील सगळ्या सुरकुत्या घालवून मगच वाळत घातले जात असे . सदरे आणि टोप्या , साधारण पंधरा दिवसांनी सगळ्या एकदम धुतल्या जात आणि त्यांना सुद्धा नीळ केली जात असे . 
                            आता तुम्हाला वाटेल साधी इस्त्री तर करायचीय, त्यासाठी कसली आणि काय पूर्व तयारी ? तर तेव्हा आमच्याकडे विजेवर चालणारी इस्त्री नव्हती . कोळश्यावर चालणारी , भोंग्याची इस्त्री होती . मग ही सुद्धा लोखंडी शेगडी सारखी पेटवायला ठेवावी लागे आधी . ती हवी तशी पेटेपर्यंत , ते घरातली तयारी करत . आमच्याकडे दोन झोरे होते , झोऱ्या म्हणजे सतरंजीच पण बऱ्यापैकी मऊ . तर आधी जमिनीवर एक कडक सतरंजी , मग त्यावर हा एक झोऱ्या आणि त्यावर एक चादर असे सगळे एकावर एक टाकून अंथरवून घेत . सगळं आणि सगळ्या बाजूंनी चांगले ताणून घेतले जाई , जेणे करून त्यावर एकही सुरकुती राहणार नाही . एका भांड्यात पाणी . आणि दुसऱ्या एका चादरीवर धुतलेले सदरे आणि टोप्या . त्यांच्या बसायच्या जागेच्या उजव्या बाजूला एक लोखंडी मांडोळी ठेवत , इस्त्री वापरात नसेल , तेव्हा त्यावर ठेवण्यासाठी ह्या मांडोळीचा उपयोग होत असे . मांडोळी म्हणजे जाड लोखंडाच्या पट्टीचे कडे . अशी सगळी मांडामांड झाली की मग तिकडे इस्त्री हवी तशी पेटली की नाही ते बघत . 
                             मग ती पेटलेली इस्त्री घरात आणून , त्या मांडोळीवर ठेवत . तिच्या बाजूला बसून मग त्यांचे काम चालू होत असे . आधी एक-एक करून प्रत्येक सदरा आणि टोपी वर पाणी मारून घेत . एकदा का सगळ्या कपड्यांवर पाणी मारून झाले की खऱ्या इस्त्रीच्या कामाला सुरुवात होत असे . आधी टोप्यांना इस्त्री करत की सदाऱ्यांना ते नीट आठवत नाही . पण टोप्या म्हणजे एकदम छोट्या-छोट्या , त्यामुळे टोप्यांना इस्त्री भराभर होत असे . मात्र त्या प्रत्येक टोपीच्या घड्या एकदम बरोब्बर व्हायला हव्यात , तरच इस्त्री नीट झाली म्हणायची . 
                               सदऱ्यांचे काम मात्र जरा किचकट . सदरे म्हणजे चांगलेच लांब , म्हणजे जवळजवळ गुडघ्याच्या अगदी थोडे वरपर्यंत आणि बाह्या सुद्धा पूर्ण हातभार लांब अगदी मनगटापर्यंत . सदऱ्याला समोर वरच्या बाजूला ५-६ बटन , आणि त्याखाली मात्र ती बटन पट्टी तशीच खालपर्यंत दुमडलेली असे . तर सदऱ्याला इस्त्री करतांना ही पट्टी अगदी बरोब्बर तशीच्या तशीच खालपर्यंत सरळ रेषेत व्हायला हवी . पण मामांना वर्षानुवर्षांची सवय , त्यामुळे त्यांच्याकडून इस्त्री अगदी बरोब्बरच होणार ! पण खरंच हे काम वाटते तितके सोप्पे नव्हते . आताच्या विजेरी इस्त्र्या वजनाला एकदम हलक्या , ही तर लोखंडाची आणि भलीमोठी , त्यामुळे खूपच जड . पुन्हा त्यात पेटते निखारे . ही इतकी जड इस्त्री उचलून , इस्त्री करायची म्हणजे फार मेहनतीचे काम . आपल्याच्यानं इस्त्री उचलणेच होणार नाही , पुढची बातच सोडा . 
                              अर्थातच आम्हाला या सगळ्या जवळ जायची मुभा नसे . एक तर ती धगधगत पेटलेली इस्त्री आणि दुसरे म्हणजे पांढरे स्वच्छ धुतलेले आणि इस्त्री चालू असलेले किंवा काही पूर्ण झालेले कपडे . गरम इस्त्रीचा चटका लागण्याची शक्यता , पांढऱ्या कपड्यांना आमचे हात लागून त्याला डाग लागण्याची शक्यता आणि इस्त्री झालेले कपडे  विसकटण्याची शक्यता . पण एकदा का पेटलेली इस्त्री घरात आली आणि कपड्यांना इस्त्री करायला सुरवात झाली की एक आवाज येत असे चर्रर्रर्रर्र ........ पाणी मारलेल्या कपड्यांवर , गरम गरम इस्त्री ठेवल्यावर . अजुनी ऐकू येतो मला तो आवाज ! आणि दुसरे म्हणजे त्याचा वास , अहाहा ! मला अजुनी आवडतो , कपड्याना इस्त्री करतांनाचा वास ! इकडे कर्नाटकात अजूनही तशाच कोळशाच्या इस्त्र्या वापरल्या जातात . जागोजागी हे लोक लोटगाडीवर त्यांचे इस्त्रीचे दुकान थाटून उभे असतात . येता-जाता तो छान वास येत असतो आणो मला परत काही क्षण ते भूतकाळातील सुगंधी क्षण जगायला मिळतात !
                               असे करत करत सगळ्या टोप्या आणि सदाऱ्यांना इस्त्री झाली की मग ते सगळे कपडे त्यांच्या कपाटात नीट ठेवायचे . इस्त्री परत बाहेर नेवून त्यातील अजुनी धगधगणाऱ्या निखाऱ्यांवर पाणी शिंपडून ते विझवायचे , इस्त्री स्वच्छ करून ठेवायची . घरात इस्त्री साठी अंथरलेले सगळे उचलून घड्या करून जागच्या जागी ठेवायचे , की मग त्यांचे काम पूर्ण होत असे . मग थोडावेळ बसून सगळ्यांशी गप्पा गोष्टी करत चहा-खाणे करून ते दुकानात परतत असत . 
                                


