भरीत रविवार सकाळ (घरातील गमती जमती) हिवाळ्यात खूप महत्वाची आणि सगळ्यांचीच आवडती म्हणजे भरीत सकाळ! ही सकाळ म्हणजे फक्त हिवाळ्यातच शक्य असते. आणि हो, हे भरीत म्हणजे तेच प्रसिद्ध खान्देशी वांग्याचे भरीत! हे जे खास भरीताचे वांगे असतात ते फक्त हिवाळ्यातच मिळत तेव्हा तरी. आता मिळतात जवळ जवळ वर्षभर, पण मग या वांग्यांना आणि भरताला छान चव नसते. खरी चव चाखायची तर ती फक्त आणि फक्त हिवाळ्यातच! या भरीतासाठी लागणारे दोन फार महत्वाचे घटक म्हणजे कांद्याची पाथ आणि भरीताच्या खास जाड मिरच्या! या दोन्ही घटका...