Skip to main content

Posts

Showing posts from August, 2024

🐦🕊️🦅चैतन्यमयी भिरभिरते रंग!🦅🕊️🐦

🐦🕊️🦅चैतन्यमयी भिरभिरते रंग!🦅🕊️🐦   💧पावसाळा!  💧वर्षा ऋतु 🌧️ 💧श्रावण महिना 🌦️ 💧आनंदी पाऊस ☔ 💧सर्वत्र आनंदी आनंद💧 💧हरित आनंद🌿 💧रंगीत आनंद 🏞️ 💧झळाळत्या रंगांचा आनंद 🏝️ 💧नैसर्गिक रंगांचा आनंद 🍄 💧नैसर्गिक आनंद 🌾 💧रंगीत निसर्ग 🪺 💧चैतन्यमयी निसर्ग 🍃 💧याचा एक भाग 🦤 💧रंगीत पक्षी 🐓 💧रंगीत लयबद्ध गती🕊️ 💧उडता रंगीत आनंद🦜  💧आकाशात झेपावणारे 🐦‍🔥 💧रंगीत चैतन्य...🦚 🌧️🌦️🌥️🌤️⛈️🌤️🌥️🌦️🌧️ या काही आई-बळाच्या जोड्या... 🦜 🦜 🌧️🌦️🌥️🌤️⛈️🌤️🌥️🌦️🌧️ ही चैतन्यमयी  हसती-खेळती  रंगीत  खग-कुटुंब  🦜 🦜🦜 🦜 🌧️🌦️🌥️🌤️⛈️🌤️🌥️🌦️🌧️ आणि  सरते शेवटी... कुटुंब, आप्त, इष्ट मित्र! 🦜 🦜🦜 🦜🦜 🦜 🦜 🦜 🦜 🌧️🌦️🌥️🌤️⛈️🌤️🌥️🌦️🌧️ ©️आनंदी पाऊस (चित्रं मालिका) ३० ऑगस्ट २०२४  

🌿🌸🌿🌸आनंदी सोहळा-५ 🌸🌿🌸🌿

🌿🌸🌿🌸आनंदी सोहळा-५ 🌸🌿🌸🌿 (featured)  ☘️🏵️☘️🏵️☘️🏵️☘️ आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचे ॥ काय सांगो जालें कांहीचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥ तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥ -संत तुकाराम महाराज आणि    आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे || धृ.|| वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला,  दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे || १ || सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने,  आनंदे गाते गाणे मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे || २ || नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?  तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो इकडे, तिकडे, चोहिकडे || ३ || वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?  कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले इकडे, तिकडे, चोहिकडे || ४ || स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो,...

🐍🌸नागबंध🌸🐍

🐍🌸नागबंध🌸🐍 नाग. नागपंचमी. संपूर्ण भारतात नाग-पूजन केले जाते. हल्ली नागा संबंधी अभ्यासाने बरीच माहिती नव्याने समोर येत आहे. त्यामुळे या प्रथेवर बरेच निर्बंध आले आहेत. बाकी पारंपारिक सण-प्रथे प्रमाणेच,   नाग-पूजन प्रथाही जवळ-जवळ बंदच झाल्यात जमा आहे. नवीन पिढीला असा काही सण असतो, ह्याची कल्पनाही नसणार, अगदी खात्रीने. संस्कृती सतत प्रवाही असते! त्यामुळे त्यात कालामानानुसार स्थित्यंतरं ही होणारच. असो. मागील नाग आणि नागपंचमी संबंधी लेखांतून,  नाग, साप एकंदरीतच सर्व  सरपटणाऱ्या प्राण्यांसंबंधी  माझे मत सांगितलेच आहे. तथापि  आता या चित्रांतील नागांशी तरी माझी मैत्री झाली आहे. ते आवडू लागले आहेत. त्यांची आणखी आणखी चित्रं काढावीशी वाटू लागली आहे.  दुसरे महत्वाचे कारण म्हणजे आपले पूर्वज! भारतात उत्तरेपासून दक्षिणेकडे, पुर्वेपासुन पश्चिमेकडे  कुठल्याही मंदिरात गेले तरी, नागाचे शिल्पांकन बघायला मिळतेच, अगदी खात्रीने! मंदिराच्या निरनिराळ्या भागांवर, विविध पद्धतीचे नागबंध नजरेस पडतात,  नव्हे तर, ते आपले लक्ष वेधून घेतात, ब...