©आनंदी पाऊस 
घरातील गमती जमती 
१८ जाने २०२०


कोळश्यावर चालणारी इस्त्री 


कोळश्यावर चालणारी इस्त्री 


गांधी टोपी 


आमचे हरी मामा 


Comments

  1. एखाद्या अगदी कॉमन आणि ओळखीच्या विषयावर एक detailed लेख लिहिण्याची तुझी expertise दिवसेंदिवस भक्कम होत चालली आहे. तुझे बाबा, म्हणजे आजोबा आणि हरीमामा याच्या खादीच्या आग्रहाबद्दल अणि त्या मागच्या गांधीवादी principles बद्द्ल आदरयुक्त प्रणाम. त्यांची मोजक्या कपड्यांबद्दलची शिस्त खरच छान होती. इस्त्री करायची त्या काळातली मेहेनत खरच अफाट होती. मी मागे म्हणल्याप्रमाणे तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी अफाटच होत्या. हल्ली आता इस्त्री करणं किती सोप्पं झाल आहे ते पटतं. लहानपणी सोडून दे पण मोठी झाल्यावर कधी ती इस्त्री तू ट्राय केली होतीस का? विशेष म्हणजे तुला असे हुकुमी photoes कसे मिळतात? इस्त्री तर ekdum antique वाटते आहे.
    Keep on writing such moments... 👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. बाबा, दादा, हरी मामाच नाही तर मी सुद्धा अगदी 12 वर्गात असे पर्यंत 100% खादीच वापरली आता माझ्याबद्दल पण आदर वगैरे का?? 🤔!! 😜😝
      हो खरच इस्त्री करणे फार मेहनतीचे.....
      अणि मी ती इस्त्री वापरून इस्त्री करणेच काय पण ती रिकामी इस्त्री उचलून सुद्धा कधी पाहिली नव्हती... 😁
      अणि उचलली असती तर माहिती नाही काय झाले असते 😂😜
      मनःपूर्वक खूप सारे धन्यवाद 🙏

      Delete
  2. Nanda wagle

    Bhutkalatil aathwanicha paus kharech aanandi paus aahe
    Sarech lekh chan zalet mi te wachat aasta asech anubhaw aathwnit ramte
    Manala ek weglach anand milto
    Haldikunku cha diwas mala uthsav wate aadhipadun tayari wan kayi denar yachi gammat sughdanchi puja sagle aathwte
    Pitli dabe aata itihas jama zale pan aaple kalat rakh cinch mithane ghasne unhat walat ghatle soniyasarkhe chamkat
    Dhotar topi sadra kaddak istry maze aajoba aathwale
    Sagle lekh dunder animals pic mast
    Aasech likhan pudhe chalu rahu de god bless you

