लोणचं सोहळा (घरातील गमती जमती) एकत्र कुटुंब, भरपूर लोकांचं! त्यामुळे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम म्हणजे एक मोठ्ठा सोहळाच होऊन जात असे. तर आज अशाच एका सोहळ्याची गोष्ट सांगणार आहे. कैरी लोणचं सोहळा! भरपूर लोक घरात, त्यामुळे लोणचंही लागणार हे एक कारण तर होतेच, पण आम्हा मुलींना कैरीचे लोणचे म्हणजे जीव की प्र...