काही खास कामं आणि व्यक्ती-३ (घरातील गमती जमती) आजचे काम आहे "पाटा टाकावणे". पाटा म्हणजे पाटा वरवंटा. जवळ जवळ नामशेष झालाय. पण तरी काही गृहीणी हौसेने छोटा का होईना घेऊन येतात आणि वापरतात. ही फारच कौतुकाची बाब आहे. अगदी भारतातच नाही, तर भारताबाहेर कुठल्या कुठल्या देशात सुद्धा घेऊन जातात आणि वापरतात . मी पण बराच प्रयत्न केला, पण अजूनही मला काही शक्य झाले नाही, पाटा माझ्या घरात आणणे. आता या निमित्ताने का होईना मला मनावर घ्यायला उत्तम संधी आहे. बघू कसे काय जमतेय. पूर्वी मिक्सर वगैरे नव्हते तेव्हा, सर्रास सगळ्यांच्या घरात अगदी हमखास असेच पाटा वरवंटा! पाट्या वर वाटलेल्या वाटणाच्या भाज्या आणि सगळेच पदार्थ अतिशय चविष्ट! सगळ्या भाज्यांना लागणारी वाटणं, वड्यांसाठी आणि इ...