👯💃 वार्षिक स्नेह संमेलन 💃👯 (काही अनुभवलेलं...) दिनांक - ५ फेब्रु २०२५ वेळ - सायंकाळी ५ वाजता स्थळ - ग्लोबल इंग्लिश मिडीअम स्कूल, नशिराबाद शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन! साऱ्यांनाच खूप उत्सुकता असते. विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमंत्रित. साधारणपणे, प्रत्येकाला आयुष्यात दोन भिन्न काळातील वार्षिक स्नेह संमेलनाचा आनंद अनुभवायला मिळतो. एक म्हणजे स्वतः शाळेत असतांना आणि दुसरे म्हणजे अपत्याच्या शालेय जीवनातील काळात. तथापि मला या व्यतिरिक्त सुद्धा हा आनंद नुकताच अनुभवायला मिळाला, अगदी अनपेक्षितपणे... एका शाळेत वार्षिक संमेलनाची विशेष अतिथी म्हणून! तेही, आमचे मूळ गाव असलेले गाव म्हणजे नशिराबाद येथे! अगदी स्वर्गीय सुंदर असा अविष्कार-अनुभव! आपल्याला आयुष्यात कुठे नी कुठे सन्मान मिळतो, आपले कौतुक होते. या सगळ्याचा आनंद असतोच! तथापि आपल्या मूळ गावी, आपलेपणाने विशेष आमंत्रित करून, सन्मानपूर्वक विशेष अतिथीच्या आसनावर आसनस्थ केले जाते, तो आनंद शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य आहे...! असा आनंद अनुभवण्याची संधी मिळण्यास परमभाग्यच...