🪻 कृष्ण-जन्मदिनानिमित्त! (featured) कृष्ण! राधेचा कृष्ण! मीरेचा कृष्ण! गोपींचा कृष्ण! देवकीचा कृष्ण! यशोदेचा कृष्ण! सखा कृष्ण! भारतीय स्त्रियांचा सखा कृष्ण! सकल भारतीयांचा सखा कृष्ण! अगदी पुराण काळापासून भेटत आलाय. अतिशय बाल वयापासून भेटत आलाय. आई-आजीने सांगितलेल्या पौराणिक कथांतून! तेव्हा पासूनच मना-हृदयात कृष्णाचे एक अढळ स्थान असते, प्रत्येक भारतीयाच्या. तसेच माझ्याही बाबतीत झाले. नंतर स्वतः वाचन करायला लागल्यावर तर, अजूनच जीवाभावाचा सखा झाला. कर्ण, राधेय, युगंधर, श्रीकृष्ण सारख्या पुस्तकांमधून तर, परत-परत भेटत असतो. वारंवार, अगदी पुन्हा-पुन्हा! तर कधी कधी त्याला भेटायचे असते, म्हणून मी ह्या पुस्तकांमधील काही भाग वारंवार वाचत असते. मधल्या काळात दूरदर्शनवर महाभारतावर आधारित एक मालिकाच आली, महाभारत! आणि या महाभारताने अगदी खराखुरा, जीता-जगता, चैतन्यमयी कृष्ण दिला, सकल भारतीयांना! नितीश भारद्वाज! वाचनातून कायमच कृष्...