ए न् आय वेन्ट व्हायरल ! (काही अनुभवलेलं...) हल्ली बकेट लीस्ट वगैरेची लहर फारच फोफावलेली आहे . माधुरी दीक्षित च्या ' बकेट लीस्ट ' मुळे असेल कदाचित ! खरं म्हटलं तर माणूस म्हटला की त्याची काही स्वप्न , काही इच्छा , काही आशा-आकांक्षा असणारच . आणि त्या असायलाही हव्यात . मग त्यातील काही सहजासहजी पूर्ण होत असतील किंवा काही फारच कठीण असतील पूर्ण व्हायला किंवा काही अगदी कल्पनेत किंवा स्वप्नातच पूर्ण होणाऱ्या असतील . थोड्या पूर्वी मी ऐकले होते -- माय टॉप टेन विशेश आणि आता काही काळापासून बकेट लीस्ट ! तर मी काही माझ्या माय टॉप टेन विशेश किंवा बकेट लिस्ट कधीच लिहून काढली नव्हती . पण मनात बऱ्याच अशा इच्छा - आकांशा होत्या , आहेत , कायम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असतीलच ...