🪔 ll आनंदी सोहळा-३ ll 🪔 🌺🌺 (featured ) 🌺🌺 🪔 🌺🌺🌺 🪔 आज आनंदी सोहळा-३ ! आनंदी पाऊस तीन वर्षाचा झाला . आपण सर्वांनी दिलेले भरभरून प्रेम, आशीर्वाद, प्रोत्साहन, शुभेच्छा आणि प्रतिसादामुळेच हे शक्य झाले आहे . पुढे भविष्यातही हे सगळे असेच भरभरून मिळत राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे . प्रत्येक आनंदी सोहळा काहीतरी विशेष, पण प्रेमपूर्वक आणि कुठलाही दिखाऊपणा किंवा बडेजाव न होता साजरा व्हावा, अशी माझी नेहमीच इच्छा आणि प्रयत्न असतो . आजही खूप खास वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा स्वर्गीय योग जुळून आलाय! आजचा हा आनंदी सोहळा-३, मी माझे गुरु, ऋषीतुल्य, संस्कृती पुरुष, जागतिक कीर्तीचे इतिहास आणि पुरातत्व संशोधक, आदरणीय डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांना अर्पण करते. फक्त असे म्हणून थांबत नाही तर, त्यांच्या एका अतिशय सुरेख अशा ग्रंथाचा, माझ्या शब्दांत परिचय करून देते. या ग्रंथ-परिचया...