    ReplyDelete
    Replies
    1. काकू I missed you a lot as I couldn't read ur reply on last two articles....😊
      आता एकदम छान वाटले तुमचे सगळ्या लेखा वरील अभिप्राय ईथेच वाचून.
      माझीच ईथे परत उजळणी झाली मागच्या दोन तीन लेखांची!!!😇
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 अणि खूप सारे प्रेम!!! 😍

      Delete
  3. खोज्याच्या तोटीच्या तोंडावर सिंह होता का?

    ReplyDelete
    Replies
    1. ही गम्मत समजण्यासाठी तुम्हाला ईतर गमती जमती 1 (गच्चीवरील गमती जमती) वाचायला हव आहे, ते राहिले आहे का वाचायचे?

      Delete
    2. मला वयामुळे जरा कमी आठवतं. तू expail केलं असतं तर जरा बरं पडलं असतं. धन्यवाद

      Delete
    3. त्या लेखात छान सविस्तर माहिती दिली आहे, ते सगळे आता परत ईथे टाइप करणे अवघड, त्यापेक्षा तुम्ही वाचा हे सांगणे मला सोप्पे 😝😜

      Delete
  4. Wa chhànach lihile aahes. Bhutkal jagavtes tu aamhalapan.

    ReplyDelete
    Replies
    1. खरच या उपक्रमाच्या माध्यमातून आपण सगळेच तो सुंदर अणि एकमेवाद्वितीय भूतकाळ परत जगत आहोत!!!
      We all are really blessed soul in a way!!! 😇😍

      Delete
  5. va.. khup bhari .. sagale agadi dolyansamor yetey. photo khup mast. babancha photo ka nahi?

    ReplyDelete
    Replies
    1. हा हरी मामांचा लेख मग त्यांचाच फोटो, बाबांचा प्रत्येक लेखात काही ना काही संबंध येतोच आहे, पण त्यांचा सुद्धा फोटो येईलच पण तशाच काही खास निमित्ताने!!
      M egarly waiting for that moment....
      सप्रेम धन्यवाद 😍😇

      Delete
  6. मंजुषा चौधरीApril 17, 2020 8:50 pm

    Tuze sagle lekh hubehub chitr dolyasamor ubhe kartat mastch lihites ������������

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे मनःपूर्वक धन्यवाद 🙏 मंजुषा!!! 😊😍

      Delete
  7. निलिमा झोपेApril 18, 2020 8:58 am

    Eistri var yevdhe chan likhan kele aahe sarv varan pan mast kele aahes v photos pan chan ��������
    Dolya samor kharokarch ti kolase petale estriche kam suru aahe ase vatate good��

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा😇😍🤩 , यातून खूप खूप सकारात्मक ऊर्जा मिळते मला आणि त्यामुळेच हे सगळे लिखाण होतेय माझ्याकडून ! 🙏

      Delete
  8. स्वाती प्रभुणेApril 18, 2020 10:42 am

    झोरी व माडोळी असे नवीन शब्द कळले शब्द संग्रह वाढला मला पण आठवले नागपूर ला अशीच कोळशाची इस्त्री होती व तू वर्णन केले आहे तसे ठेले वाले यायचे पण माझे माहेरी खूप लोक होती म्हणून मग तो ठेले वाला आमच्या कडेच राहत असे आज काल च्या मुलांना हे सर्व काही माहीत पण नाही व कळणार पण नाही तू गेलीस की या सर्व गोष्टी चा एका खोलीत संग्रह कर व निदान जळगांव च्या मुलांना तरी दाखव असे वाटते त्यांना नुसते फोटो पाहून मागच्या पिढीने खरेच किती कष्ट काढले आहेत ह्याची कल्पना येईल असे वाटते अजकाल वीजेवरची इस्त्री असली तरी 8 रुपये देऊन बरेचदा बाहेरूनच इस्त्री करून आणली जाते झटपट चा काळ आहे ना करोना यायला नको होता पण एका अर्थाने त्याने त्याचे रूद्र रूप दाखवले व आताच्या पिढीला पूर्वीचा काळ दाखवला तुम्ही सर्व कसे आहात मस्त ना.
    आज काल नीळ पण खूप छान येते liquid मध्ये तेव्हा नीळ व स्टार्च करणे पण किती कठीण होते
    तू भूतकाळात छान नेऊन आणतेस

