खजीना -१
(घरातील गमती जमती)
चौधरी सदनातील काही कपाटं भिंतीतच (म्हणजे बिल्ट-इन ) होती . कपाटांचे मला फारच आकर्षण होते . कारण या कपाटांमध्ये असलेला खूप सुंदर आणि अमूल्य खजीना ! अधून-मधून , नियमितपणे या सगळ्या कपाटांची साफ-सफाई होत असे . नक्की कधी आणि किती वेळा होत असे ते मात्र नक्की आठवत नाही . पण ही साफ-सफाई केली जात असे तेव्हाच या कपाटांमधील खजीना बाहेर येत असे आणि हातात घेऊन , जवळुन बघता येत असे , काही वेळ तरी . थोडक्यात कपाट सफाई म्हणजे नामी संधीच असे हा अमूल्य खजीना बघण्याची आणि हाताळण्याची ! त्यामुळे ही कपाटं साफ करायची म्हटली की एकदम मी खुश ! तर त्यापैकी एका कपाटाची सफाई आणि त्यातील खजीन्याची गोष्ट सांगणार आहे .
पहिले कपाट म्हणजे मम्मी-दादांचे कपाट . या कपाटाचे मुख्य दोन भाग होते . एक म्हणजे वरचा भाग , यात तीन उघडणारे दरवाजे होते . पैकी एक कप्प्याला दोन दरवाजे होते आणि त्याला त्या दारातच (बिल्ट इन) एक कुलूप होते . आणि दुसरा भाग एक दरवाजा , त्याला कुलूप नव्हते , ते नुसतेच लोटून बंद केलेले असे . दुसरा भाग म्हणजे खालचा , या भागात लाकडी सरकते दरवाजे होते दोन . यापैकी वरच्या भागात कपडे असतं . एकच दार असलेल्या भागात नेहमीचे लागणारे कपडे असतं . यात मजेदार किंवा मन आकर्षून घेणारे असे काहीही नव्हते .
मात्र दोन दारं असलेला जो भाग होता , त्या भागात एकाहून एक भारी खजीना होता . एक म्हणजे मम्मी-दादांचे ठेवणीतील कपडे . मम्मीचा शालू आणि दंडवा . दादांचे दोन सूट , धोती आणि झब्बा . मम्मीच्या शालूचा रंग इतका भारी , दुर्मिळ आणि अद्वितीय होता की तो फक्त बघायला मिळाला तरी छान वाटत असे . पुढे बऱ्याच वर्षांनी , जुना झाल्यावर मी बऱ्याच वेळा हट्ट केला , मम्मी जवळ की मला त्याची एक छानशी मॅक्सि शिवून दे म्हणून . पण खूप जुना झाल्याने त्याचे कापड वीरत चालले होते , त्यामुळे शिवणे सुद्धा शक्य नव्हते .
दादांचे दोन सुट , याचा उल्लेख ऊन्ह दाखविणे या लेखात आलेलाच आहे . तर त्यांचे हे कोट नाही वापराता आले मला . पण त्याच लेखात सांगितल्याप्रमाणे त्याच्या पँट्स मात्र मी वापरल्या होत्या . अजून काही दिवस टिकले असते , तर मात्र मी ते कोट सुद्धा नक्कीच वापरले असते . पण माझ्यासमोर दादांनी कधी हे सूट वापरल्याचे मात्र मला आठवत नाही , अगदी घरातीलही कुठल्या समारंभात नाही . त्यांचा समारंभात घालायचा आवडता पोषाख म्हणजे धोती आणि झब्बा . यापैकी झब्बा सगळ्यांना माहितीचा/ओळखीचा आहेच . पण हा झब्बा कायमच खादी किंवा खादी सिल्कचा शिवलेला असे . पण धोती कदाचित बऱ्याच जणांना माहितीची किंवा अगदी ऐकीवात सुद्धा नसेल . तर थोडक्यात , ही धोती म्हणजे शिवलेले धोतर . हे फक्त पॅन्ट सारखे घालायचे आणि कमरेला बांधायला एक नाडा असतो . घातल्यावर , धोतर नेसले आहे असेच वाटते . तर हा यांचा आवडता पोषाख आणि मलाही मनापासून आवडतो त्यांनी हा पोशाख घातलेला ! तर हा यांचा आणि माझा लाडका पोषाख सुद्धा या कपाटातच असे .
