वास्तू -आमचे घर (वारसा स्पर्धा २) हे आमचे घर , मुळ गावी असलेले घर ! माझ्या पणजोबांनी बांधलेले आहे , साधारण एकोणीसशे पस्तीसच्या आधी . म्हणजे पंच्यायशी वर्षापेक्षा जास्त जुने . जवळ जवळ चार पिढया राहिल्या या घरात . अगदी लहान असतांना मी काही काळ राहिले आहे या घरात . नंतर मात्र निमित्तानेच जाणे होत असे . अर्धा भाग तळमजला आणि वर दोन मजले आहेत . या भागाचे छत उतरते (स्लोपींग sloping ) आहे . अर्ध्या भागात तळमजला आणि वर एक मजला आहे(हे अर्धे बांधकाम जरा नंतरच्या काळातील आहे . या भागावर मात्र गच्ची आहे . लोड बेअरिंग बांधकाम आहे . भिंती जवळ जवळ एक फूट जाड आहेत . त्याकाळी सुद्धा भिंतीमध्ये लोखंडी तिजोरी बसवलेली आहे . अजून अगदी जशीच्या तशी आहे . एक महत्वाची आणि अभिमानाची ग...