    ReplyDelete
    Replies
    1. हो , झोऱ्या आणि मांडोळी हे खास आमचे शब्द ! 🤩😇
       खरं सांगायचं तर यातील बऱ्याच गोष्टी नाहीत आता माझ्याकडे . खार तर मला या सगळ्या गोष्टींचा संग्रह करायची फार आवड . पण जागे अभावी नाही करता आली , आणि आपल्या छंदासाठी दुसऱ्याला त्रास देण्यात अर्थ नाही .  म्हटले तरी हे सगळे सांभाळणे आणि त्यांची निगा राखणे सोप्पे काम नाही . आणि पुढच्या पिढीला हे सगळे बघण्यात किती उत्साह आहे यात शंकाच आहे . त्यामुळेच मला हा मार्ग निवडावा लागला आणि तो खूप आवडतो सुद्धा आहे . खूप मजा येतेय मला हे सगळे करण्यात !🙏☺

      Delete
  9. खादी, इस्त्री, झोऱ्या, मांडोळी, ईत्यादि एत्तदेशिय वस्तू आणि त्यांची नावे ह्यांचे उत्कृष्ठ वर्णन. प्रत्येक क्रिया त्यातील बारकाव्यांनिशी अगदी सोप्या पण प्रभावी आणि तरीही प्रवाही भाषेत मांडली आहे. वस्तुचित्र, कियाचित्र आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे व्यक्तिचित्र रेखाटण्याची हातोटी विरळा.... कुठल्याही गोष्टीचे इतके हुबेहूब वर्णन की ते संपूर्ण चित्र मनाचक्षूनसमोर उभे रहाते. उत्कृष्ठ शब्दांकन... पुनश्च खूप खूप अभिनंदन...

    ReplyDelete
    Replies
    1. खरतर वाचण्याजोगे लिखाण तेव्हाच होते जेव्हा लिहणाऱ्याचे वाचन भरपूर असते . आणि खरंच मी बऱ्यापैकी वाचन करत असते , आता मला पटायला लागले आहे हे सगळे . आणि आपण ज्या गोष्टी हाताळल्या आहेत . कुणीकुणी वापरतांना पहिल्या आहेत त्याचे त्याचे तरी आपल्याला वर्णन करून समोरच्याच्या डोळ्यासमोर ते सगळे उभे करता यायला पाहिजे , त्यात फार काही मी करते आहे असे मला वाटत नाही . असो . खूप खूप धन्यवाद !🙏🤩😇

      Delete
  10. जनार्दन चौधरीApril 18, 2020 6:55 pm

    या वेळचा लेखाच विषय अशा प्रकारें होऊ शकतो याचेच नवल वाटते या लेखांन साठि तु घेत असलेलि मेहनत वाखाणण्याजोगी च आहे तसेच तुझ्या आठवणिच्या कप्प्यात काय आणि किति दडवून ठेवले आहे याचा थांग पत्ताच लागत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. ही सगळी आपली ठेव आहे वारसा आहे 😇🤩. आणि तो निदान या मार्गाने तरी जपता येत्तोय याचा मला खूप आनंद आहे , खूप समाधान मिळतंय , अशा प्रकारे व्यक्त झाल्याने . त्यामुळे शक्य तितक्या सगळ्याच गोष्टी इथे मांडणार आहे . बघू काय काय आणि किती शक्य होतेय ते ! तुम्हा सगळ्यांचे असेच प्रेम मिळत राहिले तर नक्कीच सगळे शक्य होईल याची मला खात्री आहे !😍🥰🙏

      Delete
  11. Kaka mi pan hach vichar karte hicha tya athvanichcha kappyat kai kai bhadar ahe kai mahit
    Chan lihiles vishai tar sadhach pan tyavar kiti vistrut lihu shakte hi
    Bhutkalatil sughandhi shan wawa👌

    ReplyDelete
    Replies
    1. अग फार काही विचार नको करुस🙄🤔 . मी फार काही करत नाहीये . लहानपणी जे जगले आहे पहिले आहे , ते जसे आठवेल तसे सगळ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे . पण तरी या सगळ्या कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद !!🙏🤩😇

      Delete
  12. प्राजक्ता डोंगरेApril 20, 2020 6:47 pm

    Khup chan lihilay������

    ReplyDelete
    Replies
    1. मस्त वाटते, तू या निमित्ताने इथे भेटतेस अणि थोडाफार का होईना आपला संवाद होतो. 😍😇
      मनःपूर्वक धन्यवाद!! 🙏