या खजीन्यातील दुसरी गोष्ट म्हणजे एक लोखंडी शृंगार पेटी ! बहुतेक मम्मीच्या साखरपुड्यातील असावी . बाहेरून छान गर्द चोकोलेटी आणि सोनेरी रंगाची होती . त्यातच तिच्या समोरच्या बाजूत एक कुलूप (बिल्ट इन ) होते आणि त्याला छोटीशी चावी होती , फारच गोड होती ती ! चावीने ती पेटी उघडली की झाकणाच्या आतल्या बाजूला एक आरसा होता . पेटीच्या एका लांबीच्या बाजूला बिजागरे होते , त्यामुळे ते झाकण बरोबर नव्वद अंशात उभे राहत असे . आतल्या बाजूला वेगवेगळे कप्पे होते , वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी . जसे बांगड्या ठेवण्यासाठी एक गोल रचना . हार ठेवण्यासाठी तशी खास रचना वगैरे वगैरे . आतून सगळीकडे गर्द निळ्या रंगाचे मखमली कापड लावलेले होते , छान मऊशार ! त्यावरून हात फिरवणे म्हणजे स्वर्ग सुख ! अगदी आतून बाहेरून सर्वांग सुंदर होती . लोखंडी असल्याने खूप वजनी , त्यामुळे ती बघण्यासाठी हातात कधीच मिळत नसे . सटकून पायावर पडली की पायाचे बारा वाजणार . मग मम्मी एका ठिकाणी जमिनीवर ठेवत असे आणि मग आम्हाला बघायला देत असे , थोडा वेळाकरीता . हा वेळ कधी संपूच नये असे वाटे .
या खजीन्यातील तिसरी गोष्ट म्हणजे एक पत्र्याची पेटी , थोडी फिक्या हिरव्या रंगाची आणि त्यावर काळ्या रंगाचे काहीतरी चित्र आणि अक्षर होती . कसली होती नक्की माहिती नाही , चॉकोलेट किंवा औषधी गोळ्यांची असावी . तर या पेटीत दादांनी त्यांना , त्यांच्या मित्र मंडळींनी पाठवलेली पत्रं आणि शुभेच्छा पत्रं ठेवलेली होती . ही सगळी पत्रं इंग्रजी मध्ये लिहिलेली होती . शुभेच्छा पत्रं मात्र एकाहून एक सुंदर आणि अप्रतिम होती . मला फार आवडत ती . प्रत्येक वेळी कपाट साफ करायला काढले की मी अगदी एक एक शुभेच्छा पत्रं बघत असे . नंतर मलाही खूप नाद लागला होता शुभेच्छा पत्रं गोळा करायचा , इतका की मी पुण्यात शिकायला गेल्यावर निरनिराळी शुभेच्छा पत्रं चक्क विकत घेत असे , माझ्या या संकलनासाठी ! अजूनही अशी बरीच शुभेच्छा पत्रं मी सांभाळून ठेवली आहेत , माझ्या प्रेमाच्या आणि खास व्यक्तींनी पाठवलेली . मी स्वतः सुद्धा माझ्या हाताने शुभेच्छा पत्रं , तयार करून बऱ्याच जणांना पाठवत असते , या ना त्या निमित्ताने . त्यामुळे त्या त्या व्यक्तींकडे सुद्धा मी पाठवलेल्या शुभेच्छा पत्रांचे संकलन आहे मी लिहिलेल्या पत्रांसोबत !
झळाळते रंग , माझ्या अगदी आवडीचे आणि मना-हृदयाजवळचे ! अशीच एक छान झळाळत्या रंगांचा आनंद देणारी एक गोष्ट होती या कपाटात . ती म्हणजे बांगडीकाच शोभादर्शक यंत्र , शुद्ध मराठीत "कॅलिडोस्कोप" ! शंकूच्या आकाराचे , त्यात आरसे बसविलेले असतात आणि साधारणपणे फुटलेल्या काचेच्या बांगडीचे तुकडे असतात . एक डोळा बंद करायचा आणि दुसरा डोळा त्या शंकूच्या निमुळत्या बाजूला लावायचा . मग तो गोल गोल फिरवायचा हळुवार . प्रत्येक क्षणाला या तुकड्यांचे वेगवेगळ्या मनोहरी आकृती दिसतात . बघणारा या वेगवेगळ्या रंगांच्या दुनियेत हरवूनच जातो , मी सुद्धा पार हरवून जात असे त्या रांगांमध्ये . अगदी डोळ्यापासून दूर करावासाच वाटेना मला . पण बाकीही भावंडं होती . त्यांना पण बघायचा असे तो , त्यामुळे थोडावेळ बघून पुढे द्यावा लागे , ज्याचा माझ्या नंतर नंबर असे त्याला .
