रांगोळी नायिका - १ (व्यक्ती विशेष) जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात दिसतील तैसे पतंग रंगीत खेळ किती चांगला पांढऱ्या शुभ्र रांगोळीने, दाराला सजवू या I रंगांच्या उधळणीत, आज संस्कृती जपू या II मी : नमस्कार मला आपल्याशी बोलायचे आहे. शक्य होईल का? त्या : बोला कुठल्या ग्रुपवर आहात? त्या : कशाच्या संदर्भात बोलायचे आहे? मी : रांगोळी संदर्भात . . . मी : खादाड खाऊ गटावर . . . मी : मी ब्लॉग लिहिते मला तुमच्या रांगोळी छंदाबद्दल लिहिण्याची इच्छा आहे. तुमची परवानगी असेल तर. त्यासाठी बोलायचे आहे. त्या : तुमचा फोन लागत नाही. मी परत नंबर दिला आणि त्यांचाही मागितला. मी फोन करते म्हटलं तर म्हणाल्या मी करते दुपारी. यानंतर दैनंदिन कामाच्या व्यापात मला या संवादाचा विसर पडला. दुपारी बहिणीशी भ्रमणध्वनीवर बोलत होते. तर मध्येच एक अनोळखी नंबर वरून सारखा फोन येत होता, कुठल्यात...