खजीना -४ (घरातील गमती जमती) आज खास खजिन्याची गोष्ट! सगळ्यांच्या मना-हृदयापेक्षाही, पोटाच्या आणि जीभेच्या जीव्हाळ्याच्या खजीन्याची गोष्ट! अर्थातच स्वयंपाक घरातील खास कपाटातील खजीना. तर हे आमचे स्वयंपाक घरातील कपाट सुद्धा भिंतीतच होते, होते म्हणण्यापेक्षा अजुनही आहे ते . या कपाटाचे मुख्य तीन भाग. सगळ्यात वरच्या भागाला दोन सरकत्या काचेची दारं, मधल्या भागात उघडणारी तीन दारं, त्यापैकी प्रत्येक दाराला मध्यभागी एक एक छोटी जाळी होती. सगळ्यात खालच्या भागाला दोन सरकती लाकडाची दारं. वरच्या भागापासुन सुरुवात करते. आता या भागाला सरकत्या काचा म्हणजे अर्थातच हा भाग म्हणजे शोकेस, घरा...