Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

🐈‍⬛🐈‍⬛Black Cats🐈‍⬛🐈‍⬛२ (चित्रं मालिका)

🐈‍⬛🐈‍⬛Black Cats🐈‍⬛🐈‍⬛२  (चित्रं मालिका)  आज माऊं मालिकेतील पुढच्या काही माऊं! BLACK CATS !! 🐈‍⬛🐈‍⬛🐈‍⬛काळ्या माऊं !!!🐈‍⬛🐈‍⬛🐈‍⬛

🌺🪔लक्ष पूर्ती सोहळा🪔🌺 (featured )

🌺🌺🌺🌺🌺 🪔🪔🪔🪔🪔 🌺🌺🌺🌺🌺 💫✨🌟💫 🌦️🌧️🌦️ 🌈🌈🌈 🪔🌺 लक्ष पूर्ती सोहळा 🌺🪔 🪔🌺 (featured ) 🌺🪔 💫✨🌟💫 🌦️🌧️🌦️ 🌈🌈🌈 🌺🌺🌺🌺🌺 🪔🪔🪔🪔🪔 🌺🌺🌺🌺🌺    🪔🪔🪔🪔🪔🌺आनंदी पावसाच्या माध्यमातून व्यक्त होतांना नेहमीच खूप आनंद होतो यात शंकाच नाही ! आपण सगळ्यांचे प्रेम , आशीर्वाद , प्रोत्साहन , सकारात्मक भावना या सगळ्यामुळे मला नवीन नवीन विषयांवर लिहायला , वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त व्हायला , खूप उत्साह आणि बळ मिळते . या सगळ्याच्या बळावर रोजचे आयुष्य जगतानांही खूप सकारात्मक ऊर्जा मिळते ! या आनंदी पावसाच्या माध्यमातूम आपण सगळ्यांनी माझ्यावर अगदी अखंड आणि कधीही न संपणारा , थांबणारा आनंदाचा वर्षाव केला आहे आणि भविष्यातही करत राहाल याची पूर्ण खात्री वाटते ! यापूर्वी काही मित्र-मैत्रिणी आणि वाचकांनी , त्यांना कुठल्या विषयावर वाचायला आवडेल ते सांगून , त्या विषयावर लिहिण्याविषयी मला सांगितले . मी त्या त्या विषयावर लिहिलेही आणि ते सगळ्यांनाच आवडलेही . यापुढेही मला तुम्हा सगळ्यांकडून असे वेगवेगळे विषय सुचवलेले नक्कीच आवडतील . contact us च्या माध्यमातून किंवा...

🐈माऊ🐈‍⬛१ (चित्रं मालिका)

🐈 माऊ🐈‍⬛१   (चित्रं मालिका)                 लेकीचा वाढदिवस काही दिवसांवर आलेला होता . अर्थातच तिला , तिच्या आवडीचे काय द्यावे , याचे मनात विचार चालू होते . काहीतरी खास द्यावे असे वाटतच होते , नेहमीच सगळ्यांना वाटते तसे . पण सुचतच नव्हते . मुलं लहान असली , की त्यांना पटकन काहीही आवडते आणि खुश होऊन जातात . पण जसजशी मोठी होऊ लागतात तसे त्यांना खुश करणे पण कठीण होत जाते . त्यांच्या खास दिवशी त्यांना काय खास करून खुश करावे , समजेनासेच होते . पण आता परत तिच्या लहानपणीच्या आवडीची गोष्ट करून बघावी असे डोक्यात आले .                    ती गोष्ट म्हणजे मी हाताने काढलेली चित्रं तिला भेट द्यायची . पण अशा दिवशी ती चित्रंही तशीच खास हवी . मग एकदम विचार मनात चमकला ! तिला मनीमाऊ खूप आवडतात !! मग म्हटलं , चला ती जितक्या वर्षाची होणार त्या दिवशी , तितक्याच मनीमाऊ ची वेगवेगळी चित्रं काढून तिला द्यावी !!! स्वतः वरच खुश होऊन लगेचच लागले मी कामाला . तिला द्यायच्या तितक्या मनीमाऊ ची चित्रं काढून झाली . पण...