भ्रमणध्वनी आणि मी (काही अनुभवलेलं ...) भ्रमणध्वनी ........ बापरे फारच बोजड वाटतो ना हा शब्द !आणि मना-हृदयाच्या अगदी लांबचा . पण हेच मोबाईल किंवा नुसते फोन म्हटले , तर मात्र आपल्या मना-हृदया जवळ येतो . खरंतर या पुढे जाऊन मी तर म्हणजे आपला अवयवच वाटतो . म्हणजेच खूप अत्यावश्यक ! अगदी क्षणभर जरी दिसला नाही तरी सैरभैर होऊन जातं . सहजच विचार करता करता मी भूतकाळात शिरले आणि भ्रमणध्वनी नेमका माझ्या आयुष्यात कसा आला आणि केव्हा आला ? त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा कसा होता ? आणि काळानुरूप आणि गरजेनुसार कसा कसा आणि केव्हा केव्हा बदलत गेला ? आणि एक एक रंजक किस्से आठवू लागले आणि डोळ्यासमोर तरळू लागले . मग एक एक किस्सा आठवून माझे मलाच खूप हसू येऊ लागले ! ...