एक खूप गोड गोष्ट होती या कपाटात . ती म्हणजे बचत पेट्या . ह्या म्हणजे नेहमी सगळ्यांकडे असतात , बाजारातून विकत आणलेल्या नव्हत्या . ह्या म्हणजे रीतसर बँकेत खाते उघडून , त्या बचत पेट्या मिळालेल्या होत्या . बहुतेक युनिअन बँकेच्या होत्या . आम्हा तिघी बहिणींच्या तीन . भावाची मात्र वेगळी होती . वयोगटाप्रमाणे बँकेनेच वेगवेगळ्या आकाराच्या बचत पेट्या केलेल्या होत्या . तर आम्हा तिघी बहिणींच्या बचत पेट्या म्हणजे पुस्तकाच्या आकाराच्या होत्या . पुस्तकाचे मुखपृष्ठ , मलपृष्ठ आणि बांधणीची बाजू छान गडद लाल रंगाची होती . मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ दोन्हीवर बँकेचे नाव आणि चिन्ह कोरून सोनेरी रंगात रंगविलेले होते , शिवाय खातेदाराचे नाव सुद्धा लिहिलेले होते . किती महान होतो आम्ही , इतक्या लहान वयातच आमची नाव सुवर्णाक्षरात कोरली गेली होती . पुस्तकाची जाडीच्या , बांधणीची बाजू सोडून उरलेल्या तीन बाजू सोनेरी रंगाच्या होत्या . ते पाहून असे वाटे फार मौल्यवान पुस्तकच आहे ते जणू . हे बचत पेटी रुपी पुस्तक उभे करून ठेवले तर त्याच्या जाडीच्या वरच्या बाजूला दोन खाचा होत्या . एक थोडी जाड सरळ रेष आणि दुसरी एक छोटीशी वक्र रेष साधारण त्याच जाडीची .सरळ रेष असलेल्या खाचेतून नाणे टाकता येत असे बचत पेटीत . या सरळ खाचेच्या ठिकाणी आतल्या बाजूला एक बारीक-बारीक स्टेनलेस स्टील ची हलणारी जाळी बसवलेली असे . नाणे टाकले की , त्या नाण्याच्या वजनाने ती बाजूला होई आणि नाणे खाली जाऊन पडत असे पेटीत . पण जर ही पेटी उलटी करून आतील नाणी बाहेर काढायचा प्रयत्न केला तर ही जाळी पुढे येत असे आणि त्यामुळे आतली नाणी बाहेर येत नसत . दुसऱ्या वक्र खाचेतून नोटेची अगदी बारीक घडी घालून त्यातून आत टाकता येत असे . या पेटीला जाडीच्या लांबीच्या बाजूला एक कुलूप (बिल्ट-इन) होते . अर्थातच चावी बँकेत असे . कुणी-कुणी काही कारणाने आम्हाला खाऊ साठी दिलेले पैसे , आम्ही त्यात टाकत असू . बऱ्याच वेळा मम्मी-दादाच देत आम्हाला पैसे या बचत पेटीत टाकण्यासाठी . मग ह्या बचत पेट्या भरत आल्या की त्यात पैसे टाकणे मुश्किल होऊन जात असे . मग या भरलेल्या बचत पेट्या बँकेत घेऊन जाऊन रिकाम्या केल्या जात आणि ते पैसे आमच्या खात्यात जमा करून घेतले जात . रिकाम्या पेट्या बंद करून परत घरी येत , नव्याने भरून जाण्यासाठी . माझी तर फारच लाडकी होती ही बचत पेटी . पण दुखरा भाग हा होता की एका विशिष्ट कालावधीनंतर हे खाते बंद करावे लागे आणि या बचत पेट्या सुद्धा बँकेत परत कराव्या लागत . तशा त्या बँकेत परत कराव्या लागल्या , त्यामुळे त्या नाहीतच आमच्याकडे .
