कोजागिरी - २ (गच्चीवरील गमती जमती) हा भाग म्हणजे आम्हा बहिणींचा आणि मैत्रिणींचा खूप आवडीचा .अगदी आतुरतेने वाट बघत असू आम्ही सगळ्या, या दिवसाची . कारण हा दिवस म्हणजे आमच्या गुलाबाई च्या विसर्जनाचा दिवस , म्हणजे खूप धम्माल ! खूप खूप आनंद !! आणि मनाच्या एका कोपऱ्यात थोडेसे वाईट सुध्दा वाटे . महिन्याभराची ही धमाल संपून जाणार म्हणून ....
कोजागिरी - १ (गच्चीवरील गमती जमती ) अगदी लहान पणापासून म्हणजे अगदी मला समजायला लागल्यापासून आठवते ..... आमच्याकडे कायमच अगदी न चुकता दर वर्षी कोजागिरी साजरी केली जात असे . अर्थातच माझ्या आयुष्यातील पहिली कोजागिरी साजरी झाली ती 'चौधरी सदन' च्याच गच्चीवर ! अगदी जन्मापासून ते माझं लग्न होऊन चार-पाच वर्ष होईपर्यंत आमचे एकत्र कुटुंब होते . त्यामुळे कुठलाही कार्यक्रम असो घरातलीच सगळी मंडळी असली तरी खूप मज्जा येत असे . ...