उन्हाळी फळं आणि आम्ही-२ (घरातील गमती जमती) आज या पैकी दुसऱ्या फळाची म्हणजे टरबुजाची (water melon )गोष्ट. टरबुजाच्या तर खरेदी करण्याच्याच खुप गमती जमती आहेत. आंतरजालात(internet) तर बरीच काय काय माहिती येते या बद्दल. पण मी कधी खरेदी करतच नाही टरबूज. फारच क्वचित खरेदी करते, तेव्हा एकच नियम लावते, अगदी लहान आकाराचे घ्यायचे. एकदा कापले की दोघात खाऊन संपले पाहीजे. पूर्वी आंतरजाल(internet) नसल्याने ते वाचून खरेदी करणेही शक्य नव्हते. आता काही वर्षांपासून मी हे चट्ट्यापट्टयाचे टरबूज बघतेय. पण आमच्या लहानपणी फक्त, बाहेरून गडद हिरव्या रंगाचे आणि आकाराला गोल गरगरीत असे टरबूज मिळत असतं. तर याची खरेदी करतांना, यावर बोटानी मारून आवाज कसा येतो यावर ठरते, ते कसे असेल. पण हा काही खात्रीलायक मार्ग नाही आणि सगळ्यांनाच त्यातले कळते असे नाही. अगदी पट्टीच्याच माणसाला ते कळते. मग हे आत छान...