      Delete
  13. छान लिहीलेस

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नाव नसल्याने कोण ते कळले नाही 😊

      Delete
  14. Khup chhan vismarnat gelela Khoja aathwla gg..chhanch

    ReplyDelete
    Replies
    1. खरच, खोजा तर माझा एकदम आवडीचा!!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊

      Delete
  15. बाबा व हरीमामा यांना मी जवळून बघितले आहे. बाबासाहेबांचे कपडे कडक इस्त्रीचे पांढरे किंवा पिवळसर तलम खादीचे असत. त्यांच्या कपड्यांच्या इस्त्री करण्याची कृती तू अगदी बारकाव्यासह वर्णन केल्यामुळे समोर प्रसंग उभा राहतो. इस्त्रीवर पाण्याच्या पडणार्‍या थेंबामुळे होणारा चर्र र्रर्र आवाज, कापडाचा वास हेसुद्धा विसरली नाहीस. सहजतेने केलेले वर्णन खूपच छान. तुझे खूप कौतुक ������

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरंय, त्यांना तुम्ही अगदी जवळुन पाहिले आहे, त्यामुळे त्यांच्या बर्‍याच गोष्टी तुम्हाला अगदीच नीट माहीत आहेत!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 या नेहमीच्या छान छान कौतुकाबद्दल!! 😊😇

      Delete
  16. डॉ माया पाटीलApril 24, 2020 1:38 pm

    छान लेख�������� अशी लोखंडाची इस्त्री आमच्याकडे पण होती... तुम्ही
    फोटो देता त्यामुळे सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात..

    ReplyDelete
    Replies
    1. अरे व्वा! आपल्या खुपच आठवणी सारख्या आहेत बालपणीच्या! छानच,
      खुप सारे धन्यवाद 😍!!

      Delete
  17. किशोरी मातेकरApril 24, 2020 7:38 pm

    Bhongachi Iron ������

    ReplyDelete
    Replies
    1. हो ग! आपल्या पिढीच्या सुद्धा बर्‍याच लोकांना माहिती नसेल या बद्दल, अणि ही भोंग्याची इस्त्री माझी एकदम लाडकी, म्हणुनच लिहिले तिच्याबद्दल ईतके सविस्तर!!! 😍😇

      Delete
  18. Great. Ata baghayla pn milnar nahi ashi istri. Khup chan lihlay������

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय आता बघायला मिळणार नाही . धन्यवाद !

      Delete
  19. Bhongya chi istri mi pahilyanda paholi 🙂,khup chaan

    ReplyDelete
    Replies
    1. तुझ्यासारख्या बऱ्याच लोकांनी पहिली नव्हती ही इस्त्री , म्हणुनच खास ना ! त्यामुळेच त्यावर लिहिले मी , सगळ्यांना माहिती व्हावी म्हणुन . 😊😇

      Delete
  20. झोऱ्या,मांडोळी आणि भोंग्याची इस्त्री माझ्यासाठी नवीनच(will explore??) खादीच्या कपड्यांच्या पेहरावापसून ते इस्त्री करण्याची कृती बारकाईने वर्णन हे मस्तच लिहिलंय, हे सारे काही चित्रांच्या folded sequence प्रमाणे visualize होतंय.

    ReplyDelete
  21. हे सगळे खास खान्देशी शब्द . अगाफी जन्मापासुन  खादीच पाहिली आणि वापरली सुद्धा . बरेच मोठे होईपर्यंत मला   माहीतच नव्हते की बाकी लोक दुसऱ्या प्रकारचे कापड वापरतात . सगळं पाहिलेले आहे ना आणि माझ्या सगळे  नीट आठवणीत आहे . ते फक्त तसेच्या तसे लिहून काढले , सप्रेम धन्यवाद !!🤩😇

    ReplyDelete
  22. Beautiful��
    Ya antique photos mastch ahet����

    ReplyDelete
  23. व पु होले सरNovember 19, 2021 6:27 pm

    नमस्कार ,प्रथम आपले अभिनंदन .मी आपले सर्वच लेख वाचलेत.ख-या अर्थानं भूतकाळ जगावयाला लावण्याची ताकद आपण केलेल्या सविस्तर व यथायोग्य शब्दांनी दर वेळेला जाणवते.धन्यवाद ����

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...