आणि सरते शेवटी एक गोष्ट म्हणजे एक कृष्ण-धवल छायाचित्र घेण्याचे एक यंत्र म्हणजे शुद्ध मराठीत "कॅमेरा" . हा अर्थातच दादांचा होता . या ब्लॉग मधील सगळे लहानपणीचे कृष्ण-धवल छायाचित्र याच यंत्राच्या मदतीने काढलेले आहेत आणि बरेच कुठले कुठले फोटो होते यात काढलेले . पण आमच्या मुलांनी त्याची वाट लावली . आता एक सापडले आहे ते मात्र तुम्हा सगळ्यांनाही बघायला मिळेल . या कॅमेराचा काही भाग काळा आणि काही भाग राखाडी(ग्रे) रंगाचा होता . फक्त कृष्ण-धवल छायाचित्र काढता येत असत यात . ती एका बाजूने मळकट लाल रंगाची रीळ बसत असे यात , एका प्लास्टिकच्या छोट्या चक्रीवर गुंडाळलेली . मी थोडी मोठी झाल्यावर , तो काही उपयोगाचा राहिला नव्हता . थोडा खराबही झाला होता आणि तशा रीळ मिळणे आणि ते छायाचित्र छापण्याची सुद्धा सोय नव्हती . पण तरी मी आमच्या एका काकांच्या(दादांचे मावस भाऊ लक्ष्मण काका) मागे लागून त्यात तो रीळ आणून बसवला आणि छायाचित्र काढून , छापून सुद्धा घेतले होते . हे मात्र असतील घरात अजून . पण अर्थातच त्या छायाचित्रांचा दर्जा फारसा चांगला नाही . पण माझी तेव्हढीच हौस भागली . तेव्हा मात्र चालू स्थितीत असल्याने त्याला हाताळायला मिळत नसे , लांबूनच बघता येत असे . पण तसा लांबून बघून पण खूप छान वाटत असे .
हा झाला कपाटातील वरच्या भागातील खजीना . अजून याच कपटाचा खालचा भाग बाकी आहे . त्या भागातील खजिन्याबद्दल सुद्धा सांगेनच , पण दुसऱ्या लेखात . आणि मग अशी कपाटातील या भागाची सफाई झाली की मम्मी त्यात नवीन वर्तमानपत्राचे कागद ठेवत असे आधी , कोपऱ्यात डांबर गोळ्या घालत असे . मग एक-एक करत सगळ्या वस्तू नीट जगाच्या जागी नीट रचून ठेवत असे आणि एक मोठ्ठे काम संपल्याच्या आनंदात असे . मी मात्र वाट बघायला सुरुवात करत असे , परत या कपाटाची सफाई कधी होणार याची ........ कारण त्याशिवाय परत हा खजिना बघायला , हाताळायला मिळत नसे .
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
२०मार्च२०२०
शृंगार पेटी
शृंगार पेटी
मी पाठवलेली शुभेच्छा पत्रांचे संकलन १(वृश)
मी पाठवलेल्या शुभेच्छा पत्रांचे संकलन २(पियू)
बांगडी काच शोभा दर्शक यंत्र
बांगडी काच शोभा दर्शक यंत्र
बांगडी काच शोभा दर्शक यंत्र
कॅलिडिओस्कोप मधून दिसणारे दृश्य
कॅलिडिओस्कोप मधून दिसणारे दृश्य
बचत पेटी
बचत पेटीच्या खाचा
कॅमेरा
हा फोटो त्या कॅमेरातून टिपलेला
मी तर ब र्याच गोष्टी विसरूनहि गेलो होतो आता मेंदुला ताण देऊन देऊन आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे थोड थोड आठवायला लागले आणि त्याचि चित्र फित ओझरति फिरलि
ReplyDeleteसहाजिकच आहे , तुम्हाला विसर पडणे . मी ओझरती का होईना ही चित्र फीत तुम्हाला दाखवू शकले ह्याचेच मला समाधान !! ☺😇💖😊🤗
DeleteNice collection
ReplyDeletethnk u so much !🙏🤩☺
DeleteKhoopach sunder varnan ani pics pratek vastuche
ReplyDeleteTuzha smaranat pan barik satik👌👍
इतक्या छानछान गोष्टी असल्यावर सगळे बारीक सारीक लक्षात राहणारच ना !🤩🥰😍💃
DeleteSarik*
ReplyDeleteWoww nice collection n lekhhi
ReplyDeleteगौरी , छान वाटते तुला इथे नियमित भेटून !😍❤💖
Deleteमस्त
ReplyDeleteअरे काकू खूप सारे धन्यवाद !!! 😍💃🤩
Deleteकाकु
ReplyDeletekeep it up शैला काकू !💃💃💃
DeleteAawdala tuza khajina aamhala pan khup lahanpanichya sarv aathavni khup chan aathavitat tula sundar.....
