🎵🎶संगीतमय रेखांकन-१ 🎶🎵 (चित्रं मालिका) एकदा काही ड्रेसेस खरेदी केले. अतिशय आवडत्या ठिकाणी असलेल्या, आवडत्या दुकानातून. अगदी पाहता क्षणी मनात भरले. अगदी आतून आनंद झाला या साऱ्याचा! कधीही त्यापैकी ड्रेस घातल्यावर सुद्धा मन-हृदय अतिशय आनंदून जाते, नेहमीच! यापैकी एक ड्रेस, पिवळ्या रंगाची अतिशय सुंदर छटा असलेला आणि त्यावर काळ्या रंगाने साध्या, सोप्या रेषांचा वापर करून काही संगीत वाद्यं काढलेली होती. मला फारच भावली होती ती. ती चित्रं बघून मलाही तसली चित्रं काढण्याची इच्छा झाली. त्यातच माझ्याकडे एक रंगीत हाताने तयार केलेल्या कागदांची रेखाटन वही(handmade paper sketch book) होती. मग तीच घेतली आणि त्यावर काही चित्रं पांढऱ्या रंगात, तर काही चित्रं काळ्या रंगात काढली. त्या ड्रेस वर असलेली दोन-तीन संगीत वाद्यांची चित्रं काढली आणि त्यानंतर पुढे माझ्या मनातील संगीत वाद्यं काढत गेले. तसा माझा संगीताशी फारसा संबंध नाही म्हणजे त्यातील फारसे कळत नाही. पण ऐकायला मात्र खूप आवडते. तथापि या रेखाटना...