गुढी संमेलन (featured ) कुठलाही बदल एकदम होत नसतो. मग तो नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित. कुठेतरी अगदी बारीकशी सुरुवात होते आणि हळूहळू वाढत जाते. थोड्या काळानंतर मागे वळून पाहिले किंवा विचार केला, की मग मोठ्ठा बदल झाल्याचे जाणवते. तसेच काहीसे होतांना मला जाणवले. कारण यावर्षी मीच थोडा बदल केला, गुढी च्या बाबतीत. अर्थातच या आधीच ह्या बदलाची, समाजात सुरुवात झालेली होती. पण हा बदल जेव्हा मी स्वतः सुद्धा अंगीकारला, तेव्हा मला त्याची जागृत जाणीव झाली. अर्थातच तेव्हा पासून माझ्या मनात, मेंदूत, हृदयात, विचारात एक अवस्थता सुरु झाली, सुरूच आहे अद्याप. अजूनही खूप काळ ही सगळी अस्वस्थता असेलच, याबाबतीत. या सगळ्याचा उकल होईपर्यंत. म्हणजे गुढीचा उगम कुठे, कसा झाला? त्याची कारणं काय? त्यासंबंधीची प्रत्येक गोष्ट समजे पर्यंत. मग पुढे जाऊन त्यात काय बदल होत गेले आता पर्यंत, त्याची कारणं काय वगैरे. ...