झळाळता रंगीत आनंद-१ (काही अनुभवलेलं...) रंग! झळाळते रंग! झळाळता आनंद! झळाळत्या रंगांचा झळाळता रंगीत आनंद! अस म्हणतात मानव सोडला तर पृथ्वीतलावर बाकी कुठल्याही सजीवाला रंग दिसत नाहीत. सगळे रंग-आंधळे(colour-blind) असतात. त्यांना सगळे जग काळ्या रंगाच्या छटांचे दिसते. काय गम्मत आहे बघा, मानवाचा रंग पाहिला तर एकाच रंगाच्या विविध छटा आहेत. तथापि मानव वगळता सगळ्या सजीवांच्या रंगांत किती विविधता दिसते! एका प्रजातीच्या पक्षाचा रंग दुसऱ्या प्रजातीच्या पक्षापेक्षा फार भिन्न असतो. तसेच प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक, मासे आणि इतर लक्षावधी जलचर प्राण्यांच्या बाबतीत तसेच. कुठल्याही दोन प्रजातीचा रंग एकसारखा नसतो. परंतु किती विरोधाभास, ज्यांना हे निरनिराळे रंग या ब्राह्मडाच्या निर्मात्याने दिले आहेत, त्यांनाच हे रंग दिसत नाहीत. आणि दुसरी बाजू, मानवाला एकच रंग दिला आहे, पण त्याला मात्र सगळे रंग, त्याच्या विविध छटा बघता येण्याची दृष्टी निर्मात्याने दिली आहे. म्हणजेच त्या निर्मात्याने मानवाला निर्माण केले ...