🚩 राम! मला भेटलेला!-२ 🚩 (featured) साऱ्यांप्रमाणे मलाही उत्सुकता होतीच, २२ जानेवारी २०२४ या दिवसाची. मी सुद्धा दूरदर्शन वरील वाहिनी शोधून ठेवली होती, जी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करणार होती. वेळेवर दुरदर्शन संच चालू करून ठेवला आणि बाकी काम करता करता सगळा समारंभ बघत होते. मला हा समारंभ म्हणजे प्राणप्रतिष्ठा विधी तर बघायचेच होते, तथापि मंदिर, त्याचा आतील भाग, बाहेरील भाग, आजूबाजूचा परिसर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाभारा आणि त्यातील मूर्ती, पीठा सहित बघण्यात जास्त रस होता. पण मूर्तीचे दर्शन दोन दिवस आधीच झाले होते आणि ही मूर्ती बघून मला एक धक्काच बसला! कारण आजतागायत आणि या प्रसंगाच्या निमित्ताने रामाच्या मूर्ती आणि मोठाले कट आउट्स बघत आले होते, त्या सर्वांत, प्रौढ राम, हातात धनुष्य आणि पाठीवर बाणांचा भाता असेच बघत आले. तसेच सहसा रामाची मूर्ती म्हणजे राम-सीता-लक्ष्मण, सोबत काही वेळा हनुमान अशीच बघायला मिळते. ती मूर्ती बघताच क्षणी डोक्यात विचार सुरु झाले, असे का? ...