ReplyDeleteआहे की नाही एकदम सुंदर आणि हवाहवासा ! तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल ही खात्रीच होती , म्हणूनच घडवली ही खजीन्याची सफर !!🤩😇☺
Deleteखजिन्यातील अमूल्य ठेव्याचा कँडिलोस्कोप खूप भावला. मस्त. ����
ReplyDeleteyesssssss ! it was even my very very favourite too !🤩💃💃
Deleteछानच.. असं व्यक्त व्हायला हवे।
ReplyDeleteएकच पुस्तक लिहायला वेळ होणे शक्य नसते ..पण असे ..वेगवेगळ्या कप्प्यांवर लिहायला हवे।
छान लिहीतेस....!
अगदी खरंय, व्यक्त होण्यासारखा आनंद नाही या जगात! जोपर्यंत आपण व्यक्त होत नाही तोपर्यंत हा आनंद आपण अनुभवू शकत नाही! एकदा का व्यक्त व्हायला सुरुवात केली की सगळा आनंदच आनंद!!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊
Great childhood days. Nice write up. Was forgotten everything but remembered everything after reading the blog.enjoyed the every word and memories. Thanks for that especially the precious money bank
ReplyDeleteYessssssssss!!!! आपल बालपण अणि बालपणातील आनंदाला या जगात तोड नाही!!!
Deleteखरच त्या बचत पेट्या म्हणजे मोठ्ठा अणि आनंदी ठेवा आहे आपल्या आयुष्यातील 😍❤️💃
वा..छान.
ReplyDeleteएकदम चित्रमय..
ekdam bhaari.. photo pahilyane ajun maja vadhali.. photo kase kuthun milavales? ya sagalya vastu ajun ahet ka tithe? kamaal..
ReplyDeleteदुर्दैवाने नाहीत या गोष्टी.....
Deleteअसो
पण त्यांच्या छान छान आठवणी मात्र आहेतच कायमस्वरूपी.... 😍
छानच आहे सगळा खजिना. आपल्या वडिलांचे कपडे घालण्याची किवा त्यांच्या वस्तू वापरण्याची सगळ्या मुलांना कायम उत्सुकता असते, ती तुझ्या मनातली तू व्यक्त केली आहेस. बाकी दागिन्यांची पेटी अणि kalidioscope पण आवडला . जुन्या काळातल्या camera ची pan आठवण आली आधी ते फोटो काढणे, फिल्म धुऊन आणणे आणि प्रिंट्स घेणे हे सगळे सोपस्कार आठवले . Keep writing. 👍👍👍👍
ReplyDeleteफक्त वाडीलाच्याच नाही तर सगळ्या प्रेमाच्या व्यक्तींचे कपडे मला तर फारच हौस आहे.... हे सांगणे नलगे
Deleteअणि फोटो धुवून येईपर्यंत उत्सुकता किती शिगेला पोहोचत असे......
अणि हल्ली लिहिणे हे माझे अगदी मुख्य काम झालेय....
असो मनःपूर्वक धन्यवाद 🙏
झळाळत्या रंगांच्या झळाळत्या आठवणी अगदी मर्मबंधात जपून ठेवलेल्या आणि थेट सत्तर ऐंशीच्या दशकातल्या जीवनशैलीत घेवून जाणाऱ्या. काय लिहू आणि काय नको... सारच विलक्षण... "You have to experience to believe it" चा पदोपदी प्रत्यय आणून देणारे विविध, विशेष, वेचक आणि वेधक अशा अनेक वैशिषट्ये असलेल्या लेखनशैली ने युक्त असे ब्लॉग लेखन.. लिहिणाऱ्याने लिहीत राहावे आणि वाचणाऱ्याने वाचत राहावे असे प्रभावी लेखन....
