त्रिवेणी संगम , वेरूळ , संभाजीनगर. ( सरिता मंदिर) (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ...) कोंकण ज्ञानपीठ, उरण कला व वाणिज्य महाविद्यालय आणि भारतीय मूर्ती आणि स्थापत्य संशोधन परिषद आयोजित तिसरे राष्ट्रीय अधिवेशन २०२३ त्रिवेणी संगम , वेरूळ , संभाजीनगर. ( सरिता मंदिर) संशोधक - वर्षा उपरोक्त उल्लेखित परिषदेत त्रिवेणी संगम , वेरूळ , संभाजीनगर. ( सरिता मंदिर) या विषयावर शोध निबंध सादर केला. बऱ्याच वाचकांची इच्छा असते हे वाचण्याची. तथापि शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठीचे काही नियम असल्या कारणाने, ते प्रकाशित करणे थोडे जबाबदारीचे आणि काहीसे अवघड होऊन बसते. तरीही वाचकांची जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता विचारत घेता, त्यातील काही चित्तवेधक भाग येथे प्रकाशित करत आहे. जल, जल-वाहिन्या, जल-साठे, जल-वास्तू असे जलाशी निगडीत सगळेच विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचे! ते सगळे विषय या ना त्या मार्गाने आनंदी पावसात येणारच!! आनंदी पाऊस म्हणजे सुद्धा जलच की, सर्वात नैसर्गिक, शुद्ध आणि पवित्र रूपातील!!! ...