आमचे वाचन-श्रवण (घरातील गमती जमती) एखाद्या खुप आवडत्या पदार्थाची आठवण झाली किंवा कुठे पहिला की कसे आपल्या तोंडाला पाणी सुटते, आणि आपण हर प्रकारे प्रयत्न करतो, तो पदार्थ मिळवायचा किंवा बनवायचा. आणि खातोच खातो! तसेच माझे पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा आहे. एखाद्या पुस्तकाबद्दल वाचले किंवा ऐकले आणि ते आवडले, तर कधी एकदा ते पुस्तक मला मिळते आणि कधी एकदा मी ते वाचते असे होऊन जाते मला. मग मी हरप्रकारे प्रयत्न करते, ते पुस्तक खरेदी करण्यासाठी. काही ठराविक प्रकाशनांची माणसं जोडुन ठेवली आहेत मी. त्यांना सांगितली, की ती बरोब्बर शोधुन काढतात ती पुस्तकं आणि पाठवतात मला! तसेच काही मित्र आहेत, ते सुद्धा लगेच पाठवतात मला हवी ती पुस्तकं. हे ऑनलाईन वगैरे पुर्वी नव्हते. पण मी मॅजेस्टिक, ठाणे ला अगदी नियमित भेट देत असे. त्यामुळे त्यांच्याशी बऱ्यापैकी ओळख झाली होती, त्यांना फोन करून सांगितले तरी, ...