ReplyDeleteझळाळते रंग म्हणजे माझ्या अगदी आवडीचा विषय🌈 ! एकंदरीतच मला आवडते काही वेळ तरी भूतकाळात रमायला . असे म्हटले जाते भूतकाळात रमू नये , म्हणेन थोडावेळ भूतकाळात रमून जर तुम्हाला खूप सारी सकारात्मक ऊर्जा मिळत असेल तर खुशाल रमावं भूतकाळात 💃! खूप खूप धन्यवाद इतक्या सगळ्या कौतुकाबद्दल आणि सकारात्मक ऊर्जा दिल्याबद्दल !!🙏☺😇
DeleteVarsha..tula sarw eetake kase aathwate..ekdum detail..hats of you dear..
ReplyDeleteआठवण्याच्या बाबतीत म्हणशील तर I m blessed soul 😇
DeleteTons of love 😍
अप्रतिम... तुमच्या या लेखाद्वारे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी जागृत होतात..��
ReplyDeleteदागिन्याचा बॉक्स, ट्रंक इत्यादी...
खूप सारे मनःपूर्वक धन्यवाद! माझ्या लिखाणाने, तुम्हालाही तुमचे बालपणी चे क्षण जगायला मिळत आहे अणि तो आनंद परत मिळतो, छान वाटते हे बघून!!! 😊😍🙏😇
DeleteBachatpeti ......... Aajkal chi money or piggi bank������
ReplyDeleteनाही खर तर, आमची बचत पेटी खरच बचत पेटी होती, त्यात एकदा पैसे टाकले की काढता येत नसत. आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या सगळ्या बचत पेटीतून किंवा piggy बँक मधुन त्यात टाकलेले पैसे कधीही काढता येतात 😁
Deleteश्रुंगार पेटी व धोती व आईचा शालू मला पण आठवले पूर्वी च्या काळी किती गोष्टी सारख्या असायच्या ना जर घरात खूप जण असतील तर माझे माहेरी पण 7 काका होतेत्यामुळे असेल मला ती कविता आठवली (तुझं माझं सेम असतं) मस्त लिहतेस लिहीत रहा
ReplyDeleteआज त्या गोष्टी कुठे गेल्या अशी रुखरुख वाटते
तुझ्या माहेरी त्या किती छान जपून ठेवल्या आहेत ना?����
आज शांत पणे सर्व पुन्हा एकत्र वाचले तुझे पुस्तक झाले की कळव मग मी ते विकत घेईन
सगळ्यात आधी तुम्ही थोडीही हळहळ वाटू नका कारण माझ्याही या सगळ्या वस्तू नाहीत आता पण आठवणीत मात्र अगदी पक्क्या आहेत😊 . त्या जपून ठेवणे म्हणजे मोठ्ठे काम असते , जपून ठेवणाऱ्याला , समजून घेतले पाहिजे . ते मात्र अगदी बरोबर आहे तुमचं माझं सेम सेम आहे🤩🤩 , मला पण हे बऱ्याच दिवसांपासून वाटतेय तुमच्या आठवणी वाचून !पुस्तकाला बराच अवकाश आहे अजून , वेळ आली की सांगीनच आणि पाठवीनच तुम्हाला एक प्रत नक्की !खूप सारे सप्रेम धन्यवाद !🙏😇
Deleteखुप छान आहे खजिना. मलाही लहानपणापासून कपाट आवरायला खुप आवडते. आतील वस्तू बघायला आणि निटनेटके रचून ठेवायला.
ReplyDeleteतुझी कपाटं आवरायची आवड आणि सवय मला चांगलीच माहितीची आहे ! निम्मिताने त्याची नोंद सुद्धा झाली कायम स्वरूपी !सप्रेम धन्यवाद !
DeleteKhupch chhan khajina..shiway to purwichi bachat peti khup awwadali aani aatgwali on..nice collection n reminder..
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇!!!
Deleteखूप छान mast����
ReplyDelete